Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

श्रीगणेशा आरोग्याचा’ उपक्रमातून संपूर्ण राज्यात नागरिकांची आरोग्य तपासणी ; मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी कक्षाचा पुढाकार

najarkaid by najarkaid
August 28, 2025
in Uncategorized
0
श्रीगणेशा आरोग्याचा’ उपक्रमातून संपूर्ण राज्यात नागरिकांची आरोग्य तपासणी ; मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी कक्षाचा पुढाकार
ADVERTISEMENT

Spread the love

मुंबई, दि.२८ : गणेशोत्सवाच्या मंगलमय वातावरणात नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेण्याच्या दृष्टीने मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्षाने महत्त्वपूर्ण उपक्रम हाती घेतला आहे. मुख्यमंत्री श्री.देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून संपूर्ण महाराष्ट्रातील ३६ जिल्ह्यांमध्ये ‘श्रीगणेशा आरोग्याचा’ या विशेष मोहिमेअंतर्गत मोफत आरोग्य तपासणी शिबिरे आयोजित केली जात आहेत.

या उपक्रमात मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्ष, महात्मा फुले जन आरोग्य योजना, शासकीय वैद्यकीय महाविद्यालये, जिल्हा रुग्णालये, तसेच धर्मादाय रुग्णालयांशी संलग्न तज्ज्ञ डॉक्टर यांचा संयुक्त सहभाग राहणार आहे. याशिवाय मोठ्या संख्येने गणेश मंडळे या उपक्रमात सक्रिय सहभागी झाले आहेत. मंडपांमध्ये किंवा जवळपास उभारण्यात येणाऱ्या शिबिरांमध्ये गणेशभक्त आणि स्थानिक नागरिक यांची मोफत आरोग्य तपासणी केली जात आहे.

नागरिकांच्या आरोग्याबाबत सातत्यपूर्ण जागरूकता

शिबिरांच्या माध्यमातून नागरिकांना केंद्र व राज्य शासनाच्या आरोग्य योजनांची माहिती दिली जाणार असून, तपासणी दरम्यान आजार आढळणाऱ्या रुग्णांना पुढील उपचार संबंधित योजनांतर्गत मोफत उपलब्ध करून दिले जात आहे. विशेष म्हणजे, या उपक्रमाचा उद्देश फक्त तपासणीपुरता मर्यादित नसून नागरिकांच्या आरोग्याबाबत सातत्यपूर्ण जागरूकता निर्माण करणे हा देखील आहे.

प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी स्थापन करण्यात आलेल्या कक्षाच्यावतीने गणेश मंडळांशी संपर्क साधून भव्य आरोग्य शिबिरे राबवली जात आहेत. यात महात्मा फुले जन आरोग्य योजनेत नोंदणीकृत रुग्णालये, स्थानिक वैद्यकीय महाविद्यालये, तसेच धर्मादाय रुग्णालयांचे तज्ज्ञ डॉक्टर आणि त्यांची संपूर्ण टीम सक्रिय सहभागी झाले आहेत.

गणेशमंडळांकडून व्यापक जनजागृती

नागरिकांना या उपक्रमाची माहिती मिळावी यासाठी मागील आठवडाभर गणेश मंडळांकडून बॅनर, पत्रकांच्या माध्यमातून व्यापक जनजागृती सुरू आहे. परिणामी या शिबिरांचा लाभ घेण्यासाठी मोठ्या प्रमाणावर नागरिक आणि भाविक पुढे येत आहेत. आरोग्य तपासणीच्या माध्यमातून उच्च रक्तदाब, मधुमेह, हृदयरोग, कर्करोग आदी आजारांचे लवकर निदान करून वेळेत उपचार मिळण्याची सोय होणार आहे.

गणेशोत्सवासारख्या मोठ्या सणाच्या पार्श्वभूमीवर आरोग्य तपासणी शिबिरांचे आयोजन करणे ही मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांची अभिनव कल्पना आहे. ‘श्री गणेशा आरोग्याचा’ या उपक्रमातून हजारो नागरिकांना त्यांच्या आरोग्याची मोफत तपासणी करण्याची संधी मिळत आहे. तपासणीदरम्यान आजार आढळलेल्या रुग्णांना पुढील मोफत उपचारही दिले जाणार आहेत. हा उपक्रम म्हणजे आरोग्यसेवेतील लोकाभिमुख आणि जनहिताचा उत्तम आदर्श ठरत आहे, असे मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रूग्णालय मदत कक्ष प्रमुख श्री रामेश्वर नाईक यांनी कळविले आहे.

00000

Spread the love
Tags: #sreeganesha #श्रीगणेशा #ganpatbappa
ADVERTISEMENT
Previous Post

5000 Jobs Abroad: 10 वी पाससाठी परदेशात नोकरीची सुवर्णसंधी!

Next Post

बालसंगोपन संस्थांतील मुलांच्या मानसिक आरोग्यासाठी “मासूम” : मुख्यमंत्र्यांच्या संवेदनशील निर्णयामुळे ३,३३७ मुलांना लाभ

Related Posts

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
शिरसोलीत ‘जीवनधारा’ शुद्ध पेयजल योजनेचा शुभारंभ – गांधी रिसर्च फाउंडेशनचा उपक्रम

September 7, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना सुप्रीमो संस्थापक अध्यक्ष स्व. सुखदेसिहंदादा गोगामेडी यांच्या जयंतीनिमित्त जळगावात १२ जुलै रोजी भव्य कार्यक्रम

July 5, 2026
केळी उत्पादक शेतकऱ्यांना वादळी पाऊसाचा मोठा फटका.. पिकाचा पंचनामा करून नुकसान भरपाई द्या

June 5, 2026
Same Income Different Tax India: समान उत्पन्न पण वेगवेगळा टॅक्स – पगारदारांवर दुहेरी भार?

April 17, 2026
Next Post
बालसंगोपन संस्थांतील मुलांच्या मानसिक आरोग्यासाठी “मासूम”  : मुख्यमंत्र्यांच्या संवेदनशील निर्णयामुळे ३,३३७ मुलांना लाभ

बालसंगोपन संस्थांतील मुलांच्या मानसिक आरोग्यासाठी "मासूम" : मुख्यमंत्र्यांच्या संवेदनशील निर्णयामुळे ३,३३७ मुलांना लाभ

ताज्या बातम्या

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा – मंत्री गिरीश महाजन

September 7, 2026
शिरसोलीत ‘जीवनधारा’ शुद्ध पेयजल योजनेचा शुभारंभ – गांधी रिसर्च फाउंडेशनचा उपक्रम

शिरसोलीत ‘जीवनधारा’ शुद्ध पेयजल योजनेचा शुभारंभ – गांधी रिसर्च फाउंडेशनचा उपक्रम

September 7, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us