Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात १३ हजार किलोलिटरची क्षमता असलेला नविन प्लान्ट कार्यान्वीत..

najarkaid by najarkaid
April 4, 2021
in जळगाव
0
डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात १३ हजार किलोलिटरची क्षमता असलेला नविन प्लान्ट कार्यान्वीत..
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव,(प्रतिनिधी)- येथील डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालयात सध्याच्या काळात संजीवनी असलेला ऑक्सीजन पुरवठा हा अविरतपणे सुरू आहे. ऑक्सीजनची कमतरता भासू नये यासाठी रूग्णालयामार्फत नविन १३ हजार किलोलिटरची क्षमता असलेला नविन प्लान्ट कार्यान्वीत करण्यात आला आहे. एकुण दोन प्लान्टद्वारे २६ हजार ऑक्सीजनची क्षमता आता झाली असून रुग्णांना अविरत ऑक्सीजन पुरवठा केला जात आहे.

गेल्या वर्षभरापासून देशभरात कोरोनाने धुमाकूळ घातला आहे. जळगाव जिल्ह्यातही कोरोना बाधित रूग्णांची संख्या दिवसागणिक वाढत आहे. कोरोनाग्रस्त रूग्णांना ऑक्सीजनचा अविरत पुरवठा होणे अत्यंत गरजेचे आहे. डॉ. उल्हास पाटील कोविड केअर सेंटरमध्ये उपचारासाठी दाखल होणार्‍या रूग्णांकरीता ऑक्सीजनचा सातत्याने पुरवठा सुरू रहावा यासाठी तब्बल १३ हजार किलोलिटरचा ऑक्सीजन प्लान्ट सुरवातीपासूनच होता त्यात आता नव्याने तितक्याच क्षमतेचा ऑक्सीजन प्लान्ट डॉ. वैभव पाटील यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आला.

कोरोना लक्षणाकडे दुर्लक्ष करु नका – डॉ.वैभव पाटील
कोरोनाची ही लाट गंभीर स्वरुपाची आहे, त्यामुळे कोविडची लक्षणे जाणवल्यास तात्काळ जवळच्या हॉस्पीटलमध्ये संपर्क साधा, आवश्यक त्या चाचण्या करुन घ्या आणि मनातील संभ्रम दूर करुन घ्या. आजार लवकर समजला तर उपचाराने रुग्ण लवकर बरा हेातो, मात्र टाळाटाळ केली तर उपचार करणेही कठिण होते. जिल्ह्यात कुठेही ऑक्सीजनची कमतरता असल्यास त्या रुग्णांनी डॉ.उल्हास पाटील कोविड रुग्णालयात तातडीने यावे यासंदर्भात जिल्हाधिकारी, जिल्हा शल्य चिकित्सक यांच्याशी भ्रमणध्वनीद्वारे संपर्क साधून सदर ऑक्सीजन प्लान्टची माहिती दिली आहे, त्यामुळे रुग्णांना ऑक्सीजन लागल्यास डॉ.उल्हास पाटील कोविड रुग्णालयात शिफ्ट करावे, असेही डी.एम.कार्डियोलॉजीस्ट डॉ.वैभव पाटील यांनी सांगितले.

सहा महिन्यापूर्वीच दुसर्‍या प्लान्टचे नियोजन – प्रमोद भिरुड
गेल्यावर्षीपैक्षा यंदाची कोरोना परिस्थीती गंभीर आहे. वयोवृद्धांनाच नव्हे तर तरुणांना देखील ऑक्सीजनची गरज भासत आहे. डॉ.उल्हास पाटील यांनी दुरदृष्टी ठेवूनच सहा महिन्यापूर्वीच आम्हाला दुसरा १३ किलोलिटरचा ऑक्सीजन प्लान्ट कार्यान्वित करण्यास सांगितले. डॉ.उल्हास पाटील कोविड रुग्णालयाचे ४०० बेड अधिग्रहित केले आहे. त्यापैकी ३७० बेड ऑक्सीजन, २५ बेड आयसीयूचे असून सर्वात जास्त ऑक्सीजनची गरज तेथेच असते. कारण व्हेंटीलेटरसाठी ऑक्सीजन आवश्यकत असतो. ३७० पैकी २५० रुग्णांना ऑक्सीजनची गरज लागत आहे. या दोन्ही ऑक्सीजन प्लॉन्टमुळे रुग्णांना पुरेसा ऑक्सीजन उपलब्ध आहे असे डॉ.उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयाचे प्रशासकीय अधिकारी प्रमोद भिरुड यांनी सांगितले.

ऑक्सीजन प्लान्टचे असे चालते कार्य…

डॉ.उल्हास पाटील रुग्णालयात आता १३ किलोलिटरचे दोन ऑक्सीजन प्लान्ट कार्यान्वित आहे, दोघांची क्षमता ही २६ किलोलिटर इतका ऑक्सीजन तयार करण्याइतकी आहे. या टँकमधून पाईपलाइनद्वारे रुग्णाच्या बेडपर्यंत ऑक्सीजन पोहोचविला जातो, दरम्यान टँकजवळली पाईपलाईनच्या बाहेर बर्फाचा थर साचतो, तो काढण्यासाठी तसेच टँकच्या देखभालीसाठी स्वतंत्र कर्मचारी वर्ग येथे कार्यरत असतो, सुलभरित्या रुग्णांना ऑक्सीजन मिळत आहे. रुग्णाची संख्या पाहता १०० ऑक्सीजन बेड वाढविण्याचे नियोजन रुग्णालयाचे आहे.

Spread the love
Tags: #jalgaon#jalgaoncity #डॉ. उल्हास पाटील मेडिकल कॉलेज
ADVERTISEMENT
Previous Post

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले…आता जिंदगी, जान, उसके बाद काम…

Next Post

राज्यात राहून केंद्राशी ‘इमान’… ‘पॅकेज’ ची मात्र राज्याकडून अपेक्षा…

Related Posts

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन

प्रा. भूपेंद्र बाणाईत यांची भाजप शिक्षक आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड

September 5, 2026
५,०१२ सहाय्यक प्राध्यापक पदभरती; पारदर्शकतेसाठी शासनाच्या कडक सूचना

September 3, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस एक वर्ष कारावास; जैन इरिगेशन कंपनीला ३० लाखांची नुकसानभरपाई

September 2, 2026
Next Post
राज्यात राहून केंद्राशी ‘इमान’… ‘पॅकेज’ ची मात्र राज्याकडून अपेक्षा…

राज्यात राहून केंद्राशी 'इमान'... 'पॅकेज' ची मात्र राज्याकडून अपेक्षा...

ताज्या बातम्या

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा – मंत्री गिरीश महाजन

September 7, 2026
शिरसोलीत ‘जीवनधारा’ शुद्ध पेयजल योजनेचा शुभारंभ – गांधी रिसर्च फाउंडेशनचा उपक्रम

शिरसोलीत ‘जीवनधारा’ शुद्ध पेयजल योजनेचा शुभारंभ – गांधी रिसर्च फाउंडेशनचा उपक्रम

September 7, 2026
अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन

अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन

September 7, 2026
प्रा. भूपेंद्र बाणाईत यांची भाजप शिक्षक आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड

प्रा. भूपेंद्र बाणाईत यांची भाजप शिक्षक आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड

September 5, 2026
५,०१२ सहाय्यक प्राध्यापक पदभरती; पारदर्शकतेसाठी शासनाच्या कडक सूचना

५,०१२ सहाय्यक प्राध्यापक पदभरती; पारदर्शकतेसाठी शासनाच्या कडक सूचना

September 3, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us