Vidhan Parishad Q&A Highlights 25 March 2026: विधान परिषदेत महिलांसाठी कर्ज योजना, सायबर गुन्ह्यांवर कारवाई, भरती प्रक्रिया आणि विविध महत्त्वाच्या निर्णयांची माहिती जाणून घ्या.
मोठी बातमी : LPG गॅस बुकिंगचे नियम बदलले; जाणून घ्या नवीन अपडेट
Vidhan Parishad Q&A Highlights 25 March 2026: राज्यातील मोठे निर्णय एका क्लिकमध्ये
Vidhan Parishad Q&A Highlights 25 March 2026 अंतर्गत आज विधान परिषदेत अनेक महत्त्वाचे मुद्दे चर्चेत आले. महिलांचे सक्षमीकरण, सायबर गुन्ह्यांवर नियंत्रण, सरकारी भरती, नोंदणी सेवा सुधारणा आणि कायदा-सुव्यवस्थेसंबंधी अनेक मोठे निर्णय जाहीर करण्यात आले. राज्य सरकारने विविध क्षेत्रांमध्ये सुधारणा आणि नागरिकांना थेट फायदा होईल अशा योजनांवर भर दिला आहे.

**
खालील
विधान परिषद मधील प्रश्न उत्तरे
पोर्टल वर अपडेट करण्यासाठी योग्य हेडिंग दे
मार्च 25, 2026
महिलांच्या सक्षमीकरणासाठी योजनांचे एकत्रीकरण करून व्यवसायासाठी कर्ज सुविधेशी जोडण्याबाबत शासन सकारात्मक – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मुंबई, दि. २५ :- राज्यातील महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी राबविण्यात येणाऱ्या योजनांना कर्ज सुविधेशी जोडण्याबाबत शासन सकारात्मक आहे. राज्यातील विविध महामंडळांच्या योजनांचे एकत्रीकरण करून त्या ‘लाडकी बहिण’ सारख्या योजनांशी जोडण्यासंदर्भात मुख्य सचिवांना निर्देश दिले जातील. महिलांना क्रेडिट आधारित मदत देऊन स्वावलंबी बनविण्यावर शासनाचा भर असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानपरिषदेत सांगितले.
सदस्य अभिजित वंजारी यांनी वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळावर थेटकर्ज योजना सुरू करण्याबाबत विधानपरिषदेत प्रश्न उपस्थित केला होता. या प्रश्नाच्या चर्चेत सदस्य प्रवीण दरेकर, भाई जगताप, राजेश राठोड यांनी उपप्रश्न विचारात सहभाग घेतला.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, राज्य शासनामार्फत महिलांना देण्यात येत असलेल्या १,५०० रुपयांच्या आर्थिक सहाय्याचा उपयोग केवळ खर्चापुरता न राहता, त्यातून महिलांना व्यवसाय उभारण्यासाठी क्रेडिट सुविधा उपलब्ध करून देण्यावर राज्य शासनाचा भर आहे. यासंदर्भात आमदार प्रवीण दरेकर यांनी पुढाकार घेतला आहे. त्यांच्या पुढाकारातून सुमारे १,२०० महिलांना कर्ज उपलब्ध करून दिले असून या महिलांनी स्वतःचे लघुउद्योग सुरू केले आहेत. या महिलांकडून कर्जफेडही नियमितपणे सुरू असून, अल्प आर्थिक सहाय्यातून मोठे व्यवसाय उभे राहण्याची प्रक्रिया सुरू झाल्याचे श्री.फडणवीस यांनी सांगितले.
बंजारा समाजासंदर्भातील प्रलंबित प्रश्नांबाबत उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली आयोगाची स्थापना करण्यात आली आहे. या आयोगाचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर पुढील आवश्यक कार्यवाही करण्यात येईल असेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितले.
या प्रश्नाच्या उत्तरात अधिक माहिती देताना इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे म्हणाले, वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळाच्या योजनांसाठी सध्या असलेले २०० कोटींचे भागभांडवल वाढवून एक हजार कोटी करण्याचा प्रस्ताव शासनास पाठविण्यात आला आहे.

मंत्री सावे म्हणाले, वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळ व महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ यांच्यामार्फत केंद्र शासनाच्या एनबीसीएफडीसी
योजनेमधूनही लाभार्थ्यांना लाभ दिला जातो. या योजनेच्या काही अटी शिथिल करण्यात येणार असल्याने लाभार्थींना या योजनेतून अधिकचा लाभ घेता येईल. तसेच वसंतराव नाईक विमुक्त जाती-भटक्या जमातींसाठी एक लाखांपर्यंत आर्थिक सहाय्य देण्याची योजना सुरू असल्याची माहितीही मंत्री सावे यांनी यावेळी दिली.
००००
नोंदणी सेवेतील लायसन्स नूतनीकरणासाठी अलर्ट प्रणाली – माहिती तंत्रज्ञान मंत्री आशिष शेलार
मुंबई, दि.२५ : राज्यात नोंदणी महानिरीक्षक कार्यालयातील आधार-आधारित व्यवहार सुरळीत व्हावेत यासाठी नोंदणी सेवेतील लायसन्स कालबाह्य होण्यापूर्वीच ती नूतनीकरण करण्यासाठी सूचना देणारी सॉफ्टवेअर-आधारित अलर्ट प्रणाली कार्यान्वित करण्यात येणार असल्याचे माहिती तंत्रज्ञान मंत्री आशिष शेलार यांनी विधानपरिषदेत सांगितले.
ऑनलाइन नोंदणी प्रक्रियेतील तांत्रिक अडचणी दूर करण्याबाबत सदस्य निरंजन डावखरे यांनी विधानपरिषदेत प्रश्न उपस्थित केला होता.

मंत्री शेलार म्हणाले, राज्यातील नोंदणी सेवांमध्ये दोन टप्प्यांत एकूण १४ दिवस तांत्रिक अडथळा निर्माण झाला होता. युआयडीएआयकडून मिळणारे लायसन्स वेळेत नूतनीकरण न झाल्याने ही समस्या उद्भवली होती. तसेच लायसन्स नूतनीकरण करण्याची जबाबदारी
असलेल्या अधिकाऱ्यावर अन्य दुसऱ्या प्रकरणात विभागीय कारवाई सुरू असल्यामुळेही नूतनीकरणात विलंब झाला. मात्र, लायसन्स तातडीने नूतनीकरण करून सेवा पुन्हा सुरू करण्यात आल्याचे मंत्री आशिष शेलार यांनी सांगितले
००००
आरे दुग्ध वसाहत युनिट क्र. २१ मध्ये राडारोडा टाकलेल्या व्यक्तीवर गुन्हा दाखल -दुग्ध विकास मंत्री अतुल सावे
मुंबई, दि.२५:- आरे दुग्ध वसाहतीमधील युनिट क्रमांक २१ मध्ये राडारोडा टाकलेल्या व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती दुग्ध विकास मंत्री अतुल सावे यांनी विधानपरिषदेत दिली.
सदस्य उमा खापरे यांनी या विषयी उपस्थित केलेल्या प्रश्नाच्या चर्चेत सदस्य प्रवीण दरेकर, भाई जगताप, शशिकांत शिंदे यांनी उपप्रश्न विचारत सहभाग घेतला.
मंत्री सावे म्हणाले, आरे दुग्ध वसाहतीमधील युनिट क्रमांक २० मध्ये वृक्षतोड किंवा काँक्रिटीकरण झालेले नाही. मात्र, युनिट २१ मध्ये बांधकामाचा राडारोडा टाकण्यात आला होता. मात्र हा राडारोडा पूर्णपणे हटविण्यात आला आहे. आरे दुग्ध वसाहतीमध्ये सुरक्षेच्या दृष्टीने सध्या ३५ रक्षक कार्यरत आहेत. आणखी ३३ सुरक्षा रक्षकांच्या नियुक्तीस वित्त विभागाने मान्यता दिली असून लवकरच त्यांची भरती केली जाणार आहे. या सुरक्षा रक्षकांना प्राधिकरणाच्या सीमावर्ती भागावरही लक्ष ठेवण्याचे निर्देश देण्यात येतील.

मंत्री सावे म्हणाले, आरे दुग्ध वसाहत भागात झालेल्या अतिक्रमणांवर कारवाई केली जात असून आतापर्यंत ४६९ अतिक्रमणांवर कारवाई करून ती पाडण्यात आली असून संबंधितांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
मंत्री आशिष शेलार म्हणाले, मुंबई येथील आरे दुग्ध वसाहतीमधील बेकायदेशीर वृक्षतोड व कॉंक्रिटीकरण काम हा विषय मुंबई उपनगर जिल्ह्यात येतो. त्यामुळे मुंबई उपनगर जिल्ह्याचा पालकमंत्री या नात्याने या विषयी कार्यवाही करण्यासाठी संबंधित विभाग, महापालिका, पोलीस, वन विभाग, पर्यावरण विभाग आणि जिल्हाधिकारी यांची बैठक महिन्याभरात आयोजित केली जाईल. तसेच अनधिकृत बांधकामांवर नियंत्रणासाठी ‘नेत्रम’ या जीआयएस आधारित सॅटेलाईट मॅपिंग ॲपचा वापर करण्यात येईल. हे ॲप प्रधानमंत्री गतीशक्ती उपक्रमाशी जोडलेले आहे. ॲपच्या माध्यमातून अतिक्रमणांची नोंद व त्यावर कारवाई करण्यासाठी यंत्रणा अधिक सक्षम केल्या जातील असे मंत्री आशिष शेलार म्हणाले.
००००
एकनाथ पोवार/विसंअ
दिव्यांग सक्षमीकरण विभागासाठी लवकरच नियमित भरती प्रक्रिया – मंत्री अतुल सावे
सुधारित आकृतीबंधास मंजुरी
मुंबई, दि.25 : राज्यातील दिव्यांग सक्षमीकरण विभागाच्या सुधारित आकृतीबंधास मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे. नियमित भरती प्रक्रिया लवकरच सुरू करण्यात येणार असल्याची माहिती मंत्री अतुल सावे यांनी विधान परिषदेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली.
याबाबत सदस्य शशिकांत शिंदे यांनी प्रश्न उपस्थित केला. तर सदस्य प्रविण दरेकर, संजय केनेकर यांनी उपप्रश्न उपस्थित केले.

मंत्री अतुल सावे म्हणाले, विभागाचे सेवाप्रवेश नियम अंतिम टप्प्यात आहेत. नियम तयार झाल्यानंतर महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत नियमित पदभरती प्रक्रिया राबविण्यात येईल. सध्या विभागासाठी एकूण २१०५ पदांना मान्यता देण्यात आली आहे. यामध्ये मंत्रालयीन स्तरावर ६७ पदे, तर आयुक्तालय व जिल्हास्तरावर १४०२ नियमित आणि ६३६ बाह्यस्त्रोतावरील पदांचा समावेश आहे.
10 जानेवारी 2025 रोजी पदे प्रतिनियुक्तीने भरण्याची कार्यवाही करण्यात आली. मात्र पात्र उमेदवार उपलब्ध न झाल्याने गट-ब व गट-क अधिकाऱ्यांकडे अतिरिक्त कार्यभार सोपविण्यात आला आणि 1 मे 2025 पासून 13 जिल्ह्यांत कार्यालये सुरू करण्यात आली.
त्यानंतर 25 ऑगस्ट 2025 च्या निर्णयानुसार गट-अ व गट-ब अधिकाऱ्यांकडे जबाबदारी देण्यात येऊन 1 सप्टेंबर 2025 पासून सर्व 36 जिल्ह्यांत कार्यालये कार्यान्वित झाली असून, मुख्य कार्यकारी अधिकारी व उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली कामकाज सुरू असल्याचे मंत्री अतुल सावे यांनी यावेळी स्पष्ट केले.
0000
सायबर फसवणुकीविरोधात जनजागृती व कारवाईवर भर – राज्यमंत्री पंकज भोयर
मुंबई, दि.25 : राज्यात वाढत्या सायबर फसवणुकीच्या घटनांना आळा घालण्यासाठी शासनाने जनजागृती आणि कडक कारवाई या दुहेरी धोरणावर भर दिला आहे. नागरिकांना सतर्क करण्यासाठी विविध माध्यमांतून व्यापक मोहीम राबविण्यात येत असल्याची माहिती राज्यमंत्री पंकज भोयर यांनी विधानपरिषदेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली.
याबाबत सदस्य सत्यजित तांबे यांनी प्रश्न उपस्थित केला होता.

राज्यमंत्री पंकज भोयर म्हणाले, राज्यात 2025 मध्ये मुंबई, पुणे आणि नागपूर येथे बनावट ई-चलन लिंकद्वारे फसवणुकीचे 40 गुन्हे दाखल झाले असून 17 आरोपींना अटक करण्यात आली आहे. तसेच संशयास्पद लिंक व एपीके फाईल्सद्वारे फसवणुकीचे 193 गुन्हे नोंद असून 36 आरोपींना अटक करण्यात आली आहे. सायबर गुन्ह्यांवर नियंत्रणासाठी महापे (नवी मुंबई) येथे सायबर सुरक्षा प्रकल्पाचे मुख्यालय कार्यरत असून, राज्यभर 50 जिल्हा सायबर लॅब्स सुरू करण्यात आल्या आहेत. तांत्रिक तपासासाठी पोलिसांना विशेष प्रशिक्षण देण्यात येत आहे.
जनतेमध्ये जागरूकता वाढविण्यासाठी

www.cybercrime.gov.in ही वेबसाईट आणि 1930 हेल्पलाइनचा प्रचार सोशल मीडियाद्वारे तसेच रेल्वे स्थानकांवरील एलईडी स्क्रीनद्वारे करण्यात येत आहे. परिवहन विभागाकडूनही बनावट वेबसाईट्स व ई-चलन लिंकपासून सावध राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. सायबर गुन्ह्यांवर प्रभावी नियंत्रणासाठी महाआयटी आणि सायबर विभागाच्या समन्वयातून, माहिती-तंत्रज्ञान मंत्री यांच्या मार्गदर्शनाखाली लवकरच बैठक घेण्यात येईल असे राज्यमंत्री पंकज भोयर यांनी यावेळी सांगितले.
0000
भुसावळ येथील गोळीबार घटना… चौथा आरोपी अटकेत – गृह राज्यमंत्री पंकज भोयर
मुंबई, दि. २५:- जळगाव जिल्ह्यातील भुसावळ येथे १७ डिसेंबर २०२५ रोजी घडलेल्या गोळीबार घटनेतील चौथ्या आरोपीस अटक करण्यात आली असून या घटनेचा पुढील तपास सुरू असल्याचे गृह राज्यमंत्री पंकज भोयर यांनी विधानपरिषदेत सांगितले.
सदस्य शशिकांत शिंदे यांनी याविषयी विधानपरिषदेत प्रश्न उपस्थित केला होता.
गृह राज्यमंत्री पंकज भोयर म्हणाले, भुसावळ येथील जळगाव नाका परिसरात युवकांना धमकावून पैसे व दागिने मागण्याच्या प्रकारातून गोळीबार झाल्याची घटना घडली. या घटनेनंतर तातडीने कारवाई करत पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली होती. अटक करण्यात आलेले तिन्ही आरोपी अल्पवयीन असल्यामुळे न्यायालयाच्या आदेशानुसार त्यांना बालसुधारगृहात पाठविण्यात आले होते. त्यानंतर बाल न्याय मंडळ, जळगाव यांनी त्यांना मुक्त केले. या घटनेतील चौथा आरोपी फरार होता. मात्र त्यालाही अटक करण्यात आली असून सध्या तो पोलिसांच्या ताब्यात आहे.

परवान्याशिवाय शस्त्र बाळगणे हा गंभीर गुन्हा असल्याचे सांगत गृह राज्यमंत्री पंकज भोयर म्हणाले, या घटनेतील आरोपीला पिस्तूल कुठून मिळाले याचा सखोल तपास करून संबंधितांवर कठोर कारवाई केली जाईल. तसेच भुसावळ शहरातील गुन्हेगारी कमी करण्यासाठी पोलिसांकडून गस्त वाढविण्यात येते आहे. डायल ११२ सेवा आणि दामिनी बीट पेट्रोलिंगद्वारे नागरिकांना तत्काळ मदत दिली जात असल्याचे गृह राज्यमंत्री भोयर यांनी सांगितले.
००००
द एशियाटिक सोसायटीची निवडणूक प्रक्रिया नव्याने राबविण्यात येणार – राज्यमंत्री आशिष जयस्वाल
मुंबई, दि. २५ : द एशियाटिक सोसायटी ऑफ बॉम्बेच्या निवडणूक प्रक्रियेबाबत आलेल्या तक्रारींची दखल घेत, निवडणूक प्रक्रिया नव्याने राबविण्यात येणार असल्याची माहिती राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांनी विधान परिषदेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली.
याबाबत सदस्य प्रसाद लाड यांनी प्रश्न उपस्थित केला होता.
राज्यमंत्री आशिष जयस्वाल म्हणाले, संस्थेच्या अध्यक्ष, उपाध्यक्ष, मानद सचिव आणि सदस्यांच्या निवडणुकीसंदर्भात यावर्षी अनेक तक्रारी प्राप्त झाल्या. विशेषतः मतदार यादी जाहीर न करणे आणि निवडणुकीपर्यंत सातत्याने नवीन नोंदणी सुरू ठेवणे, या बाबींवर आक्षेप घेण्यात आले. त्यामुळे आता नव्याने मतदार यादी जाहीर करून त्यावर आक्षेप मागविणे, कट-ऑफ तारीख निश्चित करणे आणि संपूर्ण प्रक्रिया पारदर्शक पद्धतीने पूर्ण केल्यानंतर लवकरात लवकर निवडणूक घेण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
0000
न्यायालयाच्या जुन्या इमारतींच्या पुनर्बांधणी व संवर्धनाची प्रक्रिया सुरू – राज्यमंत्री आशिष जयस्वाल
मुंबई, दि.२५ : राज्यातील जुन्या न्यायालयीन इमारतींच्या स्थितीबाबत शासनाने गंभीर दखल घेत पुनर्बांधणी, दुरुस्ती आणि संवर्धनाची प्रक्रिया सुरू केली असल्याची माहिती राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांनी विधान परिषदेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली.

याबाबत सदस्य अभिजीत वंजारी यांनी प्रश्न उपस्थित केला.
राज्यमंत्री आशिष जयस्वाल म्हणाले, संबंधित १८ इमारतींपैकी अनेक इमारती अत्यंत जीर्ण अवस्थेत असल्याने काही इमारती पाडून त्याच ठिकाणी नव्याने बांधण्यात आल्या आहेत. सध्या काही इमारती वापरात असून काहींच्या पुनर्बांधणीसाठी कार्यवाही सुरू आहे. दापोली, जुन्नर आणि हिंगोली येथील काही इमारती वापरात नसून, संबंधित न्यायालये नव्या इमारतींमध्ये स्थलांतरित करण्यात आली आहेत.
या प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयात याचिका प्रलंबित असून सार्वजनिक बांधकाम विभागाकडून ५ डिसेंबर २०२५ रोजी प्रतिज्ञापत्र सादर करण्यात आले आहे. न्यायालयाच्या निर्देशानुसार पुढील कार्यवाही केली जात आहे. कोल्हापूर, दापोली, जुन्नर, मुंबईतील लघुवाद न्यायालय तसेच गिरगाव व बॅलार्ड पियर येथील काही इमारतींना ‘हेरिटेज’ दर्जा देण्यात आला असून त्यांचे संवर्धन व दुरुस्ती करण्यावर भर दिला जात आहे.

वापरात असलेल्या तसेच वापरात नसलेल्या इमारतींचे जतन करत, आवश्यक तेथे नवीन इमारती उभारून न्यायव्यवस्थेस सक्षम पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्याचा शासनाचा प्रयत्न आहे असे राज्यमंत्री जयस्वाल यांनी स्पष्ट केले.
0000
ब्रेकिंग न्यूज
कॅप्टन’ म्हणवणारा अशोक खरात प्रत्यक्षात १० वी फेल; अंकशास्त्र तज्ज्ञ म्हणवणारा गणितातच नापास !
सोशल मीडियावर ओळख,धमकी…विद्यार्थिनीचे फोटो व्हायरल
भोंदूबाबा खरात प्रकरणात धक्कादायक मुद्दे ! ‘५ जणांचा नरबळी’ : कोर्टात नेमकं काय घडलं?
नराधम भोंदूबाबा खरातने विद्यार्थिनीलाही सोडले नाही : आणखी तीन गुन्हे दाखल
अमेरिका-इराण युद्धामुळे सोनं-चांदी स्वस्त
पंतप्रधान मोदी म्हणाले, “या युद्धामुळे भारतासमोर अभूतपूर्व आव्हाने, कोरोना काळासारखं लढावं लागणार”
Job Alert
Railway Recruitment 2026 : रेल्वेत तब्बल ११,५५८ रिक्त पदांसाठी मेघाभरती,१२ पास लगेच करा अर्ज
10वी पास उमेदवारांसाठी 5349 जागांची मोठी भरती
सरकारी कंपनीत नोकरीची संधी ; 1.40 लाख पगार
भंडारा ऑर्डनन्स फॅक्टरीत 400 पदांसाठी मोठी भरती
SSB : कॉन्स्टेबल, ट्रेड्समन & ड्राइवर, 827 पदांसाठी लगेच करा अर्ज
MPSC Recruitment 2026: 271 गट-अ पदांसाठी मोठी भरती; 9 एप्रिलपर्यंत अर्ज करा
भारतीय संविधानातील ६ मौलिक अधिकार सविस्तर माहिती,हे तुम्हाला माहिती पाहिजेचं…
Indian Navy : अग्निवीर पदांकारिता 10वी पास उमेदवारांसाठी सुवर्णसंधी, अर्ज सुरू!
सेंट्रल रेल्वेत 51 पदांसाठी भरती ,परीक्षा नाही
भुसावळ , पुणे आणि सोलापूर येथे मिळणार नियुक्ती
UPSC : 1358 CMS पदांसाठी भरती जाहीर
Job Alert : छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका येथे 222 जागांसाठी मोठी भरती, 31 मार्च शेवटची तारीख
भुसावळ ECHS भरती जाहीर; स्थानिक उमेदवारांसाठी मोठी संधी
सरकारी कंपनीत नोकरीची संधी ; 1.40 लाख पगार
ताज्या अपडेट जाणून घेण्यासाठी: http://najarkaid.com
इतर बातम्या…
खाद्य तेल महागले! राज्यभरात दरवाढीचा भडका
भेसळयुक्त दूध पिल्याने 16 जणांचा मृत्यू
Crime News: नात्याला काळीमा! चुलत्याकडून पुतणीवर अत्याचार; 5 महिन्यांनी उघडकीस
प्रेमविवाहाच्या रागातून तरुणाला थेट नग्न करून खांबाला बांधले,अमानुष मारहाण
इंस्टाग्राम रील्स शूट करताना BJP नेत्याच्या मुलाचा मृत्यू, धक्कादायक घटनेने परिसरात खळबळ
शाळेला सुट्टी लागली? फॅमिली ट्रिपसाठी महाराष्ट्रातील बेस्ट ठिकाणं
Best Term Insurance: ₹500 दरमहा भरून ₹1 कोटी कव्हर शक्य आहे का? जाणून घ्या सत्य!
Axis Bank Insurance : कमी प्रीमियम + जास्त फायदे! पॉलिसी निहाय संपूर्ण माहिती वाचा
कौटुंबिक वादातून भलतंच घडलं: दोन्ही ठिकाणी पत्नीची हत्या, परिसरात खळबळ












