Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

कालीपिली-ट्रक अपघातात 9 ठार

najarkaid by najarkaid
December 24, 2019
in जळगाव
0
कालीपिली-ट्रक अपघातात 9 ठार
ADVERTISEMENT

Spread the love

एरंडोल  – जळगावकडून एरंडोलकडे येणार्‍या कालीपिलीला भरधाव येणार्‍या ट्रकने धडक दिल्याने कालीपिलीतील 9 जणांचा मृत्यू झाला तर 8 जण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली. या अपघातात एरंडोल येथील 5 जणांचा समावेश असल्यामुळे शहरात सर्वत्र शोकाकुल वातावरण आहे. दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास झालेल्या भीषण अपघाताची माहिती मिळताच मदतकार्यासाठी अनेकांनी घटनास्थळी धाव घेतली.

जळगाव येथून कालीपिली (एम एच 19, वाय 5207) ही प्रवासी घेऊन एरंडोलकडे येत असताना राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 वरील हॉटेल गौरीजवळ एरंडोलकडून जळगावकडे जाणार्‍या ट्रकच्या धडकेने भीषण अपघात झाला.अपघातामुळे कालीपिली पलटी झाली. घटनास्थळी रक्ताच्या थारोळ्यात अनेक जण विव्हळत पडले होते. जखमींमध्ये नरेंद्र भिका कासार, तुळसाबाई संजय महाजन, यासीन खान पठाण, मिठाराम श्रावण, आर.के.सोईल शेख, राजू पुष्पाबाई महाजन गिताबाई मधुकर देशमुख यांचा समावेश आहे. अपघाताचे वृत्त समजताच पोलीस निरीक्षक अरुण हजारे एपीआय तुषार देवरे पोलीस कॉन्स्टेबल संदीप सातपुते निलेश ब्राह्मणकर अखिल मुजावर भाजपाचे उत्तर संघटन मंत्री महाराष्ट्र किशोर काळकर माजी नगराध्यक्ष किशोर निंबाळकर नगरसेवक मनोज पाटील उपनगराध्यक्ष बबलू चौधरी माजी जि.प उपाध्यक्ष ज्ञानेश्वर आमले ,पराग पवार तालुका काँग्रेस अध्यक्ष विजय महाजन, नगरसेवक अस्लम पिंजारी, अ‍ॅड. अहमद सय्यद यांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना रुग्णालयात दाखल करण्यासाठी परिश्रम घेतले. चौपदरीकरणाच्या संथ गतीने सुरु असलेल्या कामामुळे रोज अनेक निष्पाप लोकांचे बळी जात आहे मात्र तरीदेखील शासन कुंभकर्णी झोप घेत असल्याच्या संतप्त प्रतिक्रिया जनमानसात उमटत आहे.

अपघातातील मृतांची नावे

प्रसन्ना निवृत्ती वंजारी (वय 10), निवृत्ती प्रभाकर वंजारी (वय 45 ), परमेश्वर नाना जाधव (वय 23)  नितीन (पिंटू) सोनार (कालीपिली चालक वय 42), काशिनाथ शंकर पाटील (वय 60), उज्ज्वला निवृत्ती वंजारी (वय 38), भानुदास माधव जाधव यांचा समावेश असून अपघातात दैव बलवत्तर म्हणून 6 वर्षाची बालिका सुखरूप बचावली आहे.

रुग्णवाहिकेचा दरवाजा ’लॉक’

जळगाव । या अपघातातील सात गंभीर जखमींना जळगावातील जिल्हा रुग्णालयात आणण्यात आले. रुग्णवाहिका (क्र.एमएच 19 सीएल 0543) चा दरवाजा जिल्हा रुग्णालयाजवळ आल्यानंतर लॉक झाल्याचे लक्षात आले.प्रयत्न करुनही तो दरवाजा उघडत नव्हता. जिल्हा वैद्यकीय महाविद्यालयात बांधकाम सुरू असल्याने तेथील लोखंड कापण्याच्या कटरने रुग्णवाहिकेचा दरवाजा तोडून जखमींना बाहेर काढण्यात आले. यात जवळपास एक तास गेला. याप्रसंगी रुग्णवाहिकेमधील रुग्ण भेदरले होते. जणू आतील रुग्णांच्या संयमाची परीक्षा देव बघत होता. या अक्षम्य प्रकारामुळे रुग्णांच्या नातेवाईकांचा संताप व्यक्त होत होता. जिल्हा वैद्यकीय महाविद्यालयात जखमींना आणल्यानंतर परिसरातील तरुणांनी तातडीने धाव घेत रुग्णालयात जखमींना नेण्यासाठी मदत कार्य केले. मन हेलावणारी दृश्ये पाहून प्रत्येकाच्या डोळ्यात पाणी येत होते. या वेळी नागरिकांचीही मोठी गर्दी उसळली होती.

जळगावातही रुग्णांवर उपचार

जिल्हा रुग्णालयात सात रुग्णांना आणण्यात आले. यात जळगाव तालुक्यातील कुसुंबा येथील राजेंद्र आनंदा सोनवणे, विजय आनंदा सोनवणे, दूधभानसा खुसराम (वय 28), फुसियाबाई सुरेशकुमार (वय 50, रा.सोंधनी, धिंदवाडा, मध्यप्रदेश), मीठाबाई सखाराम आरके यांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. तसेच गीताबाई रघुनाथ देशमुख व अनुसयाबाई (पूर्ण नाव माहीत नाही) यांच्यावर जिल्हा रुग्णालयात प्रथमोपचार करण्यात आले. त्यानंतर त्यांना खासगी दवाखान्यात रवाना करण्यात आले आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

जळगाव बी.यू.एन.रायसोनी : स्नेहसंमेलनातूनच भावी कलाकार घडतात- विनोद ढगे

Next Post

जिल्ह्यात सव्वालाख शेतकर्‍यांना मिळणार लाभ

Related Posts

पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

July 24, 2026
पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील यांचे नंदुरबारमध्ये जंगी स्वागत; समाजबांधवांशी साधला संवाद

July 17, 2026
राजपूत समाजाच्या सन्मानासाठी संघटना कटिबद्ध; महिला सक्षमीकरणाला प्राधान्य – राष्ट्रीय अध्यक्षा ॲड. शिलाभाभीसा गोगामेडी

July 16, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्री तथा राष्ट्रीय प्रवक्तापदी सूरजसिंह ठाकूर यांची निवड

July 13, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे संस्थापक स्वर्गीय सुखदेवसिंह दादा गोगामेडी यांच्या जयंतीनिमित्त उद्या जळगावात भव्य सामाजिक कार्यक्रम

July 11, 2026
Next Post
जिल्ह्यात सव्वालाख शेतकर्‍यांना मिळणार लाभ

जिल्ह्यात सव्वालाख शेतकर्‍यांना मिळणार लाभ

ताज्या बातम्या

पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

July 24, 2026
पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

July 24, 2026
रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

July 23, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील यांचे नंदुरबारमध्ये जंगी स्वागत; समाजबांधवांशी साधला संवाद

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील यांचे नंदुरबारमध्ये जंगी स्वागत; समाजबांधवांशी साधला संवाद

July 17, 2026
राजपूत समाजाच्या सन्मानासाठी संघटना कटिबद्ध; महिला सक्षमीकरणाला प्राधान्य – राष्ट्रीय अध्यक्षा ॲड. शिलाभाभीसा गोगामेडी

राजपूत समाजाच्या सन्मानासाठी संघटना कटिबद्ध; महिला सक्षमीकरणाला प्राधान्य – राष्ट्रीय अध्यक्षा ॲड. शिलाभाभीसा गोगामेडी

July 16, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us