Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

जिल्ह्यात प्रधानमंत्री मातृ वंदना सप्ताहाचे आयोजन ; पात्र लाभार्थ्यांनी लाभ घेण्याचे आवाहन

tdadmin by tdadmin
September 1, 2021
in जळगाव
0
जिल्ह्यात प्रधानमंत्री मातृ वंदना सप्ताहाचे आयोजन ; पात्र लाभार्थ्यांनी लाभ घेण्याचे आवाहन
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव प्रतिनिधी – जिल्ह्यात 1 ते 7 सप्टेंबर, 2021 या कालावधीमध्ये प्रधानमंत्री मातृ वंदना सप्ताह राबविण्यात येत आहे. या सप्ताहामध्ये प्रधानमंत्री मातृ वंदना योजनेअंतर्गत प्राथमिक आरोग्य केंद्र व सर्व आरोग्य सेवा कार्यक्षेत्रामध्ये जास्तीत पात्र लाभार्थीना लाभ देण्यासाठी विशेष मोहिम राबविण्यात येणार आहे. जिल्ह्यातील पात्र लाभार्थीनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी अभिजित राऊत, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ पंकज आशिया, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ एन. एस. चव्हाण, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ भीमाशंकर जमादार यांनी एका संयुक्त प्रसिध्दी पत्रकान्वे केले आहे.

भारतातील दारिद्र्य रेषेखालील व दारिद्र्य रेषेवरील अनेक गर्भवती महिलांना गरोदरपणाच्या शेवटच्या टप्यापर्यंत मजुरीसाठी काम करावे लागते. यामुळे अशा गर्भवती महिला व माता कुपोषित राहून त्यांचे व त्यांच्या नवजात बालकाच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होतो. माता व बालकांचे आरोग्य सुधारण्याच्यादृष्टिने गर्भवती माता व स्तनदा मातेला सकस आहार घेण्यास प्रोत्साहित करुन त्यांच्या आरोग्यात सुधारणा व्हावी व जन्माला येणाऱ्या नवजात बालकाचेही आरोग्य सुधारावे आणि मातमृत्यु व बालमृत्यु दरात घट होऊन तो नियंत्रित राहावा. यासाठी केंद्र शासनाच्या महिला व बालविकास मंत्रालयाने प्रधानमंत्री मातृ वंदना योजना संपूर्ण देशात 1 जानेवारी, 2017 पासून कार्यान्वित केलेली आहे.

राज्यातील प्रथमत: गर्भवती महिला व स्तनदा माता ज्यांची गर्भधारणा 1 जानेवारी, 2017 रोजी अथवा तद्नंतर झाली असेल अशाच पात्र महिलांना प्रधानमंत्री मातृ वंदना योजनेचा लाभ पहिल्या जिवीत अपत्यासाठी दिला जात आहे. मात्र ज्या गरोदर व स्तनदा माता या केंद्र अथवा राज्य सरकारच्या कर्मचारी आहेत किंवा सार्वजनिक उपक्रमात कार्यरत आहेत. अशा मातांना लाभ अनुज्ञेय नाही. गरोदर व स्तनदा या अंगणवाडी कार्यकर्ती किंवा अंगणवाडी मदतनीस किंवा आशा या योजनेच्या निकषात बसत असतील तर त्यांना हा लाभ देता येणार आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थ्यास मान्यताप्राप्त आरोग्य निदान योजनेतर्गत नोंदणी करणे आवश्यक आहे.

या योजनेंतर्गत 3 टप्प्यांमध्ये पाच हजारांचे अनुदान आधार संलग्न बॅक खात्यात किंवा पोस्ट ऑफिसमधील खात्यात DBT व्दारे दिले जाते. पहिला हप्ता 1 हजार रुपये मासिक पाळीच्या शेवटच्या तारखेपासून 100 दिवसात गर्भधारणा नोंदणी केल्यानंतर प्राप्त होईल. दुसरा हप्ता 2 हजार रुपये किमान एकदा प्रसवपुर्व तपासणी (ANC) केल्यास गर्भधारणेचे सहा महिने तथा 180 दिवस पुर्ण झाल्यानंतर लाभार्थ्यांच्या खात्यावर जमा केला जाईल. तिसरा हप्ता 2 हजार रुपये प्रसूतीनंतर झालेल्या अपत्याची जन्मनोंदणी व बालकास बीसीजी, ओपीव्ही, डीपीटी आणि हिपॅटॅटीस बी व त्या अनुषंगिक लसीकरणाचा पहिला खुराक दिल्यानंतर लाभार्थीच्या बँक खात्यात जमा केला जातो.

तरी जिल्ह्यातील पात्र लाभार्थीनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद, जळगाव यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

आईपाठोपाठ पाच दिवसांनी मुलाचाही मृत्यू

Next Post

सप्टेंबरमध्ये सामान्यपेक्षा अधिक पाऊस ; हवामानाचा अंदाज जारी

Related Posts

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन

राज्यातील ‘या’ भागात पुढील काही तासात मुसळधार पावसाची शक्यता

सप्टेंबरमध्ये सामान्यपेक्षा अधिक पाऊस ; हवामानाचा अंदाज जारी

ताज्या बातम्या

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा – मंत्री गिरीश महाजन

September 7, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us