धुळे : धुळे-मुंबई-आग्रा महामार्गावर शिरपूर तालुक्यातील पळासनेर गावाजवळ भीषण अपघात झाला आहे. ब्रेक फेल झाल्याने भरधाव कंटेनर हॉटेलमध्ये शिरल्याने हा अपघात झाला असून यात ५ जणांचा जागीच मृत्यू झाला आहे, तर मृतांची संख्या वाढण्याची भीती वर्तवण्यात येत आहे. या अपघातात १५ ते २० जण जखमी झाले आहेत.
हे पण वाचा..
राज्यात आजपासून पुढील ४ दिवस कोसळधार! जळगावकरांची प्रतीक्षा संपणार का?
खरी राष्ट्रवादी कोणाची? कोणाला आहेत अधिकार घेण्याचे निर्णय?
मोठी बातमी! ..म्हणून अमोल कोल्हे खासदारकीचा राजीनामा देणार
आग्राकडून मुंबईच्या दिशेने येणाऱ्या १४ चाकी कंटेनरचे ब्रेक निकामी झाल्याने या कंटनेरने सुरवातीला समोर चालणाऱ्या दोन वाहनांना उडविले. त्यानंतर रस्त्यालगत असलेल्या हॅाटेलमध्ये हा कंटेनर घुसून बाहेर पडला.
या भीषण अपघातात ५ ठार झाल्याची प्राथमिक माहिती आहे. मृतांचा आकडा अजून वाढू शकतो. दरम्यान अपघाताचे वृत्त समजताच घटनास्थळी मोठ्या प्रमाणात गर्दी झालेली आहे.. तसेच शिरपूर पोलिस घटनास्थळी दाखल झालेले आहे.
















