Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

काळ हाच सर्वात मोठा शिक्षक..!

najarkaid live by najarkaid live
September 5, 2021
in सामाजिक
0
काळ हाच सर्वात मोठा शिक्षक..!
ADVERTISEMENT
Spread the love

५ सप्टेंबर आपल्या देशामध्ये राष्ट्रीय शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो आज देखील संपूर्ण भारतभरा मध्ये शिक्षक दिन म्हणून साजरा होत आहे. फरक फक्त एवढाच आहे की, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शिक्षक दिनाचे उत्सव साजरे होणार नाहीत.

तसे बघायला गेले तर या जगामध्ये प्रत्येक माणूस शिक्षक आणि विद्यार्थीच आहे. तो जीवन जगत असताना कोणाला तरी शिकवत असतो आणि कोणाकडून तरी काहीना काही शिकत असतो.

परंतु यामध्ये सर्वात मोठा शिक्षक जर कोणी असेल तर तो “काळ” आहे. मला असं वाटतं की जेव्हापासून या सृष्टीची निर्मिती झाली या मानवजातीला त्याने काळानुरूप शिक्षणातून काहीना काही शिकविले आहे.उदाहरणच द्यायचं झालं तर काळाने भगवान गौतम बुद्धांना वेदनेने विव्हळत पडलेला रोगी दाखविला नसता आणि त्याचबरोबर रोहिणी नदीच्या पाण्यावरून कोलीय आणि शांक्य यांच्यामध्ये पडलेली युद्धाची ठिणगी यातून राजवैभव सोडून भगवंताने दुःखाचे मूळ शोधण्यासाठी अलंकार, राज वस्त्रांचा त्याग करून काशाय वस्त्रे परिधान करून युवराज सिद्धार्थचा भगवान गौतम बुद्ध होऊन संपूर्ण विश्वाला शांतीचा संदेश देऊन दुःखाचे मूळ कारण म्हणजे मोह माया मत्सर हे असून, त्याकरिता जग जिंकण्याच्या अगोदर आपल्या मनाला जिंका आणि त्यानंतर जग जिंकण्याचे स्वप्न पहा हा संदेश देणारे भगवान गौतम बुद्ध जगाला लाभलेली सर्वात मोठी देणगी आहे.म्हणून आपण आभार मानले पाहिजे त्या काळाचे ज्याने आपल्याला भगवान गौतम बुद्ध दिले.

राष्ट्रमाता जिजाऊंना काळाने रयतेच्या वेदना दाखवल्या नसत्या तर छत्रपती शिवाजी महाराज घडलेच नसते. आणि शिवबांची भवानी तलवारही तडपली नसती. साऱ्या जगाला हेवा वाटावा अशी युद्धनीतीही कळली नसती, म्हणून आपण त्या काळाचे आभार मानू त्याने आपल्याला छत्रपती शिवाजी महाराज दिले.

जोतिबांचा लग्नात अपमान झाला नसता तर त्यांनी सावित्रीमाईला सोबत घेऊन शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली नसती तर या देशाला इंद्रागांधी, प्रतिभाताई पाटील या सारख्या प्रथम महिला पंतप्रधान, राष्ट्रपती लाभल्या नसत्या म्हणून आपण त्या काळाचे आभार मानले पाहिजे. ज्याने आपल्याला ज्योतिबा सारखे महात्मा आणि सावित्रीमाई सारखी विद्येची देवता दिली.

डॉक्टर बाबासाहेबांना लहानपणापासून अस्पृश्यतेचे चटके काळाने दाखवले नसते तर अमेरिकेच्या विद्यापीठाने कोणाला सिम्बॉल ऑफ नॉलेज म्हटलं असते. संपूर्ण जगाला हेवा वाटावा असे संविधान आपल्याला मिळालेच नसते, या काळानेच आपल्या शिक्षणातून या सारखे असंख्य महापुरुष घडवले आणि त्यांनी या जगाला दिशा देण्याचे काम केले आहे. म्हणूनच माझ्यामते काळ हा सर्वात मोठा शिक्षक आहे.

अशाप्रमाणे संपूर्ण सृष्टी या काळाची विद्यार्थी आहे.

सध्याची परिस्थिती लक्षात घेता काळाने याअगोदर वेळोवेळी मानवाला दिलेली शिकवण मानवाने अंगिकारली नाही म्हणूनच आपल्याला आज कोरोनाच्या पार्श्वभूमीवर काळाने दिलेली शिक्षाच आहे.

हवा तर इतिहास चाळुन बघा जेव्हा जेव्हा काळाने, निसर्गाने मानवाला दिलेले इशारे समजून न घेता मानवाने आपल्या राक्षसी महत्त्वाकांक्षेला महत्त्व दिलेले आहे, त्याचे परिणाम मानव जातीला भोगावी लागली आहे. काळाचे शिक्षण देण्याचे एक खास विशिष्ट आहे तो एकदा शिकविल्यानंतर ते पुन्हा कधीच शिकवत नाही. जर आपण हुशार विद्यार्थी सारखे त्यांने दिलेले शिकवलेले ज्ञान उत्तमरीत्या ग्रहण करून आपल्या आचरणात आणले तर आपले कल्याणच होणार!

नाही तर विनाश हा अटळ आहे….!
शिक्षक दिनाच्या सर्वांना लाख लाख शुभेच्छा

पो.ना. विनोद पितांबर अहिरे
नेमणूक पोलीस मुख्यालय जळगाव 9823136399

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

शिक्षिका श्रीमती सुवर्णा विठ्ठल महाजन यांना समाजरत्न पुरस्कार

Next Post

आमदार मंगेश चव्हाण यांचा चाळीसगाव शहर कोरोनामुक्तीसाठी जम्बो शिबिराचा बूस्टर डोस

Related Posts

Bhilabhau Sonawane Jayanti 2025

Bhilabhau Sonawane Jayanti 2025: राजकीय,सामाजिक आणि शैक्षणिक कार्यातील एक महान नेता

July 3, 2025
रामराज्य येत आहे, चांगल्या गोष्टी घडतील; देशासाठी सोहळा महत्त्वाचा- मुख्य पुजारी आचार्य सत्येंद्र दास

रामराज्य येत आहे, चांगल्या गोष्टी घडतील; देशासाठी सोहळा महत्त्वाचा- मुख्य पुजारी आचार्य सत्येंद्र दास

January 3, 2024
रोहित निकम यांना ‘खान्देश भूषण’ पुरस्कार

रोहित निकम यांना ‘खान्देश भूषण’ पुरस्कार

January 3, 2024
पुरुषत्वाचे सर्वात महत्वाचे १० नियम कोणते?

पुरुषत्वाचे सर्वात महत्वाचे १० नियम कोणते?

December 1, 2023
Christmas Festival ; येशूचा खरा वाढदिवस कोणालाच माहीत नाही, तरीही २५ डिसेंबर रोजी का साजरा करतात… जाणून घ्या…

Christmas Festival ; येशूचा खरा वाढदिवस कोणालाच माहीत नाही, तरीही २५ डिसेंबर रोजी का साजरा करतात… जाणून घ्या…

December 25, 2022
कैलास पर्वताची ही १० गुपिते जाणून तुम्हाला आश्चर्य वाटेल…

कैलास पर्वताची ही १० गुपिते जाणून तुम्हाला आश्चर्य वाटेल…

December 18, 2022
Next Post
आमदार मंगेश चव्हाण यांचा चाळीसगाव शहर कोरोनामुक्तीसाठी जम्बो शिबिराचा बूस्टर डोस

आमदार मंगेश चव्हाण यांचा चाळीसगाव शहर कोरोनामुक्तीसाठी जम्बो शिबिराचा बूस्टर डोस

ताज्या बातम्या

शिवसेनेत पत्रकार भुवनेश दुसाने यांचा आ. किशोरअप्पा पाटिलांच्या हस्ते प्रवेश

शिवसेनेत पत्रकार भुवनेश दुसाने यांचा आ. किशोरअप्पा पाटिलांच्या हस्ते प्रवेश

September 9, 2025
Prostitution customer | वेश्यागृहात जाणाऱ्यांवर हायकोर्टाचा दणका : हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय !

Prostitution customer | वेश्यागृहात जाणाऱ्यांवर हायकोर्टाचा दणका : हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय !

September 9, 2025
महाराष्ट्र हादरला! : 12 वर्षीय बालिकेवर दोघांकडून अत्याचार

महाराष्ट्र हादरला! : 12 वर्षीय बालिकेवर दोघांकडून अत्याचार

September 9, 2025
आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत झाले मोठे ४ निर्णय!

आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत झाले मोठे ४ निर्णय!

September 9, 2025
प्रकृतीचे रक्षण ही सर्वांची जबाबदारी – महामंडलेश्वर जनार्दनहरिजी महाराज

प्रकृतीचे रक्षण ही सर्वांची जबाबदारी – महामंडलेश्वर जनार्दनहरिजी महाराज

September 9, 2025
पोटच्या मुलीनं नको ते पाहिलं  ; आईनं ६ वर्षीय मुलीचा खून, विहिरीत फेकला मृतदेह

पोटच्या मुलीनं नको ते पाहिलं ; आईनं ६ वर्षीय मुलीचा खून, विहिरीत फेकला मृतदेह

September 8, 2025
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us