मोबाईल मध्ये अश्लील व्हिडिओ पाहिल्यानंतर एका अल्पवयीन भावा-बहिणीने देखील त्याच स्वरूपाचं कृत्य करत शाररिक संबंध ठेवल्याची व त्यातून अल्पवयीन मुलगी गरोदर राहिल्याने ही धक्कादायक घटना उघड झाली आहे. सदर घटना नवी मुंबईतील पनवेलमध्ये घडली असून एका अल्पवयीन भावा-बहिणीच्या शारीरिक संबंध प्रस्थापित केल्याची घटना समोर आल्याने एकच खळबळ माजली आहे.
दरम्यान, या सगळ्या प्रकरणात हादरवून टाकणारी घटना म्हणजे भावापासूनच अल्पवयीन बहिण ही गरोदर राहिली आहे. त्यामुळे आता पोलिसांनी अल्पवयीन भावाविरुद्ध देखील गुन्हा दाखल केला आहे. पनवेलमध्ये राहणारे अल्पवयीन भाऊ-बहिणीने शारीरिक संबंधांवर आधारित व्हिडिओ पाहून अशा प्रकारचं कृत्य केल्याचं तपासात समोर आलं आहे.
पॉर्न व्हिडिओ पाहिल्यानंतर दोघांमध्ये शारीरिक संबंध प्रस्थापित झाले. काही दिवसांनी अल्पवयीन मुलीच्या अचानक पोटात दुखू लागलं. त्यामुळे तिला वाशीच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं. यावेळी ही मुलगी तीन महिन्यांची गरोदर असल्याचे दिसून आले. त्यानंतर हा सगळा प्रकार उघडकीस केला. अशी माहिती पोलिसांना दिली.
ही घटना पनवेल हद्दीत घडल्याने वाशी पोलिस ठाण्यात बलात्कार आणि पोक्सो कायद्याचा गुन्हा दाखल करण्यात आला. त्यामुळे हे प्रकरण आता खंडेश्वर पोलिसांकडे वर्ग करण्यात आले आहे.
पोलिसांनी अधिक तपास केल्यानंतर नोव्हेंबर 2023 ते जानेवारी 2024 या कालावधीत हा संपूर्ण प्रकार झाला असल्याचं समोर आलं. त्यामुळे असून पोलिसांनी पुढील कायदेशीर कारवाई सुरू केली आहे. मात्र आरोपी मुलगा अल्पवयीन असल्याने पोलिसांनी याबाबत अधिक बोलण्यास नकार दिला आहे.










