Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

चाळीसगावकरांना कायमस्वरूपी शिवपुतळा हवा; देखाव्याचा नको !

najarkaid by najarkaid
December 5, 2019
in जळगाव
0
चाळीसगावकरांना कायमस्वरूपी शिवपुतळा हवा; देखाव्याचा नको !
ADVERTISEMENT

Spread the love

चाळीसगाव – अनेक वर्षांपासून चाळीसगावकर व लाखों शिवभक्तांची इच्छा असलेले छत्रपती शिवाजी महाराज यांचा भव्यदिव्य पुतळा शहरात नियोजित छत्रपती शिवाजी महाराज चौकात व्हावा, यासाठी गेल्या अनेक वर्षांपासून शिवभक्तांचा लढा चालू आहे.

भाजपाच्या सत्ताकाळात पुतळा बसविण्यासाठी विशेष प्रयत्न झाले, तसेच पुतळा बनविण्यासाठी दुसर्‍यांदा वर्कऑर्डरही देण्यात आली. परंतू गेल्या तीन महिन्यांपासून गणपतीच्या काळावंधीत नियोजित जागी देखवाव्यासाठी ठेवण्यात आलेला शिवपुतळा आजुनही तसाच आहे. हा पुतळा कुठल्याही पध्दतीचे बांधकाम न करता, अंधारीत एक ‘ तात्पुरता ’ चबुतरा उभारुन ठेवण्यात आला आहे.  पुतळा रहदारीच्या ठिकाणी असल्यामुळे एखाद्या वाहनाचा धक्का लागून खाली पडू शकतो. त्यामुळे जातीय सखोला व शांतता बिघडण्याची शक्यता नाकारता येत नाही. शिवपुतळा व्हावा ही चाळीसगाव करांची ईच्छा आहे.

परंतू देखाव्यासाठीचा नव्हे तर कायस्वरुपी ! तसेच देखाव्यासाठीचा पुतळा त्वरित काढून घ्यावा याबाबतचे पत्र संबंधीत गणपती मंडळ व पोलीस निरिक्षकांना देण्यात आल्याची माहिती सुत्रांकडून मिळाली आहे. चाळीसगाव शहरात अनेक वर्षांपासून लाखों शिवभक्तांची इच्छा असलेले छत्रपती शिवाजी महाराज यांचा भव्यदिव्य पुतळा नियोजित जागेत सिग्नल चौकात (छत्रपती शिवाजी महाराज चौकात) व्हावा, म्हणून चाळीसगाव शहरातील असंख्य शिवप्रेमी बांधवांनी व विविध संघटनानी आंदोलने केली आहेत. शहरातील संभाजी सेनेच्यावतीन पुतळ्यासाठी सलग 21 दिवस आमरण उपोषण आंदोलन केले होते.

शिवपुतळ्यासाठी सत्ताधारी भाजपा व शहर विकास आघाडी यांच्यात सर्वसाधारण सभेत अनेकदा खंडाजणी झाली. त्यानतंर नगराध्यक्षांसह सर्व नगरसेवक यांनी कुठलाही विरोध न करता एक मताने शिवपुतळा व शिवसृष्टीचा विषय मंजूर करून, औरंगाबाद येथील एका कलाकाराला शिवपुतळा तयार करण्यासाठी वर्कऑर्डर सुद्धा दिली होती.

सत्ताधारी व विरोधकांमध्ये पुतळ्याचे मॉडेल बघण्यासाठी सुध्दा गेले होते. त्यानतंर सत्ताधारी-सत्ताधारी व विरोध यांच्यामध्ये पुन्हा मतभेद होऊन, दिलेली वर्कऑर्डर रद्द नामुष्की येवून, नव्याने निविदा काढण्यात आली. पुन्हा एकमताने निविदा मंजुर करुन, नाशिकच्या गर्गे आर्ट गॅलरीस शिवाजी महाराज पुतळा तयार करण्याचे काम देऊन, वर्क ऑर्डर नुकतीच देण्यात आली.

शिवपुतळा तयार करण्यासाठी वर्क ऑर्डरवरुन न.पा.त. मतभेद सुरु असतानाचा दरम्यानच्या काळात गणपती उत्सव आला. आणि शिवपुतळ्याच्या नियोजित जागी म्हणजेच सिग्लन पाँईट जवळ त्रिकोणी जागेत, शिवपुतळाचा देखावा (प्रतिकृती) म्हणून शिवपुतळा ठेवण्यासाठी शहरातील ‘ शिवछत्रपती शिवाजी गणेश मित्र मंडळा’च्यावीते न.पा.कडे परवागी मागण्यात आली. परंतू पुतळा ठेवल्यास रहदारीस अडथळा निर्माण होईल, असा शेरा त्या पत्रावर संबंधीत आधिकार्‍यांनी दिला होता. तरी देखील गणपती उत्सावाच्या काळात ‘उत्साहा’ च्या भरात हा भव्यदिव्य शिवपुतळा  तात्पुरता चबुतरा उभारुन ठेवण्यात आला.

गणपती उत्सव संपताच हा पुतळा काढणे संबंधीत गणेश मंडळाची जबाबदारी होती. परंतू गेल्या तीन महिन्यांपासून हा पुतळा त्याठिकाणी तसाच ‘धुळ’ खात उभा आहे. पुतळ्याच्या देखभालीची कोन्ही जबाबदारी घेतलेली नाही. काही तरुणानी नुकतीच ह्या पुतळ्याची स्वच्छता करुन, डिजेच्या तालावर आरती देखील केली. पुतळा काढण्यासाठी नगरपरिषदेकडून दि.31 ऑक्टो. रोजी संबंधीत गणपती मंडळलास व पोलीस विभागाला पत्र देखील देण्यात आले आहे, परंतू तरी देखील पुतळा जैसे थे आहे.

हा पुतळा दोन रस्त्याच्या टोकावर त्रिकोणी जागेत ठेवण्यात आल्यामुळे, कुठल्याही क्षणी एखाद्या वाहनाची धडक बसू शकते, आणि त्यामुळे पुतळ्याची तुटफूट होवून शहराची शांतता बिघडण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे देखाव्यासाठी ठेवण्यात आलेला पुतळा त्वरित काढून, नवा कायस्वरुपी प्रस्तावित पुतळा बसविण्यात यावा अशी चाळीसगावकरांची इच्छा असून तशा चर्चा देखील गेल्या अनेक दिवसांपासून सुरु आहेत.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

प्रा. आरोग्य केंद्राच्या आशा गाजरे यांना ‘फ्लोरेन्स नाईटिंगेल’ पुरस्कार

Next Post

प्रभारी ग.शि.अ.विजय पवार यांच्या कार्याचा गौरव

Related Posts

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा – मंत्री गिरीश महाजन

September 7, 2026
अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन

अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन

September 7, 2026
Next Post
प्रभारी ग.शि.अ.विजय पवार यांच्या कार्याचा गौरव

प्रभारी ग.शि.अ.विजय पवार यांच्या कार्याचा गौरव

ताज्या बातम्या

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा – मंत्री गिरीश महाजन

September 7, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us