Raksha Bandhan for Soldiers : दापोलीतील ‘युवा प्रेरणा कट्टा’ या संघटनेने सीमेवर कार्यरत जवानांसाठी राख्या पाठवून देशप्रेमाची अनोखी भावना व्यक्त केली.
हे पण वाचा – CISF Recruitment 2025 : केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात ७०,००० पदांची भरती जाहीर, लागा तयारीला!
दापोली, रत्नागिरी –दापोलीतील कै. कृष्णामामा महाजन स्मृती प्रतिष्ठानच्या ‘युवा प्रेरणा कट्टा’ या टीमने दरवर्षीप्रमाणे यंदाही “एक राखी जवानांसाठी – देशाच्या रक्षकांसाठी” हा देशभक्तीचा उपक्रम राबवला. यंदाचा उपक्रम विशेष ठरला कारण तो Raksha Bandhan for Soldiers या भावनेशी जोडलेला होता. विशेषतः ऑपरेशन सिंदूरच्या पार्श्वभूमीवर भारतीय जवानांविषयी आदर व्यक्त करणे, हे प्रमुख उद्दिष्ट ठरले.

सीमेवरील जवानांसाठी भावनिक स्नेहगांठ
ज्यांनी पहलगाम हल्ल्याचा बदला घेत पाकिस्तानातील दहशतवाद्यांना धडा शिकवला, त्या वीर जवानांना स्नेहाचा आदर दाखवण्यासाठी दापोलीतील नागरिकांनी, विद्यार्थिनींनी आणि महिलांनी Raksha Bandhan for Soldiers च्या माध्यमातून राख्या पाठवल्या.
शाळा-महाविद्यालयांचा उत्स्फूर्त सहभाग
दापोलीतील विविध शाळा, महाविद्यालये व सामान्य महिला नागरिकांनी हाताने राख्या तयार करून उपक्रमात सहभाग नोंदवला. या राख्या केवळ धागा नव्हे, तर भावना, आदर, आणि एक सशक्त देशप्रेमाचा प्रतीक बनल्या.
प्रेरणादायी युवा कार्य
या उपक्रमासाठी प्रमोद पांगारकर, नचिकेत बेहरे, संदीप गरंडे, श्रीप्रीती वैद्य, साक्षी करमरकर, सुमेध करमरकर, रोहन भावे व इतर कार्यकर्त्यांनी संपूर्ण टीमसोबत मनापासून परिश्रम घेतले.

उपक्रमाची सुरुवात आणि विस्तार
मिहीर महाजन यांनी सांगितले की, २०२२ मध्ये भारताच्या स्वातंत्र्याच्या ७५व्या अमृत महोत्सवाच्या वर्षी हा उपक्रम सुरू करण्यात आला. तेव्हापासून दरवर्षी Raksha Bandhan for Soldiers ही संकल्पना रूजत आहे. पहिल्याच वर्षी ७५ हून अधिक शाळा व महाविद्यालयांतून राख्या गोळा करून त्या जवानांपर्यंत पोहचवण्यात आल्या होत्या.
यंदा राख्या कुठे पाठवल्या?
•पठाणकोट (पंजाब) – भारतीय वायू सेनेच्या हवाई तळावरील जवानांना
•मुंबई – सशस्त्र सेना सामान चिकित्सा डेपो कार्यालयात
या राख्या म्हणजे केवळ धागा नव्हे, तर संरक्षणासाठी प्रार्थना, स्नेह, आणि देशासाठीचा ऋण व्यक्त करणारी भावना.”ही राखी आहे त्यांच्या संरक्षणासाठी, जे आपलं रक्षण करतात!”
सरकारी नोकरी कुठे? वाचा –
केंद्रीय गुप्तचर विभागात 10वी पाससाठी 4987 जागांची मोठी संधी!
रेल्वे भरती सुरू – 3115 जागा, कोणतीही परीक्षा नाही!
महाराष्ट्रात 1700 नव्या तलाठी पदांची भरती ; महत्त्वाची माहिती जाणून घ्या!
UPSC EPFO भरती 2025 : EO/AO आणि APFC 230 पदांसाठी संधी! थेट निवड पद्धतीने होणार भरती..
सुरक्षा सहाय्यक ५ हजार पदांची भरती जाहीर : १० वी पास असणाऱ्यांसाठी मोठी संधी
Teacher Recruitment 2025 : 12 हजार शिक्षक भरतीची मोठी संधी!
महाराष्ट्र जलसंपदा विभागात 1200+ पदांची मेगाभरती!
10वी, 12वी, ITI, डिप्लोमा, पदवीधर सर्वांना संधी