जळगाव,(प्रतिनिधी)- लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज जळगाव जामोद, सावरगाव, बुलढाणा जिल्हा प्रतापराव जाधव, यांच्या प्रचारार्थ भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय जे. पी. नड्डा आले असता आज जळगाव विमानतळवरून सभेसाठी प्रस्थान झाले.
दरम्यान भाजपा जळगाव शहराचे आमदार राजूमामा भोळे, पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील,जिल्हा महानगर अध्यक्ष सौ. उज्वला बेंडाळे,जळगाव लोकसभा निवडणूक प्रमुख डॉ. राधेश्याम चौधरी जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर जळकेकर महाराज, जळगाव लोकसभेचे उमेदवार स्मिता वाघ यांनी विमानतळावर स्वागत केले.










