मुंबई : देशात महिलांवर होणारे अत्याचार काही केल्या कमी होत नसून त्यातच ब्लॅकमेलिंग सारखे गंभीर गुन्हे देखील समोर येत आहे. अशातच तरुणीने आपल्याच मैत्रिणीचा बाथरुममध्ये आंघोळ करतानाचा व्हिडीओ बनवला. आणि तो व्हायरल केला आहे.
ही घटना कर्नाटक मधील भारतीय क्रीडा प्राधिकरण केंद्रात घडली असून जेव्हा पीडित तरुणीने हा संपूर्ण प्रकार पाहिला तेव्हा तिच्या पायाखालची जमीनच सरकली. तिने या व्हिडिओबद्दल तिच्या तरुणीला विचारलं असता, तिने उडवाउडवीची उत्तर देत तेथून पळ काढला. या घटनेची माहिती पीडितेने तातडीने केंद्राच्या अधिकाऱ्यांना दिली.
केंद्राच्या अधिकाऱ्यांनी तत्काळ तरुणीला घेऊन पोलिसांत धाव घेतली. पीडितेच्या तक्रारीवरून पोलिसांनी याप्रकरणी एफआयआर दाखल केला होता. आरोपी तरुणीला पोलिसांनी अटक केली आहे. त्याचबरोबर केंद्राने या तरुणीला निलंबित केले आहे.
या तरुणीवर तिच्या बॅचच्या आणखी एका तरुणीचा आंघोळ करतानाचा व्हिडिओ बनवल्याचा आरोप आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना २९ मार्चची आहे. पीडित तरुणीने दिलेल्या तक्रारीनुसार, स्पोर्ट्स अथॉरिटी ऑफ इंडिया (SAI) बंगळुरू केंद्रात स्पोर्ट्स कोचिंगमध्ये डिप्लोमा करत आहे















