Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

घरोघर चिठ्ठ्या वाटणाऱ्या ‘राष्ट्रीय’ नेत्याबाबत काय बोलावं; पवारांचा खोचक टोला

najarkaid by najarkaid
February 14, 2020
in राज्य, राजकारण
0
घरोघर चिठ्ठ्या वाटणाऱ्या ‘राष्ट्रीय’ नेत्याबाबत काय बोलावं; पवारांचा खोचक टोला
ADVERTISEMENT

Spread the love

कोल्हापूर –  भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील  हे अनेकदा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष  शरद पवार  यांच्यावर टीका करतात. पवारांनीही चंद्रकांत पाटलांना चांगलाच खोचक टोला लगावला आहे. दिल्ली विधानसभा निवडणुकीत घरोघर चिठ्ठ्या वाटणाऱ्या ‘राष्ट्रीय’ नेत्यावर आपण काय बोलावं, असा टोला पवारांनी लगावला. चिठ्ठ्या वाटल्याबाबत खरं काय आणि खोटं काय माहित नाही. पण वर्तमानपत्रात वाचलं होतं, असंही सांगायला पवार विसरले नाहीत. 

दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर शरद पवारांनी भाजपवर निशाणा साधला होता. याला प्रत्युत्तर देताना चंद्रकांत पाटील म्हणाले की, ‘काँग्रेसने दिल्लीत आम आदमी पक्षासोबत भाजपला हरवण्यासाठी हातमिळवणी केली होती.’ शिवाय ‘आप’ला मिळालेल्या यशात शरद पवारांचं काहीही योगदान नाही, त्यामुळे त्यांनी त्याचा टेंभा मिरवू नये, असा सल्लाही चंद्रकांत पाटलांनी दिला होता.

लोकसभा निवडणूक असो किंवा विधानसभा, चंद्रकांत पाटलांनी शरद पवारांवर टीका करण्याची एकही संधी सोडली नाही. त्यामुळे आता आपल्याला शरद पवारांवर पीएचडी करायची असल्याचं ते म्हणाले होते. ‘गेल्या ५० वर्षांपासून राजकारणात असूनही पवारांना १० च्या वर खासदार निवडून आणता आले नाही. पण तरीही ते राजकारणात केंद्रबिंदू कसे काय असतात?’ असा सवाल करत त्यांच्यावर पीएचडी करणार असल्याचं चंद्रकांत पाटील म्हणाले होते.

दिल्ली हे देशातील इतर शहरांपेक्षा वेगळं शहर आहे. तिथं अनेक राज्यांतील लोक आहेत. त्यामुळं दिल्लीच्या निवडणुकीचा निकाल हा त्या राज्यापुरता मर्यादित नाही. बदलाचं वातावरण देशभरात आहे. भाजपच्या पराभवाची मालिका सुरू झाली आहे आणि ती आता थांबणार नाही,’ असा ठाम दावा शरद पवार यांनी केला.

शरद पवार यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेऊन निकालाचं विश्लेषण केलं होतं. मोदी-शहांच्या राजकारणावर त्यांनी सडकून टीका केली. ‘दिल्लीच्या निवडणुकीचा अंदाज मी दिल्लीत असताना घेतला होता. माझ्या तिथल्या निवासस्थानातील कर्मचाऱ्यांशी बोललो होतो. मराठी भाषिक लोक राहत असलेल्या करोल बागमध्येही मी कानोसा घेतला होता. सगळे केजरीवालांचं नाव घेत होते. मागील वेळी भाजपला मत देऊन फसल्याची त्यांची भावना होती. याउलट केजरीवालांनी त्यांच्या दैनंदिन समस्या सोडवल्याचं त्यांचं म्हणणं होतं. त्यामुळं दिल्लीच्या निकालाचं मला अजिबात आश्चर्य वाटलं नाही. भाजपचा पराभव होणारच होता,’ असं पवार म्हणाले.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

मल्हार हेल्प-फेअर ३ चा आज भव्य शुभारंभ मदतीचे हजारो हात आज येणार एकाच छताखाली

Next Post

सुप्रिया सुळेंच्या एका ट्विटवर पुणे विद्यापीठानं केला ‘हा’ कार्यक्रम रद्द

Related Posts

रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

July 24, 2026
ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

July 23, 2026
Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

May 1, 2026
जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

April 27, 2026
ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

April 26, 2026
जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

April 26, 2026
Next Post
सुप्रिया सुळेंच्या एका ट्विटवर पुणे विद्यापीठानं केला ‘हा’ कार्यक्रम रद्द

सुप्रिया सुळेंच्या एका ट्विटवर पुणे विद्यापीठानं केला 'हा' कार्यक्रम रद्द

ताज्या बातम्या

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

July 30, 2026
पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

July 24, 2026
पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

July 24, 2026
रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

July 24, 2026
ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

July 23, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील यांचे नंदुरबारमध्ये जंगी स्वागत; समाजबांधवांशी साधला संवाद

July 17, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us