जळगाव,(प्रतिनिधी)- सर्वत्र निवडणुकीचे वातावरण तापलं असून उमेदवारांच्या प्रचारार्थ विविध पक्षाचे नेते दौरे करतांना दिसत आहे. दरम्यान प्रचार दौऱ्यानिमित्त जळगाव येथे आलेले शरद पवार यांची विमानतळावर आगमन झाले असता जळगाव लोकसभा भाजपाच्या उमेदवार स्मिता वाघ व जळगाव शहराचे उमेदवार आ. राजू मामा भोळे हे देखील विमानतळावर उपस्थित असल्याने शरद पवार यांची भेट घेत आशीर्वाद घेतले.
भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा देखील आज जळगाव जामोद, सावरगाव, बुलढाणा जिल्हा प्रतापराव जाधव, यांच्या प्रचारार्थ सभेसाठी आले होते त्यांचं भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी स्वागत केले त्यानंतर जळगाव विमानतळा वरून जे. पी. नड्डा यांनी सभेच्या ठिकाणी जाण्यासाठी प्रस्थान केले.याचं दरम्यान आज राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे सुप्रिमो शरद पवार हे रावेर लोकसभा महाविकास आघाडीच्या उमेदवार श्रीराम पाटील यांच्या प्रचारार्थ जामनेर येथील मेळाव्याला भेट देण्यासाठी जळगाव विमानतळावर दाखल झाले होते याचं दरम्यान ही भेट झाली.
शरद पवार हे वरिष्ठ नेते असल्याने जळगाव लोकसभा भाजपा उमेदवार स्मिता वाघ व आमदार राजूमामा भोळे यांनी शरद पवार यांचे वाकून नमस्कार करत आशीर्वाद घेतले.










