भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) ने ग्राहकांसाठी मोठा दिलासा देणारा निर्णय घेतला आहे. आता चेक क्लिअर होण्यासाठी दिवसोनदिवस वाट पाहावी लागणार नाही. कारण ४ ऑक्टोबर २०२५ पासून चेक काही तासांतच क्लिअर होणार आहेत. आरबीआयने यासाठी Continuous Clearing & Settlement on Realisation ही नवी पद्धत लागू करण्याची घोषणा केली आहे.

दोन टप्प्यांत अंमलबजावणी
पहिला टप्पा – ४ ऑक्टोबर २०२५ ते २ जानेवारी २०२६
या काळात चेकवर अंतिम कन्फर्मेशन देण्याची मर्यादा संध्याकाळी ७ वाजेपर्यंत असेल. वेळेत कन्फर्मेशन न दिल्यास चेक मान्य (approved) समजला जाईल.
दुसरा टप्पा – ३ जानेवारी २०२६ पासून
या टप्प्यात चेकवर कन्फर्मेशन देण्यासाठी केवळ ३ तासांची मर्यादा असेल. उदाहरणार्थ, सकाळी १० ते ११ दरम्यान मिळालेला चेक दुपारी २ वाजेपर्यंत कन्फर्म करणे बंधनकारक राहील.
प्रक्रिया कशी होईल?
सकाळी १०.०० ते दुपारी ४.०० वाजेपर्यंत चेक सादर केले जातील.
बँका चेक स्कॅन करून त्वरित क्लिअरिंग हाऊसला पाठवतील.
क्लिअरिंग हाऊसकडून ड्रॉई बँकेला (ज्या बँकेवर चेक आहे) चेक इमेजेस सतत पाठवल्या जातील.
ड्रॉई बँक लगेचच positive confirmation (मान्य) किंवा negative confirmation (नकार) पाठवेल.
कन्फर्मेशन सत्र सकाळी १०.०० ते संध्याकाळी ७.०० वाजेपर्यंत चालेल.
ग्राहकांसाठी फायदे
चेक क्लिअरिंगचा कालावधी मोठ्या प्रमाणात कमी होईल.
रिअल टाइममध्ये प्रक्रिया होणार असल्याने आर्थिक व्यवहार वेगाने पूर्ण होतील.
बँकिंग सेवेत पारदर्शकता आणि कार्यक्षमता वाढेल.
त्यामुळे ४ ऑक्टोबरपासून तुमचे चेक काही तासांतच क्लिअर होणार आहेत. हा बदल ग्राहकांसाठी अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे.
सरकारी नोकरी कुठे? वाचा –
केंद्रीय गुप्तचर विभागात 10वी पाससाठी 4987 जागांची मोठी संधी!
रेल्वे भरती सुरू – 3115 जागा, कोणतीही परीक्षा नाही!
महाराष्ट्रात 1700 नव्या तलाठी पदांची भरती ; महत्त्वाची माहिती जाणून घ्या!
UPSC EPFO भरती 2025 : EO/AO आणि APFC 230 पदांसाठी संधी! थेट निवड पद्धतीने होणार भरती..
सुरक्षा सहाय्यक ५ हजार पदांची भरती जाहीर : १० वी पास असणाऱ्यांसाठी मोठी संधी
Teacher Recruitment 2025 : 12 हजार शिक्षक भरतीची मोठी संधी!
महाराष्ट्र जलसंपदा विभागात 1200+ पदांची मेगाभरती!
10वी, 12वी, ITI, डिप्लोमा, पदवीधर सर्वांना संधी