Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

गांधी विचार संपविणारे सत्तेत: कुमार केतकर

najarkaid by najarkaid
October 2, 2019
in राजकारण
0
गांधी विचार संपविणारे सत्तेत: कुमार केतकर
ADVERTISEMENT

Spread the love

पुणे – अब्राहम लिंकनच्या मारेकर्‍याचे पुतळे अमेरिकेत उभारले जात नाहीत. भारतात नथुरामचे पुतळे उभारले जातात, मृत्यूदिनी अभिवादन केले जाते. प्रज्ञासिंग ठाकूर नथुरामचे समर्थन करून खासदार होते. गांधी विचार संपविणारे सत्तेत जातात, हा गांधीजींचा नव्हे, तर भारतीय म्हणून आपल्या सर्वांचा पराभव आहे,’ अशी टीका ज्येष्ठ पत्रकार खासदार कुमार केतकर यांनी मंगळवारी केली. ’जसा विचार मांडला, तसाच गांधीजींचा आचार होता; म्हणून वेगळा प्रचार त्यांना करावा लागला नाही,’ असा टोला त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना उद्देशून लगावला.
महाराष्ट्र गांधी स्मारक निधीतर्फे आयोजित ’राष्ट्रपिता महात्मा गांधी सप्ताहा’चे उद्घाटन कुमार केतकर यांच्या हस्ते झाले. त्या वेळी ते बोलत होते. संस्थेचे अध्यक्ष डॉ. कुमार सप्तर्षी, सचिव अन्वर राजन; तसेच मोहन छाजेड, जांबुवंत मनोहर, तुषार झरेकर, अप्पा अनारसे उपस्थित होते.
’नेल्सन मंडेला, मार्टिन ल्युथर किंग, गोर्बाचेव्ह ते बराक ओबामा या सर्व जागतिक नेत्यांना गांधीजींची प्रेरणा होती. सेंद्रिय शेती, रासायनिक मुक्त अन्न, अण्वस्त्र मुक्त जग हे विचार गांधीजींनी मांडले आहेत. गांधींचा वारसा सर्वाधिक शुद्ध, भव्य आणि मानवतावादी आहे आणि तोच पुढे नेला पाहिजे,’ असे सांगून ’गांधीजी नसते, तर आपल्याला इतका मोठा वैचारिक वारसा कोणी दिला असता,’ असा सवाल केतकर यांनी केला. ’बहुमत असले, तरी संविधान बदलता येणार नाही, असे गांधी विचारांच्या आधारे आपल्याला सांगता आले पाहिजे,’ असे सप्तर्षी यांनी ठणकावले.
शरद जोशी, मौलाना इसहाक, ग्यानी अमरजित सिंह, मृणालिनी छाजेड, भंते सुदर्शन, नोएल माजगावकर यांनी सर्वधर्मीय प्रार्थना सादर केली. ज्येष्ठ गांधीवादी कार्यकर्त्या वासंती सौर यांनी कस्तुरबा गांधींवर लिहिलेल्या पुस्तकाचे प्रकाशन झाले. नागपूर ते पुणे सायकल यात्रेतील सहभागी व्यक्तींचा सत्कार करण्यात आला. गांधीजींच्या जीवनकार्यावरील छायाचित्रांचे प्रदर्शन ’दक्षिणायन’चे समन्वयक संदेश भंडारे यांच्या हस्ते झाले. संदीप बर्वे यांनी सूत्रसंचालन केले. दहावे वर्ष असलेल्या महोत्सवात 7 ऑक्टोबरपर्यंत विविध कार्यक्रम होणार आहेत.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

शरद पवार महाराष्ट्र दौर्‍यावर

Next Post

चीनचं शक्तीप्रदर्शन; भारताची मोठी मिलिटरी ड्रील

Related Posts

राजकारणात मोठा भूकंप? शरद पवारांचे अर्धे खासदार शिंदेंच्या संपर्कात? राज्यात खळबळ

राजकारणात मोठा भूकंप? शरद पवारांचे अर्धे खासदार शिंदेंच्या संपर्कात? राज्यात खळबळ

March 27, 2026
जळगाव महापालिका निवडणूक : महायुतीच्या प्रभागनिहाय उमेदवारांची संपूर्ण यादी एका क्लिकवर वाचा

जळगाव महापालिका निवडणूक : महायुतीच्या प्रभागनिहाय उमेदवारांची संपूर्ण यादी एका क्लिकवर वाचा

December 30, 2025
माजी मंत्री अण्णा डांगे यांचा दोन पुत्रांसह भाजपामध्ये प्रवेश

माजी मंत्री अण्णा डांगे यांचा दोन पुत्रांसह भाजपामध्ये प्रवेश

July 30, 2025
Prafull Lodha Honeytrap : आ.खडसे-लोढा बोलतांनाचे फोटो व्हायरल; खडसेंच्या 'गुलाबी गप्पांवर' 'ये रिश्ता क्या कहलाता है?' महाजनांचा थेट सवाल?

Prafull Lodha Honeytrap : आ.खडसे-लोढा बोलतांनाचे फोटो व्हायरल; खडसेंच्या ‘गुलाबी गप्पांवर’ ‘ये रिश्ता क्या कहलाता है?’ महाजनांचा थेट सवाल?

July 24, 2025
Kotate Resignation

Kokate Resignation | उपमुख्यमंत्री अजितदादा पवार घेणार निर्णय, फडणवीसांची स्पष्ट भूमिका!

July 22, 2025
maharashtra politic

Maharashtra Politics :फडणवीस मंत्रिमंडळातील ७ मंत्र्यांना देणार ‘डच्चू’? ते मंत्री कोण?

July 21, 2025
Next Post
चीनचं शक्तीप्रदर्शन; भारताची मोठी मिलिटरी ड्रील

चीनचं शक्तीप्रदर्शन; भारताची मोठी मिलिटरी ड्रील

ताज्या बातम्या

हिंदूसूर्य महाराणा प्रतापसिंह जयंतीनिमित्त जळगावात भव्य शोभायात्रेचे आयोजन

हिंदूसूर्य महाराणा प्रतापसिंह जयंतीनिमित्त जळगावात भव्य शोभायात्रेचे आयोजन

May 8, 2026
कोचुर खुर्दच्या सरपंच ज्योती कोळी पुन्हा अपात्र; जिल्हाधिकाऱ्यांचा मोठा निर्णय

कोचुर खुर्दच्या सरपंच ज्योती कोळी पुन्हा अपात्र; जिल्हाधिकाऱ्यांचा मोठा निर्णय

May 7, 2026
Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

May 1, 2026
शेतकऱ्यांच्या आड येणाऱ्यांची गय करू नका–  पालकमंत्री गुलाबराव पाटील

शेतकऱ्यांच्या आड येणाऱ्यांची गय करू नका–  पालकमंत्री गुलाबराव पाटील

April 27, 2026
जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

April 27, 2026
ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

April 26, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us