Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

उद्योजकाकडे आठ लाखांची खंडणीची मागणी ; पत्रकारासह आठ संशयितांना अटक ; तीन महिलांचा समावेश

najarkaid by najarkaid
January 16, 2023
in जळगाव
0
उद्योजकाकडे आठ लाखांची खंडणीची मागणी ; पत्रकारासह आठ संशयितांना अटक ; तीन महिलांचा समावेश
ADVERTISEMENT

Spread the love

एरंडोल,(प्रतिनिधी)- येथील प्रसिद्ध उद्योजक तथा बालाजी ग्रुपचे संचालक अनिल गणपती काबरे यांना वारंवार धमक्या देवून आठ लाखांची खंडणीची मागणी करणा-या न्यूज २४ महाराष्ट्रच्या पत्रकारासह आठ संशयिताना पोलिसांनी सापळा रचून खंडणी स्विकारताना अटक केली.संशयितांमध्ये तीन महिलांचा समावेश आहे.यामधील एक महिला तीन पुरुष यांना पोलिसांनी आपल्या सहका-यांना पकडल्याची चाहूल लागताच चारही जणांनी मोटार सायकलवरून पळ काढला मात्र सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश अहिरे,हवालदार जुबेर खाटिक,महिला पोलीस ममता तडवी,होमगार्ड दिनेश पाटील यांनी त्यांचा सिनेस्टाईल पाठलाग करून पाळधी पोलिसांच्या सहकार्याने ताब्यात घेतले.

याबाबत माहिती अशी,कि येथील प्रसिद्ध उद्योजक अनिल गणपती काबरे व त्यांच्या परिवारातील सदस्यांची म्हसावद रस्त्यावर बालाजी ऑईल मिल नावाची तेलाची कंपनी आहे.श्री.अनिल काबरे यांना एक महिला व एका पुरुषाने तुमच्या ऑईल मिल बाबत सरकारी कार्यालयाकडे तक्रार करण्यात येईल अशी धमकी देवून सात ते आठ लाखांची खंडणी मागितली.उद्योजक अनिल काबरे यांनी खंडणीची धमकी आल्यानंतर पोलीस स्थानकात तक्रार दिली.खंडणी मागणी करणारे खंडणीखोर खंडणीची रक्कम घेण्यासाठी आज येणार असल्याची माहिती अनिल काबरे यांनी पोलिसांना दिली.

पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर जाधव,सहाय्यक निरीक्षक गणेश अहिरे,उपनिरीक्षक शरद बागल हवालदार अनिल पाटील,मिलिंद कुमावत,संदीप पाटील,जुबेर खाटिक महिला पोलीस ममता तडवी,होमगार्ड दिनेश पाटील यांनी पंचांसह बालाजी ऑईल मिल येथे सापळा रचला.त्यावेळी दोन महिला व दोन पुरुष हे खंडणी मागण्यासाठी ऑईल मिलमध्ये आले.तर एक महिला व तीन पुरुष मिलच्या बाहेर उभे राहिले होते.मिलमध्ये आलेल्या आलेल्या खंडणीखोरांपैकी एका महिलेने उद्योजक अनिल काबरे यांचेकडून एक लाख रुपयांची खंडणी स्विकारताच दबा धरून बसलेल्या पोलीस पथकाने महिलेसह तिच्या साथीदारांना पकडले.पोलिसांनी सहका-यांना पकडल्याची चौल लागताच मिलच्या बाहेर थांबलेल्या एक महिला व तीन पुरुष यांनी मोटारसायकलवरून म्हसावद नाकामार्गे जळगावकडे पळून जाण्याचा प्रयत्न केला.

सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश अहिरे व त्यांच्या सहका-यांनी सिनेस्टाईल पाठलाग करून पाळधी पोलिसांच्या सहकार्याने त्यांना ताब्यात घेतले.सर्व खंडणीखोरांना ताब्यात घेवून पोलीस स्थानकात आणले.पोलिसांनी त्यांची चौकशी केली असता त्यांनी त्यांची नावे साक्षी राजू तायडे,रा.कुलकर्णी प्लॉट,धम्मनगर,भुसावळ,मोहिनी विनोद लोखंडे,रा.पिंपरी,पुणे ह.मुक्काम कुलकर्णी प्लॉट,धम्मनगर भुसावळ,शशिकांत कैलास सोनवणे,रा.द्वारकानगर,भुसावळ,सिद्धार्थ सुनील सोनवणे,रा.ताप्ती क्लब भुसावळ,रुपाली राजू तायडे,रा.धम्मनगर भुसावळ,आकाश सुरेश बोदडे रा.तळणी,ता.मोताळा,मिलिंद प्रकाश बोदडे (पत्रकार न्युज २४ महाराष्ट्र),रा.तळणी,ता.मोताळा,जि.बुलढाणा,गजानन आनंदा बोदडे रा.धम्मनगर भुसावळ असल्याचे सांगितले.सर्व सातही खंडणीखोराना पोलिसांनी ताब्यात घेतले.दरम्यान पत्रकार मिलिंद बोदडे यांनी यापूर्वी देखील विविध शासकीय कार्यालयात वेगवेगळ्या नावाने बालाजी ऑईल मिल विरोधात तक्रारी करून अनिल काबरे यांचेकडून सुमारे साठ ते सत्तर हजार रुपये खंडणी घेतली आहे.सर्व संशयितांनी अनिल काबरे यांना मिलबाबत तक्रारी करण्याची धमकी देवून आठ लाख रुपयांची खंडणी मागितली होती.

पोलिसांनी त्यांना आज सापळा रचून एक लाख रुपये स्वीकारताना ताब्यात घेतले.पोलिसांनी संशयितांकडून एक लाख रुपये रोख,आठ मोबाईल,दोन मोटारसायकल व एक डिझायर कार असा १० लाख ४ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.संशयितांमध्ये साक्षी राजू तायडे व मोहिनी विनोद लोखंडे यांचे वयाबाबत साशंकता असल्यामुळे त्यांची बालसुधारगृहात रवानगी करण्यात आली आहे.पोलीस अधीक्षक जळगाव,अप्पर पोलीस अधीक्षक चाळीसगाव,उपविभागीय पोलीस अधिकारी अमळनेर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश अहिरे व त्यांचे सहकारी तपास करीत आहेत.दरम्यान बालाजी उद्योग समुहाचे काबरे परिवार यांच्याकडे खंडणी मागितल्याची माहिती शहरात समजताच एकाच खळबळ उडाली.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

महाराष्ट्रासाठी पुढचे दोन दिवस महत्त्वाचे ; थंडीबाबत हवामान खात्याने वर्तविला हा अंदाज

Next Post

एरंडोल – पिंपलकोठा गावाजवळ अपघात , दोन युवक जागीच ठार ; एकाचा पुढच्या आठवड्यात होता विवाह

Related Posts

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा – मंत्री गिरीश महाजन

September 7, 2026
अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन

अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन

September 7, 2026
Next Post
एरंडोल – पिंपलकोठा गावाजवळ अपघात , दोन युवक जागीच ठार ; एकाचा पुढच्या आठवड्यात होता विवाह

एरंडोल - पिंपलकोठा गावाजवळ अपघात , दोन युवक जागीच ठार ; एकाचा पुढच्या आठवड्यात होता विवाह

ताज्या बातम्या

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा – मंत्री गिरीश महाजन

September 7, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us