जळगाव | नजरकैद न्युज – जळगाव महानगरपालिका निवडणूक 2026 च्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक 12 (क) मध्ये महायुतीच्या अधिकृत उमेदवार गायत्री इंद्रजित राणे यांनी प्रचारात आघाडी घेतली असून, थेट मतदारांशी संवाद आणि वैयक्तिक भेटीगाठींवर त्यांनी भर दिला आहे. “प्रभाग क्र. 12 चा विकास हाच आमचा संकल्प” असा ठाम विश्वास व्यक्त करत त्या मतदारांकडे विकासासाठी मतदानरूपी आशीर्वाद मागत आहेत.

महायुतीकडून भाजपाच्या कमळ चिन्हावर निवडणूक लढवीत असलेल्या गायत्री राणे या प्रचारादरम्यान शहराच्या उज्ज्वल भविष्यासह प्रभागाच्या सर्वांगीण विकासाचा ठोस आराखडा मतदारांसमोर मांडत आहेत. नागरिकांच्या समस्या ऐकून घेत, पायाभूत सुविधा, स्वच्छता, रस्ते, पाणीपुरवठा, शिक्षण व महिलांसाठी सुरक्षिततेस प्राधान्य देण्याचे आश्वासन त्या देत आहेत.
प्रभागातील घराघरांत जाऊन संवाद साधताना त्या म्हणत आहेत की, “विश्वासाने मतदान करा, आम्ही विकासाची हमी देतो. प्रभागातील प्रत्येक घटकाचा समावेश असलेला विकास हाच आमचा ध्यास आहे.” त्यांच्या या थेट संवाद पद्धतीला मतदारांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र आहे.
प्रभाग क्रमांक 12 मध्ये महायुतीची मजबूत टीम मैदानात उतरली असून, प्रभाग 12 (अ) मधून अनिल सुरेश अडकमोल, प्रभाग 12 (ड) मधून नितीन मनोहर बरडे निवडणूक लढवीत आहेत.तर प्रभाग 12 (ब) मधून भाजप महायुतीच्या उमेदवार सौ. उज्वला मोहन बेंडाळे या बिनविरोध निवडून आल्याने महायुतीला मोठे बळ मिळाले आहे.
उमेदवार गायत्री इंद्रजित राणे यांच्या पतींचा देखील या संपूर्ण प्रभागात दांडगा जनसंपर्क असून, सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात त्यांचा सक्रिय सहभाग आहे. त्यांच्या या सामाजिक कार्याची दखल नागरिक घेत असल्याने निवडणुकीत याचा निश्चितच फायदा होईल, असा विश्वास कार्यकर्त्यांमध्ये व्यक्त केला जात आहे.
एकूणच, संघटित महायुती, प्रभावी प्रचार, थेट जनसंवाद आणि विकासाचा ठाम अजेंडा यामुळे प्रभाग क्रमांक 12 मध्ये गायत्री इंद्रजित राणे यांची उमेदवारी अधिक मजबूत होताना दिसत आहे.









