Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

अपघातांचे प्रमाण कमी होण्यासाठी सर्वांनी सामाजिक बांधिलकीच्या भावनेने प्रयत्न करणे आवश्यक – जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ. उगले              

najarkaid live by najarkaid live
June 25, 2019
in जळगाव
0
ADVERTISEMENT

Spread the love

            जळगाव –  अपघातांचे प्रमाण कमी होण्यासाठी व विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देण्यासाठी सर्वांनी सामाजिक बांधिलकीच्या भावनेने प्रयत्न करणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ. पंजाबराव उगले यांनी व्यक्त केले.

जिल्हा स्कुलबस समितीची बैठक पोलीस अधिक्षक कार्यालयातील प्रेरणा सभागृहात डॉ. उगले यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली, यावेळी ते बोलत होते. या बैठकीस उप प्रादेशिक परिवहन अधिकारी श्याम लोही, सहायक परिवहन अधिकारी किरण मोरे, जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी (माध्यमिक) बी. जे. पाटील, शहर वाहतुक शाखेचे पोलीस निरिक्षक देविदास कुणगर यांच्यासह स्कुलबस असोसिएशनचे पदाधिकारी, शालेय संस्था व विविध शासकीय विभागांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

यावेळी बोलतांना डॉ. उगले म्हणाले की, विद्यार्थी हे देशाचे भविष्य आहे त्यामुळे त्यांची सुरक्षितता महत्वाची आहे. यासाठी शाळा व्यवस्थापन, स्कुलबस असोसिएशन यांनी सामाजिक बांधिलकी जोपासणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी शासनाने स्कुलबस धोरण 2011 जाहिर केले आहे. यानुसार प्रत्येक शाळेत मुख्याध्यापकांच्या अध्यक्षतेखाली स्कुलबस समिती गठीत करणे आवश्यक आहे. ज्या शाळांनी अद्याप समिती गठीत केली नसेल त्यांनी तात्काळ गठीत करावी. या समितीच्या दर तीन महिन्याला बैठका घेणे आवश्यक असल्याचेही डॉ उगले यांनी बैठकीत सांगितले.

मुख्याध्यापकांना आपल्या शाळेत येणारे विद्यार्थी कशाप्रकारे शाळेत येतो. शालेय विद्यार्थ्यांची वाहतुक करणाऱ्या वाहनांची नियमित तपासणी झालेली आहे काय. त्याचबरोबर इतर बाबींची तपासणी करण्याकरीता शासन धोरणात शाळा व्यवस्थापनाची जबाबदारी निश्चित करण्यात आली आहे. त्यानुसार सर्व शाळांनी कार्यवाही करणेआवश्यक आहे. अन्यथा अशा शाळांवर कारवाई करण्याचा इशाराही डॉ उगले यांनी दिला. विद्यार्थी हा आपल्या कुटूंबाचा घटक आहे असे समजून विद्यार्थी वाहतुक करणारे वाहनचालक, स्कुलबस समिती असोसिएशन, शाळा व्यवस्थापन यांनी नेहमी विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देण्याचे आवाहनही डॉ. उगले यांनी केले.

शालेय विद्यार्थ्यांना स्कुलबसमधून उरवितांना तसेच चढवितांना वाहतुकीला अडथळा होता कामा नये. याकरीता वाहने रस्त्यावर न लावता ती शाळेच्या प्रांगणातच लावावी. स्कुलबसमध्ये अग्निशामक उपकरण, प्रथमोपचार पेटी आवश्यक आहे. तसेच चालकाला त्याचा नावाचा बॅच असणे आवश्यक आहे. शाळा भरण्याच्या व सुटण्याच्या वेळेत शाळा व्यवस्थापनांने शाळेच्या गेटवर दोन वॉर्डन ठेवणे आवश्यक आहे. स्कुलबस असोसिएशनने चालकांची नेमणूक करतांना त्यांची संपूर्ण माहिती करुन घ्यावी, चालक र्निव्यसनी असावा, त्याचेकडे वाहन चालविण्याचा परवाना असावा. वाहतुक क्षमतेपेक्षा अधिक विद्यार्थ्यांची वाहतुक करु नये. विद्यार्थी वाहतुक करणाऱ्या सर्व वाहनांना वाहतुक परवाना असणे आवश्यक आहे. ज्या वाहनांकडे असा परवाना नसेल त्यांचेवर कारवाई करण्यात येईल. असे उप प्रादेशिक परिवहन अधिकारी श्री. लोही यांनी बैठकीत सांगितले.

उत्कृष्ट शाळा/ उत्कृष्ट चालकांचा होणार गौरव

            ज्या शाळा व विद्यार्थी वाहतुक करणारे वाहनचालक विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देतील. तसेच वाहतुक नियमांचे पालन करतील. त्यांना वाहतुक सुरक्षा सप्ताहाच्या कार्यक्रमावेळी उत्कृष्ट शाळा / उत्कृष्ट चालक म्हणून गौरविण्यात येईल अशी माहिती जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ. उगले यांनी बैठकीत दिली. याबाबत शिक्षण विभाग तसेच शहर वाहतुक शाखा यांनी पालक, शाळा व्यवस्थापन वाहनचालकांमध्ये जनजागृती करण्याची सुचनाही डॉ. उगले यांनी केली.

यावेळी जिल्हा पोलीस अधिक्षक व उप प्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी स्कुलबस असोसिएशनच्या अडीअडचणी जाणून घेतल्या. विभागाशी संबंधित अडचणीवर सामंजस्याने तोडगा काढण्यात येईल. तथापि,  सर्वांनी वाहतुक नियमांचे पालन करण्याचे आवाहन उभयतांनी उपस्थितांना केले.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

जळगाव जिल्ह्यातील १५ पंचायत समिती सभापतींचे राजीनामास्त्र !

Next Post

जळगाव बाजार समितीत व्यापारी संकुल होणारचं -कैलास चौधरी 

Related Posts

बालगंधर्व संगीत महोत्सवात श्रुती बुजरबरुआ यांचे गायन व चिराग कट्टी यांचे सतार वादन; ९ ते ११ जानेवारीला रंगणार सांगीतिक पर्व

बालगंधर्व संगीत महोत्सवात श्रुती बुजरबरुआ यांचे गायन व चिराग कट्टी यांचे सतार वादन; ९ ते ११ जानेवारीला रंगणार सांगीतिक पर्व

January 7, 2026
प्रभाग क्र. ६ च्या विकासाचे आश्वासन नव्हे, वचन देतो

प्रभाग क्र. ६ च्या विकासाचे आश्वासन नव्हे, वचन देतो

January 7, 2026
जळगाव महापालिका निवडणूक : प्रभाग ६ मध्ये ‘तुतारी’चा जयघोष; छत्रपती शाहू महाराज नगरातून प्रचाराचा धडाका सुरू

जळगाव महापालिका निवडणूक : प्रभाग ६ मध्ये ‘तुतारी’चा जयघोष; छत्रपती शाहू महाराज नगरातून प्रचाराचा धडाका सुरू

January 7, 2026
प्रभाग क्र. १३ मध्ये बंडखोर उमेदवारांना भाजपाचा इशारा; महायुतीच्या अधिकृत उमेदवारांनाच मतदान करण्याचे आवाहन

प्रभाग क्र. १३ मध्ये बंडखोर उमेदवारांना भाजपाचा इशारा; महायुतीच्या अधिकृत उमेदवारांनाच मतदान करण्याचे आवाहन

January 7, 2026
दिनकर नगरात उत्स्फूर्त रॅली; अपक्ष उमेदवार सौ. चैताली ठाकरे यांचा होम-टू-होम मतदारांशी संवाद

दिनकर नगरात उत्स्फूर्त रॅली; अपक्ष उमेदवार सौ. चैताली ठाकरे यांचा होम-टू-होम मतदारांशी संवाद

January 5, 2026
७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

January 5, 2026
Next Post

जळगाव बाजार समितीत व्यापारी संकुल होणारचं -कैलास चौधरी 

ताज्या बातम्या

दुर्लक्ष करू नका! एकदा वाचलंच पाहिजे…गर्भाशयाच्या कॅन्सरपासून वाचण्यासाठी HPV लस महत्त्वाची का?

दुर्लक्ष करू नका! एकदा वाचलंच पाहिजे…गर्भाशयाच्या कॅन्सरपासून वाचण्यासाठी HPV लस महत्त्वाची का?

March 21, 2026
iPhone Spyware Darksword: जगभरातील कोट्यवधी iPhones धोक्यात; मोठा सायबर हल्ला उघड

iPhone Spyware Darksword: जगभरातील कोट्यवधी iPhones धोक्यात; मोठा सायबर हल्ला उघड

March 21, 2026
Fuel Price Hike News: युद्धाचा परिणाम; प्रीमियम पेट्रोल-डिझेल महागले, सामान्य दर किती?

Fuel Price Hike News: युद्धाचा परिणाम; प्रीमियम पेट्रोल-डिझेल महागले, सामान्य दर किती?

March 21, 2026
JCL 2026’ पर्व 2 ची घोषणा – जळगावमध्ये क्रिकेटचा जल्लोष; आयपीएलच्या धर्तीवर आर सी बाफना जळगाव क्रिकेट लीग 

JCL 2026’ पर्व 2 ची घोषणा – जळगावमध्ये क्रिकेटचा जल्लोष; आयपीएलच्या धर्तीवर आर सी बाफना जळगाव क्रिकेट लीग 

March 21, 2026
म्हणून जास्त उडायचं नसतं! Wait and Watch…” रुपाली चाकणकरांच्या राजीनाम्यावर रोहिणी खडसे यांची ‘पोस्ट’,राजकारण तापलं

म्हणून जास्त उडायचं नसतं! Wait and Watch…” रुपाली चाकणकरांच्या राजीनाम्यावर रोहिणी खडसे यांची ‘पोस्ट’,राजकारण तापलं

March 20, 2026
ब्रेकिंग : महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकरांचा तडकाफडकी राजीनामा

ब्रेकिंग : महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकरांचा तडकाफडकी राजीनामा

March 20, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us