Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकारी आणि संगणक परिचालकांना २५ लाख रुपयांचे विमा संरक्षण – ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांची माहिती

najarkaid by najarkaid
April 8, 2020
in Uncategorized
0
ADVERTISEMENT

Spread the love

  • गावपातळीवरील हे कर्मचारी म्हणजे कोरोनाविरुद्धच्या लढ्यातील सैनिकच

मुंबई, दि. ८ : कोरोना विषाणुचा प्रदुर्भाव रोखण्यासाठी गावांमध्ये काम करणारे अंगणवाडी सेविका, मदतनीस, आशा वर्कर, ग्रामपंचायत कर्मचारी यांच्याबरोबरच आता राज्यातील सर्व ग्रामपंचायतींचे ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकारी आणि आपले सरकार सेवा केंद्रांतर्गत काम करणारे केंद्र चालक (संगणक परिचालक) यांनाही २५ लाख रुपयांचे विमा संरक्षण देण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती राज्याचे ग्रामविकास मंत्री श्री. हसन मुश्रीफ यांनी दिली.

मंत्री श्री. मुश्रीफ म्हणाले की, कोरोनाचा प्रदुर्भाव रोखणे, यासाठी घ्यावयाच्या दक्षतांबाबत घरोघरी जाऊन लोकांचे प्रबोधन करणे, संशयीत रुग्णांना मार्गदर्शन व मदत करणे यासाठी गावपातळीवरील अंगणवाडी सेविका, मदतनीस, आशा वर्कर, ग्रामपंचायत कर्मचारी, ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकारी, संगणक परिचालक आदी सर्वजण अहोरात्र काम करीत आहेत. जीवाची जोखीम पत्करुन काम करणारे ग्रामीण पातळीवरील हे सर्व कर्मचारी म्हणजे कोरोनाविरुद्धच्या लढ्यातील सैनिकच आहेत. केंद्र सरकारने कोरोना रोखण्यासाठी कार्यरत आरोग्य कर्मचाऱ्यांचा ५० लाख रुपयांचा विमा उतरविण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यात ग्रामीण भागात या कामात इतर ग्रामीण कर्मचारीही कार्यरत असल्याने राज्य शासनाने ३१ मार्च रोजी परिपत्रक काढून गावपातळीवरील अंगणवाडी सेविका, मदतनीस, आशा वर्कर, ग्रामपंचायत कर्मचारी यांना ९० दिवसांकरीता २५ लाख रुपयांचे विमा संरक्षण देण्याचा निर्णय घेतला आहे. आता हा निर्णय अधिक व्यापक करुन यामध्ये ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकारी आणि संगणक परिचालक यांचाही समावेश करण्यात आला असून आता त्यांनाही ९० दिवसांकरीता २५ लाख रुपयांचे विमा संरक्षण देण्यात आले आहे, असे त्यांनी सांगितले.

संगणक परिचालक हे कंत्राटी पद्धतीवर कार्यरत कर्मचारी आहेत. कोरोनाविरुद्धच्या लढ्यात ते गावागावांमध्ये जीवाची जोखीम पत्करुन काम करीत आहेत. ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकारी हेही अहोरात्र काम करीत आहेत. त्यामुळे त्यांना विमा संरक्षण देण्याचा निर्णय शासनाच्या ग्रामविकास विभागाने घेतला असल्याचे मंत्री श्री. मुश्रीफ यांनी सांगितले. यासंदर्भात ३१ मार्च २०२० रोजीच्या परिपत्रकात दुरुस्ती करणारे शुद्धीपत्रक आज निर्गमित करण्यात आले आहे.

दरम्यान, ३१ मार्च रोजीच्या परिपत्रकान्वये गावांमध्ये कोरोना रोखण्यासाठी कार्यरत अंगणवाडी सेविका, मदतनीस, आशा वर्कर, ग्रामपंचायत कर्मचारी यांना त्यांच्या नियमीत वेतनाव्यतिरिक्त १ हजार रुपये अतिरिक्त रक्कम देण्याचा निर्णय ग्रामविकास विभागाने घेतला असून त्यासंदर्भात सर्व जिल्हा परिषदांना सूचना पाठविण्यात आल्या आहेत. लवकरच हे मानधन या कर्मचाऱ्यांना देण्यात येत आहे, असे मंत्री श्री. मुश्रीफ यांनी सांगितले.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

जिल्ह्यात 20 एप्रिलपर्यंत 37 (1) (3) कलम लागू

Next Post

महाराष्ट्र कोरोना संसर्गाच्या तिसऱ्या टप्प्यात नाही !

Related Posts

https://play-bun.online/ Handles a Busy Background Better Than Most for Smooth Gameplay

October 21, 2026

Wunderino Casino No Deposit Bonus Codes: Kostenlos Online-Casino spielen mit Gratis-Startguthaben

October 13, 2026

Lucky Ones Online Casino Review: Play Casino Online with Aussie Focus

October 6, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
शिरसोलीत ‘जीवनधारा’ शुद्ध पेयजल योजनेचा शुभारंभ – गांधी रिसर्च फाउंडेशनचा उपक्रम

शिरसोलीत ‘जीवनधारा’ शुद्ध पेयजल योजनेचा शुभारंभ – गांधी रिसर्च फाउंडेशनचा उपक्रम

September 7, 2026
Next Post
राज्यात आणखी ४ जण करोना बाधित रुग्ण आढळले !

महाराष्ट्र कोरोना संसर्गाच्या तिसऱ्या टप्प्यात नाही !

ताज्या बातम्या

https://play-bun.online/ Handles a Busy Background Better Than Most for Smooth Gameplay

October 21, 2026
माध्यमिक विद्यालय दोनगावचे मुख्याध्यापक प्रकाश पाटील यांना राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान

माध्यमिक विद्यालय दोनगावचे मुख्याध्यापक प्रकाश पाटील यांना राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान

October 21, 2026

Wunderino Casino No Deposit Bonus Codes: Kostenlos Online-Casino spielen mit Gratis-Startguthaben

October 13, 2026
मोठी बातमी : ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

मोठी बातमी : ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

October 8, 2026

Lucky Ones Online Casino Review: Play Casino Online with Aussie Focus

October 6, 2026
स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

September 30, 2026
Load More

2

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us