Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

जीवनातील सुख-दुःखाची उनसावली मांडणारे  जतरा

najarkaid by najarkaid
November 21, 2019
in जळगाव
0
जीवनातील सुख-दुःखाची उनसावली मांडणारे  जतरा
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव – जीवन हा उन सावल्याचा खेळ आहे, या उक्‍तीचा आधार घेऊन मांडण्यात आलेली संहिता म्हणजे सौ.रुपाली गुंगे लिखीत प्रा.राज गुंगे दिग्दर्शित सुबोध बहुउद्देशीय युवा विकास प्रतिष्ठान शिवाजीनगर जळगावचे नाटक ‘जतरा’. समाजाचे शहरी जीवन व ग्रामीण जीवन हे दोन भाग जरी असले तरी सर्वांच्याच जीवनात आनंद आणि दुःखाचे क्षण हे सारखेच असतात. फरक असतो तो फक्‍त राहणीमान आणि भाषेचा.
2018 मध्ये सोलापूर जिल्ह्याचे सांगोले तालुक्यात वाकी घेरडी या गावात जतरेत घडलेल्या सत्य घटनेवर आधारित ही नाट्यसंहिता. जतरा ही संकल्पना जरी जुनी असली तरी महाराष्ट्राच्या कानाकोपर्‍यात जतरा ही गावाची परंपराच आहे. बड्या लोकांच्या मानापमान व इर्ष्येपोटी काही घटणा जाणीवपूर्वक वा नकळत घडतात. त्यातून घडते ते जीवन नावाचे नाटक. निसर्गाच्या अवकृपेला आणि परिस्थितीला कंटाळून महाराष्ट्रात शेतकरी आत्महत्या करत असताना एखादे कुटुंब व्यवसायात बदल म्हणून नवीन काम करु पाहते पण या कामाचा अनुभव नसल्याने त्यांना या व्यवसायात येणार्‍या अडचणी नवीनच असतात. कथेचा नायक हरी शेती हा मुख्य व्यवसाय सोडून जोडधंदा म्हणून टोपली, सुप, पोळपाट, शिके यांचा व्यवसाय करावा म्हणून जतरेत येतो. तिथे जागा मिळविण्यासाठी ते दुकान मांडेपर्यंत त्याची शेजार्‍यांशी हुज्जत, जतरेसारख्या सार्वजनिक उत्सवात येणार्‍या विविध स्वभावाच्या लोकांशी जुळणारी नाती आणि त्यातून उलगडले जाणारे आयुष्याचे पैलू या रंजकतेवर आधारित कथानक आहे.
स्त्री सन्मान ही आपल्या देशाची संस्कृती पण जतरेत घडणार्‍या प्रसंगामुळे हरी हा आपल्या संस्कृतीप्रमाणे वागतो आणि गावातल्या मोठ्या माणसाशी वैर घेऊन बसतो. तिथून कथा नकळत नव्या वळणावर जाते आणि मोठ्या माणसांशी होणार्‍या लढाईत गरीब माणसांना बरंच काही गमवावं लागतं. जतरेतून कोणी काही घेवून जातं, कोणी काही सोडून जातं पण एखादी घटना आयुष्यभरासाठीची आठवण ठेवून जाते, हे सांगण्याचा प्रयत्न करणारे जतरा हे नाट्य.
या नाट्यात निशा पाटील (सई), संजना पाटील (चिमी), दिग्वीजय जगदाळ (राजू), रत्ना ठाकरे (जनाबाई), सुनील पाटील (आप्पा), हर्षा बोरोले (राणी), शुभम चौधरी (तो), गुलाब तडवी (दादा), दर्शन पाटील (एक), प्रतीक बाविस्कर (दोन), शुभम तायडे (तीन, दत्तात्रय शेळके (व्यक्‍ती), हर्षदा वाघ (स्त्री), मोरेश्‍वर सोनार (बाळू), राज गुंगे (हरी) यांच्यासह संजना भोजणे, समृध्दी मोरे, माही जैन, राजवीर चोरडिया, आरव भदादे, गुंजश्री बोरोले, गार्गी पाटील यांच्या भूमिका तर तांत्रिक बाजूत रुपाली गुंगे यांचे नेपथ्य, रविकुमार परदेशी यांची प्रकाशयोजना, निखिल शिंदे यांचे पार्श्‍वसंगीत, सविता शिंदे यांची रंग व वेशभूषा तर राजेश शहाणे, प्रविण पांढरे, बाळू बोरकर यांची रंगमंच व्यवस्था होती. निर्मिती प्रमुख दीपक सुरळकर व मिलींद पाटील, संजय ठाकरे, यशवंत बाविस्कर, मानसी भदादे, पद्मजा घैसास, पार्थ ठाकर, विनिता पाटील यांचे सहकार्य लाभले होते.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

संरक्षण मंत्रालय कमिटी सदस्यपदी साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर

Next Post

भाजपा, शिवसेनेचे महापौर,उपमहापौर पदासाठी अर्ज दाखल

Related Posts

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेश अध्यक्ष यांच्या उपस्थितीत महिला प्रदेश अध्यक्ष पदाचा पदग्रहण करतांना सौ. शुभांगीताई राजपूत

संघटनेतील शेवटचा कार्यकर्ता हीच संघटनेची खरी ताकद : प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील

August 17, 2026
शिक्षणातून परिवर्तन शक्य; विद्यार्थी देशाचे उज्ज्वल भविष्य – प्रविण सपकाळे

August 16, 2026
शिक्षणाचे स्वप्न उराशी बाळगून मोठे व्हा— जलसंपदा मंत्री ना. गिरीष महाजन

August 10, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

July 30, 2026
पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

July 24, 2026
पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

ताज्या बातम्या

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us