मुंबई । अजित पवार यांनी केलेल्या बंडखोरीमुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठी फूट पडली असून यात पक्षात पडझड सुरु झाल्याचे पाहायला मिळतेय. अशातच राष्ट्रवादीचे शिरूरमधील खासदार अमोल कोल्हे खासदारकीचा राजीनामा देणार आहेत.
अमोल कोल्हे आजच शरद पवार यांच्याकडे त्यांचा राजीनामा सोपविणार आहेत. रविवारपासून राष्ट्रवादीत नाट्यमय घटना घडत आहेत. अजित पवार यांच्या शपथविधी वेळी कोल्हे हे उपस्थित होते. पण त्यांनी आता खादारकीचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतला आहे.
अमोल कोल्हे यांच्या या निर्णयाने राष्ट्रवादीला मोठा धक्का बसला आहे.दरम्यान, मी मतदारांचा विश्वास तोडण्यासाठी राजकारणात आलेलो नाही. गेल्या चार वर्षांपासून मी शिरूर लोकसभा मतदारसंघाचे प्रतिनिधितत्व करीत असून केंद्रात या मतदारसंघातील प्रश्नांबाबत अनेकदा प्रश्न उपस्थित केले आहेत. केंद्राच्या अनेक धोरणांवर मी विरोधी भूमिका घेतली आहे. मात्र आता अशी राजकीय परिस्थिती असताना मी कसा बदलू शकतो. असा प्रश्न मला सतावतो आहे. असेही कोल्हे म्हणाले.

