Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

आजच्या बैठकीत जिल्हा प्रशासनाला आरोग्य संचालक डॉ अर्चना पाटील यांनी दिल्या ‘या’सूचना

najarkaid by najarkaid
April 27, 2021
in जळगाव
0
आजच्या बैठकीत जिल्हा प्रशासनाला आरोग्य संचालक डॉ अर्चना पाटील यांनी दिल्या ‘या’सूचना
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव (प्रतिनिधी) दि. 27 – कोरोनाची साखळी खंडित करण्यासाठी जिल्ह्यात कोरोना बाधित आढळून येणाऱ्या रुग्णांच्या संपर्कातील हाय रिस्क व लो रिस्क व्यक्तींचा तातडीने शोध घेऊन त्यांची चाचणी करा. तसेच बाधित रुग्णांच्या संख्येनुसार प्रतिबंधात्मक क्षेत्र ठरवून त्याची प्रभावी अंमलबजावणी करावी. अशा सुचना आरोग्य संचालक डॉ अर्चना पाटील यांनी आज दिल्यात. त्याचबरोबर जळगाव जिल्ह्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासन व आरोग्य यंत्रणेने केलेल्या तयारीबाबत त्यांनी समाधान व्यक्त केले.

येथील जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात डॉ अर्चना पाटील यांनी जिल्ह्यातील प्रांताधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी, तालुका वैद्यकीय अधिकारी, वैद्यकीय अधिक्षक यांचेशी दूरदृश्यप्रणालीद्वारे संवाद साधला, यावेळी डॉ पाटील बोलत होत्या. याप्रसंगी जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. बी. एन. पाटील, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ एन. एस. चव्हाण, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ दिलीप पाटोडे, जिल्हा प्रशासन अधिकारी (नगरपालिका) सतीश दिघे आदि उपस्थित होते.

डॉ पाटील पुढे म्हणाल्या की, कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी बाधित रुग्णाच्या संपर्कातील हाय रिस्क व्यक्तींचा 48 तासाच्या आत शोध घेतला पाहिजे. तसेच प्रतिबंधात्मक क्षेत्राची प्रभावी अंमलबजावणी होण्यासाठी मायक्रो झोन तयार केले पाहिजे. जेणेकरुन त्या भागाचे सर्वेक्षण व्यवस्थित होऊन संशयित रुग्ण शोधण्यास मदत होते. प्रतिबंधात्मक क्षेत्रात सर्वेक्षण करतांना सारी व सर्दी, खोकला, तापाचे रुग्ण सापडले पाहिजेत. कर्मचाऱ्यांना तपासणीसाठी देण्यात येणारे थर्मामीटर, पल्स ऑक्सिमीटर योग्य पध्दतीने काम करीत आहेत का याचीही तपासणी करावी.

कर्मचाऱ्यांच्या अडीअडचणी समजून घेऊन त्यांच्या कामाचे समान वाटप करा. तालुका वैद्यकीय अधिकारी व वैद्यकीय अधिक्षक यांनी समन्वय राखून आपल्या तालुक्यातील कामाचे नियोजन करावे. जिल्हा शल्य चिकित्सक, जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी नियमितपणे प्रतिबंधात्मक क्षेत्र, कोविड केअर सेंटर, डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटरला भेटी द्याव्यात. त्याचबरोबर डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटरमध्ये जम्बो सिलेंडरची तरतुद करावी.

ऑक्सिजन मॅनेजमेंट सिस्टिम लागू करा…

सध्या राज्यात ऑक्सिजनचा साठा कमी असल्याने उपलब्ध ऑक्सिजनचा वापर योग्य पध्दतीने होण्यासाठी ऑक्सिजन मॅनेजमेंट सिस्टिम लागू करा. याकरीता प्रत्येक ठिकाणी दोन स्वतंत्र नर्सची नियुक्ती करावी. रुग्णाच्या आवश्यतेनुसारच त्याला ऑक्सिजन दिला गेला पाहिजे. तसेच दर चार तासांनी प्रत्येक रुगणांची ऑक्सिजन पातळी तपासावी. उपलब्ध ऑक्सिजन वाया जाणार नाही याची दक्षता घ्यावी त्याचबरोबर रुग्णांची रक्त तपासणी दैनंदिन करावी. लसीकरण करतांना शासनाच्या मार्गदर्शक सुचनांचे पालन करण्याच्या सूचना देतांनाच कोरोना सोबतच डिलीव्हरीचे पेशंट, अपघात व दैनंदिन तपासणीच्या रुग्णांकडे दुर्लक्ष होता कामा नये असेही त्यांनी सांगितले. दैनंदिन कामाची माहिती कोविन व ईविन पोर्टलवर अपडेट करण्याच्या सुचनाही डॉ पाटील यांनी सर्व यंत्रणांना दिल्यात.
00000

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

विवरा गावात पोलीस विभाग ‘ऍक्शन मोड’ मध्ये.. रिकामटेकडे फिरणाऱ्यांकडून दंडही केला वसुल

Next Post

जळगाव दूध संघात अत्याधुनिक मिल्कोस्कॅन सयंत्राचे खा.रक्षाताई खडसे यांच्या हस्ते उद्‌घाटन

Related Posts

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन

प्रा. भूपेंद्र बाणाईत यांची भाजप शिक्षक आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड

September 5, 2026
५,०१२ सहाय्यक प्राध्यापक पदभरती; पारदर्शकतेसाठी शासनाच्या कडक सूचना

September 3, 2026
Next Post
जळगाव दूध संघात अत्याधुनिक मिल्कोस्कॅन सयंत्राचे खा.रक्षाताई खडसे यांच्या हस्ते उद्‌घाटन

जळगाव दूध संघात अत्याधुनिक मिल्कोस्कॅन सयंत्राचे खा.रक्षाताई खडसे यांच्या हस्ते उद्‌घाटन

ताज्या बातम्या

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा – मंत्री गिरीश महाजन

September 7, 2026
शिरसोलीत ‘जीवनधारा’ शुद्ध पेयजल योजनेचा शुभारंभ – गांधी रिसर्च फाउंडेशनचा उपक्रम

शिरसोलीत ‘जीवनधारा’ शुद्ध पेयजल योजनेचा शुभारंभ – गांधी रिसर्च फाउंडेशनचा उपक्रम

September 7, 2026
अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन

अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन

September 7, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us