Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

 बोर्डी नाला प्रकल्पाच्या कंत्राटदारावर दंडात्मक कारवाई करा – जलसंपदा राज्यमंत्री बच्चू कडू

najarkaid by najarkaid
July 3, 2021
in Uncategorized
0
 बोर्डी नाला प्रकल्पाच्या कंत्राटदारावर दंडात्मक कारवाई करा – जलसंपदा राज्यमंत्री बच्चू कडू
ADVERTISEMENT

Spread the love

चांदूर बाजार, ता. 2 : बोर्डी नाला मध्यम प्रकल्प चांदूर बाजार तालुक्यातील 13 व अचलपूर तालुक्यातील 3 अशा 16 गावांसाठी वरदान ठरणार आहे. मात्र, प्रकल्पाचे काम असमाधानकारक असल्याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त करत जलसंपदा राज्यमंत्री बच्चू कडू यांनी प्रकल्पाच्या कंत्राटदारावर दंडात्मक कारवाई करण्याचे स्पष्ट निर्देश आज दिले.

जलसंपदा राज्यमंत्री श्री. कडू यांनी बोर्डी नाला प्रकल्पातील सांडवा, धरण, घळभरणी, धरणात झालेल्या अंशतः जलसाठ्याची पाहणी आज केली. या पाहणीदरम्यान बोरगांव मोहना, तुळजापूर गढी रस्त्यावरील पुच्छ कालव्याच्या पुलाचे काम सार्वजनिक बांधकाम विभागाकडून अद्यापही अपूर्ण असल्याबद्दल राज्यमंत्र्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. हे काम तात्काळ पूर्ण करण्याचे निर्देश त्यांनी प्रशासनाला दिले.

या प्रकल्पाची क्षमता 18.49 दलघमी इतकी आहे. जून 2022 मध्ये हा प्रकल्प पूर्ण क्षमतेने कार्यान्वित झाल्यावर 4 हजार 126 हेक्टर जमिनीला थेट सिंचनाचा लाभ मिळणार आहे. त्यामुळे प्रकल्पाचे महत्व लक्षात घेता हे काम वेळेत पूर्ण होणे आवश्यक आहे. ते तत्काळ पूर्ण करण्याचे निर्देश राज्यमंत्र्यांनी दिले.

तुळजापूर गढी येथे शेतीसाठी तात्काळ रस्ता द्यावा

तुळजापूर गढी येथील शेतात जाण्यासाठीचा रस्ता बंद करण्यात आला, अशी शेतकरी बांधवांची तक्रार होती. त्याचे गांभीर्य जाणून राज्यमंत्री श्री.कडू यांनी प्रत्यक्ष रस्ता व पांदणरस्त्यांची पाहणी केली. तुळजापूर गढी गावातील शेतकऱ्यांना शेतात जायला रस्ताच शिल्लक ठेवलेला नाही. त्यामुळे सुमारे 300 एकर जमीन पिकांपासून वंचित राहून नुकसान शेतकऱ्यांनाच भोगावे लागणार आहे. त्याबद्दल राज्यमंत्री श्री. कडू यांनी तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली. सार्वजनिक बांधकाम विभागाने शेतकरी बांधवांना तात्काळ रस्ता उपलब्ध करून द्यावा, असे निर्देश राज्यमंत्र्यांनी यावेळी दिले.

प्रकल्पाची कामे वेळेत पूर्ण होणे आवश्यक आहे. कंत्राटदाराबाबत ग्रामस्थांच्या तक्रारी आहेत. या कंत्राटदाराविरूद्ध दंडात्मक कारवाई तात्काळ करावी, असे निर्देश राज्यमंत्र्यांनी दिले. या पाहणी दरम्यान जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता अभियंता सुनील राठी,सांबाविचे अचलपूर विभागाचे कार्यकारी अभियंता सी. यु. मेहेत्रे, उपअभियंता एम.पी.भेंडे, सहाय्यक अभियंता श्रेणी 1 -निरज माळवे, प्रहारचे पदाधिकारी दिपक भोगाडे आदी उपस्थित होते.

Spread the love
Tags: #बच्चू कडू
ADVERTISEMENT
Previous Post

पाचोऱ्यात राष्ट्रवादी तफेॅ इंधन दरवाढ विरोधात आंदोलन

Next Post

बकरी ईद संदर्भात गृह विभागाच्या मार्गदर्शक सूचना जारी

Related Posts

Railway Recruitment 2026 Apply Online: 10वी पास उमेदवारांसाठी 2801 पदांची मोठी भरती जाहीर

Railway Recruitment 2026 Apply Online: 10वी पास उमेदवारांसाठी 2801 पदांची मोठी भरती जाहीर

April 9, 2026
जिल्ह्यात जनगणना २०२७ साठी फिल्ड ट्रेनर्ससाठी  ११ एप्रिल पर्यंत प्रशिक्षणाचे आयोजन

जिल्ह्यात जनगणना २०२७ साठी फिल्ड ट्रेनर्ससाठी  ११ एप्रिल पर्यंत प्रशिक्षणाचे आयोजन

April 7, 2026
Indian Army Agniveer Recruitment 2026: 10वी पाससाठी 25,000+ पदांची मोठी भरती जाहीर!

Indian Army Agniveer Recruitment 2026: 10वी पाससाठी 25,000+ पदांची मोठी भरती जाहीर!

April 7, 2026
Bombay High Court Recruitment 2025-26: क्लर्क,ड्रायव्हर,शिपाई,स्टेनो 2300 पेक्षा पदांची भरती 

Bombay High Court Recruitment 2025-26: क्लर्क,ड्रायव्हर,शिपाई,स्टेनो 2381पदांची भरती 

March 29, 2026
Arogya Vibhag Bharti 2026: महाराष्ट्र आरोग्य विभागात 1440 अधिकारी पदांसाठी मेगाभरती

Arogya Vibhag Bharti 2026: महाराष्ट्र आरोग्य विभागात 1440 अधिकारी पदांसाठी मेगाभरती

March 28, 2026
राजकारणात मोठा भूकंप? शरद पवारांचे अर्धे खासदार शिंदेंच्या संपर्कात? राज्यात खळबळ

राजकारणात मोठा भूकंप? शरद पवारांचे अर्धे खासदार शिंदेंच्या संपर्कात? राज्यात खळबळ

March 27, 2026
Next Post
जिल्हास्तर युवा पुरस्कार प्रस्ताव सादर करण्यास मुदतवाढ

बकरी ईद संदर्भात गृह विभागाच्या मार्गदर्शक सूचना जारी

ताज्या बातम्या

बोदवडचे  नगरसेवक भरत पाटील यांच्यावर दुःखाचा डोंगर; सुपुत्राचा अपघाती दुर्दैवी मृत्यू!

बोदवडचे नगरसेवक भरत पाटील यांच्यावर दुःखाचा डोंगर; सुपुत्राचा अपघाती दुर्दैवी मृत्यू!

April 13, 2026
Physics Wallah Jalgaon News – PW Aagaz 2026 मध्ये “टॉपर्स नव्हे, चॅम्पियन्स घडवण्याचे आमचे लक्ष” - सचिन मानकावडे

Physics Wallah Jalgaon News – PW Aagaz 2026 मध्ये “टॉपर्स नव्हे, चॅम्पियन्स घडवण्याचे आमचे लक्ष” – सचिन मानकावडे

April 13, 2026
Free Health Checkup Camp: वाघ नगर येथे मोफत नेत्र व आरोग्य शिबीर उत्साहात संपन्न

वाघ नगर परिसरात मोफत नेत्र व आरोग्य तपासणी शिबीर उत्साहात संपन्न

April 13, 2026
US-Iran Tension News  अमेरिका-इराण तणाव वाढला, युद्धाचा धोका पुन्हा तीव्र

US-Iran Tension News : अमेरिका-इराण तणाव वाढला, युद्धाचा धोका पुन्हा तीव्र

April 13, 2026
Maharashtra Crime News: स्नॅपचॅट प्रकरणामुळे महाराष्ट्र हादरला! अल्पवयीन मुलींवर अत्याचार

Maharashtra Crime News: स्नॅपचॅट प्रकरणामुळे महाराष्ट्र हादरला! अल्पवयीन मुलींवर अत्याचार

April 13, 2026
PhD Student Suicide  | पीएच.डी गाइडकडून छळ;  विद्यार्थिनीची आत्महत्या, प्राध्यापक अटकेत

PhD Student Suicide  | पीएच.डी गाइडकडून छळ;  विद्यार्थिनीची आत्महत्या, प्राध्यापक अटकेत

April 13, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us