Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

जागतिक महिला दिनाच्या पूर्वसंध्येस  “ताल सुरन का मेल” या वैशिष्ट्यपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन

najarkaid by najarkaid
March 4, 2022
in जळगाव
0
जागतिक महिला दिनाच्या पूर्वसंध्येस  “ताल सुरन का मेल” या वैशिष्ट्यपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव दि 4 प्रतिनिधी– स्व. वसंतराव चांदोरकर स्मृती प्रतिष्ठान आणि भवरलाल अॅण्ड कांताबाई जैन फाऊंडेशन तर्फे जागतिक महिला दिनाच्या पूर्वसंध्येस अर्थात सोमवार दि. ७  मार्च रोजी संध्याकाळी ठीक ७ वाजता  दसक्कर सिस्टर्स प्रेझेंटस् “ताल सुरनका मेल” या आगळ्या वेगळ्या कार्यक्रमाचे आयोजन कांताई सभागृहात केले आहे. कार्यक्रमाच्या उदघाटन समारंभासाठी महापौर जयश्री सुनील महाजन, ज्योती अशोक जैन, डॉ.अनुराधा अभिजित राऊत, डॉ. अमृता प्रवीण मुंढे, तसेच डॉ. शिल्पा किरण बेंडाळे या मान्यवरांची उपस्थिती राहील. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्मिता झारे करणार आहेत.
अश्विनी दसक्कर भार्गवे, कु. ईश्वरी दसक्कर, कु. गौरी दसक्कर, कु. सुरश्री (पूजा) दसक्कर भगिनी या नाशिकमधील संगीतक्षेत्रातील नामांकित घराण्यांपैकी एक म्हणजे दसक्कर घराण्याच्या चौथ्या नवीन पिढीचे नेतृत्व करीत असून संगीतक्षेत्रात सतत नवनवीन, वेगवेगळे, वैशिष्ट्यपूर्ण प्रयोग करीत असतात.
त्यांना संगीतकलेचा वारसा घरातूनच मिळाला. त्यांचे सांगितिक शिक्षण आजोबा ज्येष्ठ संगीततज्ज्ञ पं. प्रभाकर दसक्कर काका माधव दसक्कर आंतरराष्ट्रीय ख्यातीचे संवादिनीवादक पं. सुभाष दसक्कर यांच्याकडे तसेच जयपूर ग्वाल्हेर किराणा घराण्याच्या गायकीचे शिक्षण विदुषी अलका देव मारुलकर व विदुषी मंजिरी असनारे केळकर यांच्याकडे झाले. लहानपणीच स्वराज्ञानासारखी अवघड गोष्ट सहज साध्य झाल्याने शास्त्रीय संगीत, उपशास्त्रीय संगीत, अभंग, भजन, गौळण, भावगीते, गझल, फ्युजन यांबरोबरच हार्मोनियम आणि सिंथेसायझर वादनात त्या पारंगत आहेत.
सुभाष दसक्कर यांच्या देशविदेशातील सांगीतिक देवाणघेवाणीमुळे सगळ्या प्रकारचे संगीत ऐकण्याची, वाजवण्याची, गाण्याची आवड निर्माण होत असतानाच दसक्कर भगिनींनी Vocal Harmony  या अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण आणि अनोख्या प्रकाराला सुरुवात केली. हिंदी, मराठी भावगीते, सिनेसंगीतातील लोकप्रिय गीते यांबरोबरच पाश्चिमात्य सिम्फनी घेऊन त्यावर हा आगळावेगळा प्रयोग करणे ही त्यांची खासियत ! मूळ सुरावटीला कुठेही धक्का न लावता गीताचे बोल आणि वाद्यसंगीताच्या धून वरदेखील आवाजाचे वेगवेगळे टोन वापरून Vocal Harmony चे सादरीकरण त्या करतात.
त्यांच्या या अनोख्या प्रयोगाचे कौतुक संगीत क्षेत्रातील दिग्गज कलाकार जसे की, पद्मभूषण पं. राजन साजन मिश्रा, पद्मविभूषण पं बिरजू महाराजजी, तालयोगी पं सुरेशदादा तळवलकर, पं विश्वामोहन भट, पं विभव नागेशकर, पं अजय पोहनकर, पं अरविंदकुमार आझाद, विदुषी अश्विनी भिडे देशपांडे, विदुषी मंजुषा पाटील तसेच सिनेसृष्टीतील अनेक नामवंत कलाकारांकडून आणि जगभरातील लाखो चोखंदळ आणि दर्दी रसिकांकडून झालेले आहे.
त्यांनी आजवर अनेक स्वरचना केल्या आहेत. त्यात मुख्यत्वेकरून बंदिशी, रागमाला, तराणे, प्रार्थना, देशभक्तीपर गीते अशा अनेक रचनांचा समावेश आहे.
नुकतीच त्यांनी “ताल सुरनका मेल” या अतिशय आगळ्या वेगळ्या दशरंगी प्रकारची निर्मिती केली. त्यातील शब्द, संगीत, गायन, वादन, संयोजन हे सगळे त्यांचेच असून त्यांच्यावरच चित्रित करण्यात आले आहे. हा नवीन, वैशिष्ट्यपूर्ण आणि आकर्षक प्रकार आजवर संगीतक्षेत्रात कुठेही झाला नाही, असे अनेक दिग्गज कलाकारांनी त्यांना सांगत त्यांचे भरभरून कौतुक केले आहे.
त्यांचे भारतात विविध प्रतिष्ठित महोत्सवांमध्ये अनेक मान्यवर कलाकारांच्या उपस्थितीत गाण्याचे व वादनाचे कार्यक्रम झाले आहेत. यामध्ये वसंतोत्सव पारनेर , सुश्री सीता पवार महोत्सव खंडवा , बालगंधर्व महोत्सव जळगाव , वर्ल्ड हार्मोनियम समीट बंगलोर , निनादिनी संगीत महोत्सव गोवा , देवगांधार संगीत महोत्सव , गोपीकृष्ण संगीत महोत्सव, नाशिक, नवदुर्गा पुरस्कार मुंबई, आदि अनेक ठिकाणी व मुंबई आकाशवाणी, रेड एफएम, माय एफएम अशा रेडिओ वाहिन्यांवर त्यांचे कार्यक्रम झाले आहेत व त्यांनी स्पर्धांचे परीक्षण केले आहे. तसेच ABP माझा , झी युवा , झी 24 तास , कलर्स मराठी या चॅनेल्सवरुन त्यांना कार्यक्रमासाठी आमंत्रित करण्यात आले.
शक्ती पुरस्कार, ज्ञानगंगा पुरस्कार , रासबिहारी इंटरनॅशनल स्कुल म्युझिक अवॉर्ड, नाशिकचा लावण्यवती पुरस्कार अशा अनेक प्रतिष्ठित पुरस्कारांनी त्यांनासन्मानित केले गेले आहे. त्यांना गायन व वादनासाठी भारत सरकारची मान्यताप्राप्त स्कॉलरशिप मिळाली आहे. तसेच त्यांनी संगीत MA पदवी आणि संगीत विशारद विशेष नैपुण्यासह प्राप्त केले आहे.
लहान मुलांमध्ये शास्त्रीय संगीताची गोडी कशी निर्माण करावी या विषयावर त्यांचे विशेष प्रेम व अभ्यास आहे. लहान मुलांवर संगीत कलेच्या माध्यमातून वेगवेगळे प्रयोग करणे त्यांना आवडते. त्यांनी आजवर बालसाहित्यातील अनेक कवितांना आकर्षक स्वररचना देऊन संगीतबद्ध केले आहे. काही नाटके व एका शॉर्टफिल्म साठी त्यांनी गाण्याची रचना व संगीत संयोजनाचे काम केले आहे.
दसक्कर सिस्टर्स या त्यांच्या युट्युब चॅनल, फेसबुक पेज व इन्स्टाग्राम पेजवर त्या नवनवीन प्रयोग सादर करत असतात.
चांदोरकर प्रतिष्ठानाने जळगावच्या सांस्कृतिक समृध्दी साठी सतत काहितरी वेगळं देण्याचा प्रयत्न केला आहे. त्याचाच एक भाग म्हणून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे. समस्त महिला वर्गाने चुकवू नये असा हा कार्यक्रम आहे. अर्थात तो सर्व रसिकांसाठी खुला आहे. कार्यक्रम ठीक ७ वाजता सुरू होईल रसिकांनी ६.५० पर्यंत आसनस्थ व्हावे अशी विनंती आयोजकांनी केली आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

जळगाव जिल्ह्यासाठी सुधारित निर्बंध लागू

Next Post

विकास मल्हारा यांना बॉम्बे आर्ट सोसायटीचे सुवर्णपदक

Related Posts

पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

July 24, 2026
पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील यांचे नंदुरबारमध्ये जंगी स्वागत; समाजबांधवांशी साधला संवाद

July 17, 2026
राजपूत समाजाच्या सन्मानासाठी संघटना कटिबद्ध; महिला सक्षमीकरणाला प्राधान्य – राष्ट्रीय अध्यक्षा ॲड. शिलाभाभीसा गोगामेडी

July 16, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्री तथा राष्ट्रीय प्रवक्तापदी सूरजसिंह ठाकूर यांची निवड

July 13, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे संस्थापक स्वर्गीय सुखदेवसिंह दादा गोगामेडी यांच्या जयंतीनिमित्त उद्या जळगावात भव्य सामाजिक कार्यक्रम

July 11, 2026
Next Post
विकास मल्हारा यांना बॉम्बे आर्ट सोसायटीचे सुवर्णपदक

विकास मल्हारा यांना बॉम्बे आर्ट सोसायटीचे सुवर्णपदक

ताज्या बातम्या

पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

July 24, 2026
पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

July 24, 2026
रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

July 23, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील यांचे नंदुरबारमध्ये जंगी स्वागत; समाजबांधवांशी साधला संवाद

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील यांचे नंदुरबारमध्ये जंगी स्वागत; समाजबांधवांशी साधला संवाद

July 17, 2026
राजपूत समाजाच्या सन्मानासाठी संघटना कटिबद्ध; महिला सक्षमीकरणाला प्राधान्य – राष्ट्रीय अध्यक्षा ॲड. शिलाभाभीसा गोगामेडी

राजपूत समाजाच्या सन्मानासाठी संघटना कटिबद्ध; महिला सक्षमीकरणाला प्राधान्य – राष्ट्रीय अध्यक्षा ॲड. शिलाभाभीसा गोगामेडी

July 16, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us