त्र्यंबकेश्वर – तालुक्यातील गणेशगाव (वा) येथील केटी बंधाऱ्याचे काम निकृष्ट दर्जाचे झाल्याने पाण्याची गळती सुरू आहे. पाणी वाया जात असल्याने किमान काहीतरी उपाययोजना करावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
गणेशगांव (वा.) येथे नदीवर केटी बंधार्यांचे कामे झाली आहेत. यामध्ये बांधकाम निकृष्ट दर्जाचे केले असल्याने बंधाऱ्यातून पाणी गळती होत आहे. यामुळे जनावरांना व शेतीला पाण्याची कमतरता भासत आहे. पुन्हा या केटीचे बांधकाम करणे आवश्यक आहे. तसेच इतरही बंधाऱ्यांची दुरुस्ती करावी .जेणेकरून मार्च एप्रिल मध्ये होणारा पाण्याचा तुटवडा होणार नाही, त्यामुळे लवकरात लवकर उपाययोजना करावी, अशी मागणी येथील शेतकऱ्यांनी केली आहे.