Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

जळगाव जिल्ह्यात 1093 कोरोना बाधित रुग्ण आढळले तर 12 बाधितांचा मृत्यू

najarkaid by najarkaid
March 23, 2021
in जळगाव
0
जळगाव जिल्ह्याचा कोरोना पाॅझिटीव्हीटी रेट 7.36 टक्के इतका
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव(प्रतिनिधी)- जिल्ह्यात स्वॕब घेतलेल्या रूग्णांपैकी आज पुन्हा 1093 नवीन कोरोनाबाधीत रूग्ण आढळून आलेले असून कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता जनतेने आता मास्क लावणे आणि अधिक खबरदारी घेणे आवश्यक आहे.

आज जिल्ह्यात जळगाव शहर 356 ,जळगाव ग्रामीण 36, भुसावळ 66,अमळनेर 76, चोपडा 100 ,पाचोरा 12, भडगाव 22 ,धरणगाव 70,यावल 43,एरंडोल 55 ,जामनेर 31, रावेर 35,पारोळा 25,चाळीसगाव 95,मुक्ताईनगर 33, बोदवड 33 आणि इतर जिल्ह्यातील 05 असे एकूण 1093 रूग्ण आज कोरोनाबाधीत आढळून आलेले आहे.

आज दिवसभरात रूग्ण 977 बरे झाले असून आतापर्यंत एकूण 68073 रूग्ण बरे झालेले आहे. जिल्ह्यात सध्या 9977 ॲक्टीव्ह रूग्ण उपचार घेत असून आतापर्यंत एकूण कोरोना बाधितांची संख्या 79563 झालेली आहे. जिल्ह्यात आज 12 रूग्णांचा मृत्यू झालेला असून आतापर्यंत एकूण 1513 रूग्णांचा मृत्यू झालेला आहे.अशी माहिती आज जिल्हा प्रशासनातर्फे जाहीर करण्यात आलेली आहे.

एरंडोल, पारोळा, धरणगाव तालुक्यात पाच दिवस जनता कर्फ्यु

एरंडोल,पारोळा आणि धरणगाव तालुक्यातील कोरोनाचा संसर्ग नियंत्रणात आणण्यासाठी उपविभागीय दंडाधिकारी विनय गोसावी यांनी एरंडोल, पारोळा, धरणगाव तालुका क्षेत्रात 23 मार्च 2021 रोजी पहाटे 1 वाजल्यापासून 27 मार्च 2021 रोजी रात्री 12 पर्यंत सर्व बाजारपेठा, आठवडी बाजार व दुकाने बंद ठेवण्याचे निर्देश दिले आहेत.

या कालावधीत सर्व बाजारपेठा, आठवडी बाजार बंद राहतील. किराणा दुकाने, अत्यावश्यक नसलेली सर्व दुकाने बंद राहतील. किरकोळ भाजीपाला, फळे खरेदी विक्री केंद्रे बंद राहतील. शैक्षणिक संस्था, शाळा, महाविद्यालये, खाजगी कार्यालये, सर्व प्रकारची धार्मिक स्थळे बंद राहतील. केवळ पुजारी दैनंदिन पुजा करेल व लोकांना प्रवेश बंद राहील. हॉटेल, रेस्टॉरंट बंद राहतील, तथापि घरपोच सुविधा आणि पार्सल सुविधा सुरू राहील.

सभा, मेळावे, बैठका, धार्मिक स्थळे, सांस्कृतिक, धार्मिक व तत्सम कार्यक्रम बंद राहतील. शॉपींग मॉल, मार्केट, बार्बर शॉप, स्पा, सलून, लिकर शॉप बंद राहतील. गार्डन, पार्क, बगीचे, सिनेमागृहे, नाट्यगृहे, व्यायामशाळा, जलतरण तलाव प्रेक्षकगृहे, क्रिडास्पर्धा, प्रदर्शने, मेळावे, संमेलने बंद राहतील. पानटपरी, हातगाड्या, उघड्यावर खाद्यपदार्थ विक्रीची ठिकाणे बंद राहतील.

दुध विक्री केंद्र, वैद्यकीय उपचार व सेवा, मेडिकल स्टोअर्स, रुग्णवाहिका सेवा, मेडीकल दुकाने, वृत्तपत्र सेवा, मिडीया सेवा, कुरिअर, पेट्रोलपंप, ( अत्यावश्यक व शासकीय सेवेसाठी ) रुग्णाला ने-आण करणारी रिक्षा सुरु राहतील. अत्यावश्यक सेवेसाठी गॅरेज, शासकीय कार्यालये ( 50% उपस्थितीत), पूर्वीचे नियोजीत परिक्षा असणारे शाळेचे केंद्र सुरु राहतील. आंतरराज्य व जिल्हा मान्यताप्राप्त वाहतूक ( जसे एस.टी. महामंडळ, पोस्ट विभागाचे वाहने) सुरु राहील. रेल्वे, विमान, बस सेवा सुरु राहतील.

नगरपरिषदेतील पाणीपुरवठा व स्वच्छता विभागातील अधिकारी कर्मचारी, आपत्ती व्यवस्थापनाशी संबंधीत घटक यांना सुट देण्यात आली आहे. तसेच इतर शासकीय आस्थापनांना ( उदा. कृषिविभाग, महावितरण, टेलिफोन) घरपोच सेवा, सुविधा कामे करावयाची झाल्यास कर्मचाऱ्यांची कोरोना चाचणी करुनच नागरिकांच्या घरी जाता येईल. यासाठी ओळखपत्र जवळ ठेवणे व तहसिल कार्यालय मधून पास घेणे आवश्यक राहील.

एरंडोल, पारोळा, धरणगाव या तालुका क्षेत्रात लागू करण्यात आलेल्या निर्बधाचे पालन होत आहे किंवा नाही याची जबाबदारी पोलीस विभाग व संबंधित स्थानिक स्वराज्य संस्था यांची राहील. सदर आदेशाचे उल्लघंन करणारी व्यक्ती भारतीय दंड संहिता 1860 (45) चे कलम 188, आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 मधील कलम 51 ते 60 व फौजदारी प्रक्रीया संहिता,1973 चे तरतुदीनुसार शिक्षेस पात्र राहील, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

एरंडोल, पारोळा, धरणगाव तालुक्यात पाच दिवस जनता कर्फ्यु

Next Post

जळगाव जिल्ह्यात 24 पासून कोविड 19 रुग्ण शोध मोहीम

Related Posts

५,०१२ सहाय्यक प्राध्यापक पदभरती; पारदर्शकतेसाठी शासनाच्या कडक सूचना

५,०१२ सहाय्यक प्राध्यापक पदभरती; पारदर्शकतेसाठी शासनाच्या कडक सूचना

September 3, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस एक वर्ष कारावास; जैन इरिगेशन कंपनीला ३० लाखांची नुकसानभरपाई

September 2, 2026
शिवतीर्थावर ५ सप्टेंबरला युवतींच्या दहीहंडीचा थरार!

शिवतीर्थावर ५ सप्टेंबरला युवतींच्या दहीहंडीचा थरार!

September 2, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेश अध्यक्ष यांच्या उपस्थितीत महिला प्रदेश अध्यक्ष पदाचा पदग्रहण करतांना सौ. शुभांगीताई राजपूत

संघटनेतील शेवटचा कार्यकर्ता हीच संघटनेची खरी ताकद : प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील

August 17, 2026
शिक्षणातून परिवर्तन शक्य; विद्यार्थी देशाचे उज्ज्वल भविष्य – प्रविण सपकाळे

शिक्षणातून परिवर्तन शक्य; विद्यार्थी देशाचे उज्ज्वल भविष्य – प्रविण सपकाळे

August 16, 2026
शिक्षणाचे स्वप्न उराशी बाळगून मोठे व्हा— जलसंपदा मंत्री ना. गिरीष महाजन

शिक्षणाचे स्वप्न उराशी बाळगून मोठे व्हा— जलसंपदा मंत्री ना. गिरीष महाजन

August 10, 2026
Next Post
जळगाव महानगर क्षेत्रात तीन दिवस जनता कर्फ्यु

जळगाव जिल्ह्यात 24 पासून कोविड 19 रुग्ण शोध मोहीम

ताज्या बातम्या

५,०१२ सहाय्यक प्राध्यापक पदभरती; पारदर्शकतेसाठी शासनाच्या कडक सूचना

५,०१२ सहाय्यक प्राध्यापक पदभरती; पारदर्शकतेसाठी शासनाच्या कडक सूचना

September 3, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस एक वर्ष कारावास; जैन इरिगेशन कंपनीला ३० लाखांची नुकसानभरपाई

September 2, 2026
शिवतीर्थावर ५ सप्टेंबरला युवतींच्या दहीहंडीचा थरार!

शिवतीर्थावर ५ सप्टेंबरला युवतींच्या दहीहंडीचा थरार!

September 2, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेश अध्यक्ष यांच्या उपस्थितीत महिला प्रदेश अध्यक्ष पदाचा पदग्रहण करतांना सौ. शुभांगीताई राजपूत

संघटनेतील शेवटचा कार्यकर्ता हीच संघटनेची खरी ताकद : प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील

August 17, 2026
शिक्षणातून परिवर्तन शक्य; विद्यार्थी देशाचे उज्ज्वल भविष्य – प्रविण सपकाळे

शिक्षणातून परिवर्तन शक्य; विद्यार्थी देशाचे उज्ज्वल भविष्य – प्रविण सपकाळे

August 16, 2026
शिक्षणाचे स्वप्न उराशी बाळगून मोठे व्हा— जलसंपदा मंत्री ना. गिरीष महाजन

शिक्षणाचे स्वप्न उराशी बाळगून मोठे व्हा— जलसंपदा मंत्री ना. गिरीष महाजन

August 10, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us