मुंबई – दहावीचा निकाल कधी जाहीर होणार असा प्रश्न विद्यार्थी आणि पालकांकडून विचारला जात असतांना येत्या २७ मे रोजी दहावीचा निकाल लागू शकतो असं शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी आज पत्रकार परिषदेत माहिती दिली आहे.
तनिषा विद्यार्थिनीला बारावी परीक्षेत मिळाले 100 पैकी 100 टक्के
आज १२ वी चा निकाल जाहीर झाला, उत्तीर्ण झालेल्या विदयार्थ्यांचे शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी अभिनंदन केलं आहे. ज्या मुलांना कमी मार्क मिळाले आहेत, ती मुलं पुन्हा बसू शकतात. परीक्षा लवकर घेण्याची सूचना केल्या आहेत.बारावीमध्ये कमी गुण मिळाले आहेत, ते देखील पुन्हा परीक्षेला बसू शकतात. साधारण जुलैमध्ये ही परीक्षा होईल, ऑगस्टमध्ये निकाल लागतील.
दरम्यान, आज बारावीचा निकाल जाहीर झाला. बारावीच्या परीक्षेत एकूण ९३.३७ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. बारावीची एकूण 14 लाख 23 हजार 970 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. त्यापैकी या परीक्षेत एकूण 13 लाख 29 हजार 684 विद्यार्थी उत्तीर्ण झाले.










