Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

जिल्ह्यात 19 नोव्हेंबरपासून कौमी एकता सप्ताहाचे आयोजन

najarkaid by najarkaid
November 17, 2019
in जळगाव
0
जिल्ह्यात 19 नोव्हेंबरपासून कौमी एकता सप्ताहाचे आयोजन
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव  – केंद्र शासनाने घेतलेल्या निर्णयानुसार 19 ते 25 नोव्हेंबर, 2019  हा सप्ताह कौमी एकता सप्ताह म्हणून राज्यात साजरा करण्यात येणार आहे. त्यानुसार या सप्ताहात जळगाव जिल्ह्यात शाळा, महाविद्यालयांमध्ये  विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात यावेत. व या कार्यक्रमांमध्ये जिल्ह्यातील जास्तीत जास्त नागरीकांना सहभागी करुन घ्यावे. अश्या सुचना अपर जिल्हादंडाधिकारी वामन कदम यांनी सर्व संबंधितांना दिल्या आहेत.

या सप्ताहात मंगळवार दि. 19 नोव्हेंबर रोजी राष्ट्रीय एकात्मता दिवस धर्मनिरपेक्षता जातीयवादी विरोध व अहिंसा यांच्यावर भर देणारे सभा, चर्चासत्रे व परिसंवादांचे आयोजन करण्याचे नियेाजन आहे.

बुधवार दि. 20 नोव्हेंबर रोजी अल्पसंख्यांक कल्याण दिवस अल्पसंख्यांकांच्या कल्याणासाठी 15 कलमी कार्यक्रमावर भर देण्यात यावा, जातीय दंगली उद्भवणाऱ्या शहरातून बंधुभाव निर्मितीसाठी खास मिरवणूका काढण्यात याव्यात.

गुरूवार दि. 21 नोव्हेंबर रोजी भाषिक सुसंवाद दिवस :- भारताच्या अन्य भागातील लोकांच्या भाषेचा वारसाचा परिचय करून देण्याच्या दृष्टीने विशेष वाड;मयीन कार्यक्रम व कवी संमेलने आयोजित करण्यात यावीत.

शुक्रवार दि. 22 नोव्हेंबर दुर्बल घटक दिवस :- 20 कलमी कार्यक्रमांतर्गत अनुसूचित जाती व जमाती मधील व्यक्ती व कमकुवत घटकातील व्यक्ती यांना मदत करण्यासाठी ठरवून दिलेले कार्यक्रम ठळकपणे निदर्शनास आणण्याच्या दृष्टीने सभा व मेळावे भरविण्यात यावेत. त्यावेळी  इंदिरा आवास योजना व घरासाठी जागांचे वाटप व कर्जाचे वाटप, अतिरिक्त जमिनीचे भूमिहिन मजुरांना वाटप, गरीबांना कायदेविषयक सहाय्य देण्याचे कार्यक्रमही आयोजित करण्यात यावेत.

शनिवार दि. 23 नोव्हेंबर रोजी सांस्कृतिक एकता दिवस:-  भारतीयांच्या विविधतेतील एकतेवर भर देणारे आणि सांस्कृतिक संरक्षण व एकात्मता संबंधाची भारतीय परंपरा सादर  करणारे सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात यावेत.

रविवार दि. 24 नोव्हेंबर रोजी महिला दिन:- भारतीय समाजातील महिलांचे महत्व व राष्ट्र उभारणीच्या विकासामधील त्यांची भूमिका यावर भर देण्यात यावा.

सोमवार दि. 25 नोव्हेंबर रोजी जोपासना दिवस:- पर्यावरणाची जोपासना व त्याची जाणीव यासाठीच्या वाढत्या गरजेवर भर देणारे मेळावे व कार्यक्रम आयोजित करण्यात यावेत अशाप्रकारे कार्यक्रमाची रुपरेखा लक्षात घेवून  1)ध्वजारोहण 2) मिरवणूका व सभा 3) राष्टीय एकतेची शपथ 4) चर्चा, संमेलने 5) चित्रपट दाखविणे व प्रदर्शनांसारख्या कार्यक्रमांतून हा कौमी एकता सप्ताह साजरा करावयाचा आहे. या सप्ताहानिमित्त आयोजित कार्यक्रमात जिल्ह्यातील जास्तीत-जास्त नागरिकांनी सहभाग नोदवावा. असे आवाहन शासनाच्या अल्पसंख्याक विकास विभागाचे उप सचिव दि. मा. सोनवणे यांनी केले आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

शिकाऊ उमेदवारांची प्रात्याक्षिक परिक्षा 30 नोव्हेंबर पूर्वी घ्यावी

Next Post

जी. एच. रायसोनी महाविध्यालयाच्या “बागेत अभ्यासिका

Related Posts

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेश अध्यक्ष यांच्या उपस्थितीत महिला प्रदेश अध्यक्ष पदाचा पदग्रहण करतांना सौ. शुभांगीताई राजपूत

संघटनेतील शेवटचा कार्यकर्ता हीच संघटनेची खरी ताकद : प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील

August 17, 2026
शिक्षणातून परिवर्तन शक्य; विद्यार्थी देशाचे उज्ज्वल भविष्य – प्रविण सपकाळे

August 16, 2026
शिक्षणाचे स्वप्न उराशी बाळगून मोठे व्हा— जलसंपदा मंत्री ना. गिरीष महाजन

August 10, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

July 30, 2026
पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

July 24, 2026
पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

ताज्या बातम्या

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us