Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

ऑप्टीकल दुकाने, अभ्यासिका, खाजगी प्रवाशी वाहतुक कार्यालये, चार्टड अकाऊंटन्ट कार्यालये सुरु ठेवण्यास अटींवर परवानगी

najarkaid by najarkaid
April 9, 2021
in जळगाव
0
नागरिकांनी नियमांचे पालन न केल्यास लाॅकडाऊनचा विचार ; जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांचा इशारा
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव (प्रतिनिधी) दि. 9 – कोविड-19 वर नियंत्रण आणण्यासाठी व त्याचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी 5 एप्रिलच्या आदेशानुसार जळगाव जिल्ह्यासाठी विशेष निर्बध लागू केले आहे. या निर्बधांतून खालील बाबींना काही अटींवर सुरु ठेवण्यास परवानगी देण्यात येत असल्याचे आदेश जिल्हाधिकारी श्री. राऊत यांनी निर्गमित केले आहे.

ऑप्टीकल दुकाने हे केवळ सोमवार ते शुक्रवार सकाळी 7 ते रात्री 8 पर्यंत सुरु ठेवता येतील. परंतु सदर दुकानात काम करणारे कर्मचारी यांनी भारत सरकार यांचेकडील निर्देशानुसार (सद्य:स्थितीत 45 वर्ष वय) कोविड लसीकरण करुन घ्यावे, तसेच कोविड लसीकरण न केल्यास दिनांक 10 एप्रिल, 2021 पासून कोविड-19 RTPCR चाचणीचा निगेटीव्ह ‍रिपोर्ट सोबत बाळगणे अनिवार्य राहील.

जळगाव शहर मनपा क्षेत्रात शासकीय व खाजगी रुग्णालयास चादरी, बेडशिटव इतर अनुषंगिक साहित्याचा पुरवठा करणाऱ्या दुकानांना गृह शाखा, जिल्हाधिकारी कार्यालय, जळगाव यांचेकडून व जळगाव शहर मनपा क्षेत्र वगळून उर्वरीत क्षेत्रात संबंधित तहसिलदार यांचेमार्फत आवश्यकतेनुसार दिनांकास ठराविक वेळेकरीता दुकान उघडे ठेवण्याची परवानगी देण्यात येईल. तथापि अशी दुकाने सुरु करतांना संबंधित दुकान चालकांना संबंधित रुग्णालयाकडून पुरवठा करण्याबाबतची लेखी मागणी सादर करावी लागेल. अशा दुकानदारांना परवानगी घेतल्यानंतर मागणी केलेले सहित्य काढून दिल्यानंतर लगेच दुकान बंद करावे लागेल.

तसेच सदर दुकानात काम करणारे कर्मचारी यांनी भारत सरकार यांचेकडील निर्देशानुसार (सद्य:स्थितीत 45 वर्ष वय) कोविड लसीकरण करुन घ्यावे, कोविड लसीकरण न केल्यास दिनांक 10 एप्रिल, 2021 पासून कोविड -19 RTPCR चाचणीचा निगटीव्ह रिपोर्ट सोबत बाळगणे अनिवार्य राहील.

अभ्यासिका (लायब्ररी, वाचनालये) यांना केवळ 50% क्षमतेच्या मर्यादेत फक्त सोमवार ते शुक्रवार सकाळी 7 ते रात्री 8 पर्यंत सुरु ठेवता येतील. परंतू सदर अभ्यासिकेमध्ये काम करणारे कर्मचारी तसेच अभ्यास करणारे विद्यार्थी यांनी भारत सरकार यांचेकडील निर्देशानुसार (सद्य:स्थितीत 45 वर्ष वय) कोविड लसीकरण करुन घ्यावे, तसेच कोविड लसीकरण न केलेल्या कर्मचरी/विदयार्थी यांना दिनांक 10 एप्रिल, 2021 पासून कोविड-19 RTPCR चाचणीचा निगटीव्ह रिपोर्ट सोबत बाळगणे अनिवार्य राहील.

*खाजगी प्रवाशी वाहतुक कार्यालये* हे फक्त सोमवार ते शुक्रवार सकाळी 7 ते रात्री 8 पर्यंत सुरु ठेवता येतील. परंतु सदर दुकानात काम करणारे कर्मचारी तसेच प्रवासी यांनी भारत सरकार यांचेकडील निर्देशानुसार (सद्य:स्थितीत 45 वर्ष वय) कोविड लसीकरण करुन घ्यावे, तसेच कोविड लसीकरण न केल्यास दिनांक 10 एप्रिल, 2021 पासून कोविड-19 RTPCR चाचणीचा निगेटीव्ह ‍रिपोर्ट सोबत बाळगणे अनिवार्य राहील.

महाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग, आपत्ती व्यवस्थापन मदत व पुनर्वसन विभाग, मंत्रालय, मुंबई यांचेकडील दिनांक 5 एप्रिल, 2021 च्या आदेशात इतर खाजगी कार्यालयामध्ये फायनान्शीअल मार्केट, पेमेंट सिस्टीम ऑपरेटर्स, ऑल नॉन बॅकीग फायनान्शीअल कार्पोरेशन्स यांना सुट देण्याबाबत नमूद असल्याने *चाटॅर्ड अकाऊंटन्ट* यांना त्यांची कार्यालये फक्त सोमवार ते शुक्रवार सकाळी 7 ते रात्री 8 पर्यंत सुरु ठेवता येतील. तसेच त्यांनी कार्यालयामध्ये प्रत्यक्ष संबंधीत नागरीकांना प्रवेश न देता त्यांना ईमेलव्दारे अथवा दूरध्वनीव्दारे आवश्यक असलेल्या कागदपत्राची मागणी करण्यात यावी. तसेच कोविड 19 च्या अनुषंगाने निर्गमीत करणेत आलेल्या सर्व सुचनांचे पालन करणेत यावे.

या आदेशाचे उल्लंघन केल्यास सदर बाब ही भारतीय दंड संहिता, 1860 (45) चे कलम 188 आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 मधील कलम 51 ते 60 व फौजदारी प्रक्रिया संहिता, 1973 मधील तरतुदीनुसार शिक्षेस पात्र राहील. असे जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण अभिजीत राऊत यांनी एका आदेशान्वये कळविले आहे.
००००

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

‘महाराष्ट्र मॉडेल’ गुजरात सरकार राबविण्याच्या तयारीत ; गुजरात उच्च न्यायालयाने सरकारला दिले ‘हे’ निर्देश

Next Post

विभागीय माहिती कार्यालयातील कर्मचारी राजेंद्र येवले यांचे कोरोना ने निधन

Related Posts

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा – मंत्री गिरीश महाजन

September 7, 2026
अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन

अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन

September 7, 2026
प्रा. भूपेंद्र बाणाईत यांची भाजप शिक्षक आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड

प्रा. भूपेंद्र बाणाईत यांची भाजप शिक्षक आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड

September 5, 2026
५,०१२ सहाय्यक प्राध्यापक पदभरती; पारदर्शकतेसाठी शासनाच्या कडक सूचना

५,०१२ सहाय्यक प्राध्यापक पदभरती; पारदर्शकतेसाठी शासनाच्या कडक सूचना

September 3, 2026
Next Post
विभागीय माहिती कार्यालयातील कर्मचारी राजेंद्र येवले यांचे कोरोना ने निधन

विभागीय माहिती कार्यालयातील कर्मचारी राजेंद्र येवले यांचे कोरोना ने निधन

ताज्या बातम्या

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा – मंत्री गिरीश महाजन

September 7, 2026
शिरसोलीत ‘जीवनधारा’ शुद्ध पेयजल योजनेचा शुभारंभ – गांधी रिसर्च फाउंडेशनचा उपक्रम

शिरसोलीत ‘जीवनधारा’ शुद्ध पेयजल योजनेचा शुभारंभ – गांधी रिसर्च फाउंडेशनचा उपक्रम

September 7, 2026
अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन

अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन

September 7, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us