केरळ – कोरोना नंतर आता केरळात जिवघेण्या निपाह विषाणूचे संकट वाढतांना दिसत आहे. केरळ मधील १२ वर्षीय मुलाचा निपाह व्हायरस च्या लागण मुळे उपचारा दरम्यान मृत्यू झाल्याचे समोर आले आहे.
निपाह व्हायरसची लागण झालेल्या १२ वर्षीय मुलावर केरळ येथील कोझिकोड रुग्णालयात उपचार सुरु होते. मात्र उपचारा दरम्यान या मुलाचा मृत्यू झाल्याने केरळ वर कोरोना नंतर आता या नव्या व्हायरसचे संकट गडद होतांना दिसत आहे.३ सप्टेंबर दिवशी १२ वर्षीय निपाह संशयित मुलगा कोझिकोड रुग्णालयात उपचाराकरिता दाखल करण्यात आले होते.आज सकाळी त्या १२ वर्षीय मुलाचा मृत्यु झाल्याची माहिती केंद्र सरकार कडून देण्यात आली आहे.
केंद्र सरकारने तात्काळ राष्ट्रीय रोग नियंत्रण पथक केरळला रवाना केले आहे. केरळ सरकारकडून या पथकाला योग्य त्याप्रकारची मदत पुरवली जाणार आहे.