Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

गुढे येथील जुवार्डी पूल ते जुवार्डी रस्ता प्रकरणी समाजकंटकांनी घातला पुन्हा एकदा खोडा !

najarkaid live by najarkaid live
November 15, 2019
in जळगाव
0
गुढे येथील जुवार्डी पूल ते जुवार्डी रस्ता प्रकरणी समाजकंटकांनी घातला पुन्हा एकदा खोडा !
ADVERTISEMENT

Spread the love

गुढे ता.भडगाव (प्रतिनिधी) गेल्या ३० वर्षांहून अधिक काळ लोटला असेल पण आजही गुढे आणि जुवार्डी शिवारातील एकूण तब्बल दीड हजार एकर काळीभोर जमीन असलेल्या तसेच ९०,००० ते ९५,००० लिंबाची झाडे असलेल्या ह्या बळीराजाला साधा पायी चालण्याजोगा सुद्धा रस्ता नाही.

आजही गुढे येथील शेतकरी, मजूर किमान ३ फूट पाणी आणि चिखल असलेल्या नाल्यातून पायपीट करत आपापले शेत गाठतात. गावकऱ्यांची अशी धारणा आहे कि येथे काही दशकांपूर्वी गुढे आणि जुवार्डी गावाला जोडणारा, २१ फूट रुंदी असणारा पुलापासून सरळमार्गी रस्ता होता. नंतर काही धनाढ्य समाजघटकांनी राजकारणी लोकांच्या मदतीने तो रस्ता फस्त करून टाकला. आणि पुन्हा भविष्यात शासकीय पाहणी झालीच तर आपण केलेला धूर्तपणा उघडकीस यायला नको म्हणून शेजारीच शेती असणाऱ्या आपल्याच काही भावंडांच्या शेतात जमाबंदी योजनेच्या काळात काही शासकीय अधिकाऱ्यांना हाताशी धरून नकाशावर तो रस्ता फेऱ्यातून का होईना टाकून घेतला. ज्या नाल्यातून रोज तब्बल १००० हुन अधिक शेतकरी, शेतमजूर, मेंढपाळ जीव मुठीत धरून वावरतात ते गुढे गाव एवढे धनाढ्य असून सुद्धा गावातल्या शेतकऱ्यांवर नाल्यातुन चालत जाण्याची परिस्थिती उद्भवते आहे हि बाब गावासाठी लज्जास्पद आहे. एका गृहस्थाने ४ वर्षांपूर्वी ह्या विषयावर आवाज उठवत न्याय मिळण्याची अपेक्षा चावडीवर व्यक्त केली होती तेव्हा ह्याच समाजकंटकांनी त्या निष्पाप गृहस्थांवर दमदाटी केली होती, आणि दुर्दैव असे कि गेल्या काही दिवसांपूर्वीच त्या गृहस्थांच्या भावावर त्याच शिवारात हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने घाला घातला. पण दुर्भाग्य हे कि शेतातून दवाखान्यापर्यंत जायच्या आधीच त्यांची प्राणज्योत मालवली. नाल्यातून ये-जा करणे इतके अशक्य आहे कि एखाद्या व्यक्तीला शारीरिक समस्या उद्भवल्यास किमान २ तास तरी प्राथमिक उपचार पुरवले जाऊ शकत नाहीत. आणि ह्याच पार्श्वभूमीवर काही युवकांनी पुढाकार घेऊन नाल्याबद्दल मंत्री महोदयांकडे तक्रार करायचे ठरवले असता गावातून प्रतिसाद सुद्धा प्रचंड मिळाला. पण शेवटी गावात बोटावर मोजण्याइतकी संख्या असलेली दुर्जन शक्ती एवढी पॉवरफुल आहे कि त्यांनी तब्बल ४०० गृहस्थांना ज्यांनी स्वाक्षऱ्या दिल्या होत्या त्यांना घरोघरी जाऊन धमकावण्यास सुरुवात केली. जी समाजकंटके जुवार्डी शिवारातील त्यांच्या शेतात जात असताना दुसऱ्याच्या शेतातून लेखी रस्ता नसताना बळजबरी वापरतात ते मात्र अख्या गावातल्या भोळ्या जनतेला आमच्या शेतातल्या रस्त्याने वापरलास तर तिथेच आडवा करिन अशी धमकी देतात. त्याची परिणीती एवढी वाईट झाली कि त्या स्वाक्षरी करणाऱ्या गृहस्थांना रडत, भयभीत होत स्वाक्षऱ्या खोडाव्या लागल्या. आज ह्या विषयात संपूर्ण गाव दहशतीच्या काळ्या ढगांच्या सावलीखाली आले आहे. असो, शेवटी हि दुसऱ्यांदा उभारलेली चळवळ सुद्धा संपली, कारण आज त्या तरुणांमध्ये भयभीत मानसिकता आहे आणि ते ह्या विषयात माघारीचे सूर बोलायला लागले आहेत. पण ह्या विषयात ह्या तरुणांनी समाजहितासाठी किमान एवढी हिम्मत तरी केली, ह्याविषयी त्यांचे पंचक्रोशीतून कौतुक होत आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

क्रिकेट आणि राजकारणात खूप फरक असतो; थोरातांचा गडकरींना टोला

Next Post

शरद पवार म्हणाले, मी पुन्हा येईन!; फडणवीसांना टोला

Related Posts

जळगाव जिल्ह्यातील सुरुवात : मुलींच्या स्वप्नांना नवे पंख देणारी -बालिका स्नेही पंचायत

जळगाव जिल्ह्यातील सुरुवात : मुलींच्या स्वप्नांना नवे पंख देणारी -बालिका स्नेही पंचायत

August 20, 2025
प्रवीणसिंह पाटील(राजपूत) यांची करणी सेना महाराष्ट्र कार्यकारी प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती

प्रवीणसिंह पाटील(राजपूत) यांची करणी सेना महाराष्ट्र कार्यकारी प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती

August 18, 2025
पत्रकार अनिलआबा येवले यांची पाचोरा पीपल्स बँकेत निमंत्रित सदस्यपदी नियुक्ती

पत्रकार अनिलआबा येवले यांची पाचोरा पीपल्स बँकेत निमंत्रित सदस्यपदी नियुक्ती

August 17, 2025
धरणगाव पंचायत समिती आढावा बैठक संपन्न –   समन्वयाने काम करा, योजनांची गती वाढवा : पालकमंत्री गुलाबराव पाटील

धरणगाव पंचायत समिती आढावा बैठक संपन्न –  समन्वयाने काम करा, योजनांची गती वाढवा : पालकमंत्री गुलाबराव पाटील

August 17, 2025
Jalgaon news : जिल्हा नियोजन मधून झालेल्या कामाचे विशेष कौतुक ;   येत्या बजेट मध्ये जिल्ह्याला निधी देणार वाढवून  – उपमुख्यमंत्री अजित पवार   

Jalgaon news : जिल्हा नियोजन मधून झालेल्या कामाचे विशेष कौतुक ;  येत्या बजेट मध्ये जिल्ह्याला निधी देणार वाढवून – उपमुख्यमंत्री अजित पवार  

August 17, 2025
जळगावच्या मेडिकल हबची उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून पाहणी

जळगावच्या मेडिकल हबची उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून पाहणी

August 17, 2025
Next Post
शरद पवार म्हणाले, मी पुन्हा येईन!; फडणवीसांना टोला

शरद पवार म्हणाले, मी पुन्हा येईन!; फडणवीसांना टोला

ताज्या बातम्या

15,631 पोलिस शिपायांची मेगा भरती जाहीर – अर्ज प्रक्रिया सुरू, जाणून घ्या संपूर्ण तपशील

Maharashtra Police Bharti 2025: 15,631 पोलिस शिपायांची मेगा भरती जाहीर – अर्ज प्रक्रिया सुरू, जाणून घ्या संपूर्ण तपशील

October 28, 2025
SBI Recruitment 2025: स्टेट बँकेत ३५०० नवीन पदांची भरती लवकरच; उमेदवारांसाठी सुवर्णसंध

SBI Recruitment 2025: स्टेट बँकेत ३५०० नवीन पदांची भरती लवकरच; उमेदवारांसाठी सुवर्णसंध

October 28, 2025
कृषी विभागाचा मोठा निर्णय : शेतकऱ्यांसाठी कायमस्वरूपी सिम कार्ड योजना, संवाद होणार अधिक सुलभ

कृषी विभागाचा मोठा निर्णय : शेतकऱ्यांसाठी कायमस्वरूपी सिम कार्ड योजना, संवाद होणार अधिक सुलभ

October 27, 2025
Government Gratuity Limit Update: लाखो कर्मचारी वंचित

Government Gratuity Limit Update: लाखो कर्मचारी वंचित!

October 27, 2025
KYC प्रक्रिया थांबली, पण पैसे लवकरच जमा होणार — लाडकी बहीण योजनेचा नवा निर्णय

KYC प्रक्रिया थांबली, पण पैसे लवकरच जमा होणार — लाडकी बहीण योजनेचा नवा निर्णय

October 27, 2025
IB ACIO Tech Recruitment 2025 : गुप्तचर विभागात सुवर्णसंधी! 258 पदांसाठी भरती, अर्ज प्रक्रिया सुरू

IB ACIO Tech Recruitment 2025 : गुप्तचर विभागात सुवर्णसंधी! 258 पदांसाठी भरती, अर्ज प्रक्रिया सुरू

October 27, 2025
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us