Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

जळगाव जिल्हा महसूल कर्मचारी संघटना राज्यव्यापी बेमुदत संपात सहभागी – जिल्हाध्यक्ष योगेश नन्नावरे

najarkaid by najarkaid
December 14, 2023
in Uncategorized
0
जळगाव जिल्हा महसूल कर्मचारी संघटना राज्यव्यापी बेमुदत संपात सहभागी – जिल्हाध्यक्ष योगेश नन्नावरे
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव,(प्रतिनिधी)- जुनी पेन्शन योजना व इतर मागण्यांसाठी राज्यात कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या राज्यव्यापी बेमुदत संपात जळगाव जिल्हा महसूल कर्मचारी संघटना आज दि.१४ डिसेंबर २०२३ पासून बेमुदत संपात १००% सहभागी झाले असून न्याय हक्कासाठी लढत असल्याचे जिल्हा महसूल कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष योगेश नन्नावरे यांनी सांगितले.

याबाबत सविस्तर असे की,माहे मार्च २०२३ मध्ये सरकारी/निमसरकारी, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी संघटना यांनी कर्मचा-यांच्या जिव्हाळ्याच्या प्रलंबित मागण्यांसाठी (जुनी पेन्शन योजना लागू करण्यासाठी बेमुदत संप आदोलन छेडले होते. तत्समयी मे. शासनाने सदर संपात मध्यस्थी करून संघटना प्रतिनिधींशी चर्चा केली. सदर चर्चेत आमची प्राधान्यक्रमावर असलेली जुनी पेन्शन सर्वांना मंजूर करा या मागणीबाबत लेखी हमी देऊन आम्हाला दिलासा दिला होता. तसेच इतर प्रलंबित मागण्यांबाबत सत्वर निर्णय घेतले जातील असेही निसंदिग्ध आश्वासन मे. शासनाने संघटनेस दिले होते. त्यामुळे शासन स्तरावरील कार्यवाही पूर्ण होण्यास वेळ मिळावा या उद्देशाने मे. शासनाने केलेल्या विनंती नुसार आम्ही संप आदोलन स्थगित केले होते. तरी कोणत्याही मागणी संदर्भात अंतीम ठोस निर्णय अद्याप होऊ शकला नाही.

तसेच संपाच्या आदल्यादिवशी दि. १३ डिसेंबर रोजी मा. राज्य संघटनेच्या पदाधिकाऱ्यांसोबत मे. शासनासोबत झालेल्या चर्चेत कोणताही तोडगा न निघाल्याने राज्यातील १७ लक्ष शासकीय कर्मचारी-शिक्षकांचा दि १४ डिसेंबर २०२३ पासून बेमुदत संप सुरु झालेला आहे.

तरी आज संपाच्या पहिल्या दिवशी जळगांव जिल्हयातील जिल्हा व तालुका स्तरावरील सर्व महसूल कर्मचारी संपात सहभागी झालेले आहेत. त्यामध्ये महसूल सहायक ( २००) अव्वल कारकून (१९२), मंडळ अधिकारी (११०). तलाठी (४२३), शिपाई (१३३) व वाहन चालक (२१) संवर्गातील सर्व कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. तसेच सदर संपास राजपत्रित अधिकारी महासंघ जळगांव व महाराष्ट्र राज्य तहसिलदार व नायब तहसिलदार संघटना यांनीही समक्ष संपाच्या स्थळी भेट देऊन संपास एक दिवसांचे सामुहिक रजा आंदोलन करून पाठिंबा दिलेला आहे. संपात खालील कर्मचारी अधिकारी उपस्थित होते.

श्री. सोपान कासार, निवासी उपजिल्हाधिकारी, श्री. गजेंद्र पाटोळे उपजिल्हाधिकारी, श्री. संजय गायकवाड उपजिल्हाधिकारी, श्रीमती जयश्री माळी, श्रीमती उषाराणी देवगुणे तहसिलदार, श्री. पंकज लोखंडे तहसिलदार, श्रीमती. शितल राजपूत तहसिलदार श्री. राहुल सोनवणे नायब तहसिलदार, श्री. प्रदीप झांबरे नायब तहसिलदार, श्री. योगेश नन्नवरे, जिल्हा अध्यक्ष, श्री. किरण बाविस्कर जिल्हा उपाध्यक्ष श्री. घनःशाम सानप कोषाध्यक्ष श्री. अतुल सानप, कार्याध्यक्ष श्री. दिपक चौधरी, सरचिटणीस श्रीमती रेखा चंदनकर सदस्य, श्रीमती. जागृती पवार, सदस्य, श्रीमती वैशाली पाटील, श्रीमती. श्रीदेवी भोपे, श्रीमती. परवीन तडवी, श्रीमती. पल्लवी खडके, श्रीमती. प्राजक्ता वाय, श्री. योगेश पाटील, श्री. के.एम पाटील, श्री. गणेश हटकर, श्री. हेमंत खैरनार, श्री. दिनेश उगले, श्री. विलास डोंगरे, श्री. शैलेश तरसोदे, श्री. विलास हरणे, श्री. चंद्रकांत कुंभार, श्री. ए.पी. कुलकर्णी, श्री. किरण लोहार, श्री. सुनिल निबाळकर, श्री. गजानन नरोटे, श्री. राहुल नवगिरे, श्री. नूर शेख, श्री. सुरेश महाले, श्री. कैलास महाले, श्री. उच्चव नन्नवरे, श्री. संदीप पाटील यांची उपस्थिती होती.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

धक्कादायक ; जळगाव येथील तरुणाने पाकिस्तानातील हस्तकाला पुरवली गोपनीय माहिती ; ATS पथकाच्या तपासात अनेक गोष्टी उघड

Next Post

जुन्या पेन्शनबाबत येत्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात अंतिम निर्णय घेणार; मुख्यमंत्र्यांचे सभागृहात निवेदन

Related Posts

Wunderino Casino No Deposit Bonus Codes: Kostenlos Online-Casino spielen mit Gratis-Startguthaben

October 13, 2026

Lucky Ones Online Casino Review: Play Casino Online with Aussie Focus

October 6, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
शिरसोलीत ‘जीवनधारा’ शुद्ध पेयजल योजनेचा शुभारंभ – गांधी रिसर्च फाउंडेशनचा उपक्रम

शिरसोलीत ‘जीवनधारा’ शुद्ध पेयजल योजनेचा शुभारंभ – गांधी रिसर्च फाउंडेशनचा उपक्रम

September 7, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना सुप्रीमो संस्थापक अध्यक्ष स्व. सुखदेसिहंदादा गोगामेडी यांच्या जयंतीनिमित्त जळगावात १२ जुलै रोजी भव्य कार्यक्रम

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना सुप्रीमो संस्थापक अध्यक्ष स्व. सुखदेसिहंदादा गोगामेडी यांच्या जयंतीनिमित्त जळगावात १२ जुलै रोजी भव्य कार्यक्रम

July 5, 2026
Next Post
जुन्या पेन्शनबाबत येत्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात अंतिम निर्णय घेणार; मुख्यमंत्र्यांचे सभागृहात निवेदन

जुन्या पेन्शनबाबत येत्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात अंतिम निर्णय घेणार; मुख्यमंत्र्यांचे सभागृहात निवेदन

ताज्या बातम्या

Wunderino Casino No Deposit Bonus Codes: Kostenlos Online-Casino spielen mit Gratis-Startguthaben

October 13, 2026
मोठी बातमी : ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

मोठी बातमी : ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

October 8, 2026

Lucky Ones Online Casino Review: Play Casino Online with Aussie Focus

October 6, 2026
स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

September 30, 2026

Exploring european casino awards 2024 winners and trends (2)

October 16, 2026
जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us