Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

राज्यातील ऑक्सिजन आणि रेमडेसिविर पुरवठा बाबत अन्न व औषधमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी दिली माहिती

najarkaid live by najarkaid live
May 6, 2021
in राज्य
0
राज्यातील ऑक्सिजन आणि रेमडेसिविर पुरवठा बाबत अन्न व औषधमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी दिली माहिती
ADVERTISEMENT

Spread the love

मुंबई, दि. ६ : राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये ऑक्सिजनचा पुरवठा समप्रमाणात होण्याच्या दृष्टीने त्याचप्रमाणे रेमडेसिविरच्या उपलब्धतेबाबात अन्न व औषध प्रशासन विभागाच्या माध्यमातून योग्य नियोजन करण्यात येत असल्याची माहिती अन्न व औषधमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी दिली आहे.

मेडिकल ऑक्सिजनबाबत

राज्यात कोविड रूग्ण संख्या झपाट्याने वाढलेली आहे. या रूग्णांवर उपचारासाठी मेडिकल ऑक्सिजन हे अत्यंत महत्त्वाचे आहे. त्यामुळे राज्यात उत्पादित होणारे आणि इतर राज्यातून प्राप्त होणारे ऑक्सिजन राज्यातील सर्व जिल्ह्यांना सुरळीतपणे व त्या-त्या जिल्ह्याच्या आवश्यकतेनुसार प्राप्त होणे अत्यंत गरजेचे आहे. यासाठी अन्न व औषध प्रशासनाद्वारे राज्यातील लिक्वीड मेडिकल ऑक्सिजन उत्पादकांना त्यांनी दररोज कोणत्या जिल्ह्यात किती ऑक्सिजन पुरवावा यासाठी पुरवठाबाबतचे विवरणपत्र तयार करून ते उत्पादकांना देण्यात येते. दिनांक 6 मे 2021 साठी प्रशासनाने उत्पादकांना 1713 टन ऑक्सिजन पुरवण्यासाठी पुरवठा विवरणपत्र जारी केले आहे .

दिनांक 4 मे, 2021 रोजी राज्यात 1720 टन ऑक्सिजनचा पुरवठा राज्यातील वेगवेगळ्या जिल्ह्यांना करण्यात आला. यामध्ये परराज्यातून प्राप्त झालेल्या 257.5 टन ऑक्सिजनचा अंतर्भाव आहे. गुजरात येथून 116.5 टन, भिलाई छत्तीसगड येथून 60 टन आणि बेल्लारी कर्नाटका येथून 81 टन लिक्विड मेडिकल ऑक्सिजन राज्यासाठी प्राप्त झाले आहे.

दिनांक 5 मे 2021 साठी उत्पादक 1661 टन ऑक्सिजन वितरित करणार आहेत. असे उत्पादकांकडून प्राप्त प्रस्तावित वितरण पत्रावरून दिसून आले आहे. अन्न व औषध प्रशासनाव्दारे व शासनाद्वारा या कामी नेमलेल्या नोडल ऑफिसर्स द्वारा राज्यातील सर्व जिल्ह्यांना वेळेत ऑक्सिजन पुरवठा होण्यासाठी अहोरात्र प्रयत्न केले जात आहेत.

रेमडेसिविरबाबत

रेमडेसिविर इंजेक्शनचे उत्पादन मे. सिप्ला, हेटेरो, झायडस, मायलन, सन फार्मा, डॉ.रेड्डीज व जुबिलंट या औषध उत्पादक कंपन्यामार्फत करण्यात येते. राज्यात मे. सिप्ला लि. या उत्पादकाचे उत्पादन होते. वरील उत्पादकांच्या प्रामुख्याने भिवंडी, पुणे व नागपूर येथील डेपोमधून या औषधाचा पुरवठा राज्यभर करण्यात येतो.

राज्य शासनाद्वारे राज्यासाठी रेमडेसिविर इंजेक्शनचा वाढीव कोटा मिळावा यासाठी नियमितपणे पाठपुरावा करण्यात येत होता. केंद्र शासनाच्या आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाने त्यांचे पत्र दिनांक-01 मे, 2021 अन्वये महाराष्ट्र राज्यासाठी वरील सात उत्पादक मिळून एकूण 8,09,500 रेमडेसिविरचा साठा दिनांक- 21/04/2021 ते 09/05/2021 या कालावधीत मंजूर केलेला आहे.

दि. 21/04/2021 ते 04/05/2021 अखेर पर्यन्त 474791 इतका साठा खाजगी व शासकीय रूग्णालयांना वितरीत करण्यात आला आहे. दिनांक- 04/05/2021 रोजी राज्यात 42024 इतका साठा वितरीत झाला आहे. दिनांक 05.05.2021 रोजीच्या वितरणासाठी अंदाजे 50,380 इतका साठा उत्पादकाकडून प्राप्त झाला आहे. त्यातील काही साठा आज व उर्वरित साठा दि. 06/05/2021 रोजी प्रत्यक्ष वितरित होणार आहे.

Spread the love
Tags: #ऑक्सिजन#रिमेडिसिवीर #corona maharashtra
ADVERTISEMENT
Previous Post

अभिनेत्री अभिलाषा पाटील यांचं कोरोना मुळं निधन

Next Post

‘या’ चार वर्षीय मुलीस कोणी ओळखत असेल तर संपर्क करण्याचे आवाहन

Related Posts

भाजप–शिवसेनेच्या बिनविरोध जागांवर अजितदादांना संशय; महायुतीत निवडणुकीआधीच ठिणगी, आरोप–प्रत्यारोपांचा भडका

भाजप–शिवसेनेच्या बिनविरोध जागांवर अजितदादांना संशय; महायुतीत निवडणुकीआधीच ठिणगी, आरोप–प्रत्यारोपांचा भडका

January 3, 2026
ब्रेकिंग न्यूज : बिनविरोध नगरसेवकांच्या विजयावर टांगती तलवार! बिनविरोध निवड रद्द होणार का?

ब्रेकिंग न्यूज : बिनविरोध नगरसेवकांच्या विजयावर टांगती तलवार! बिनविरोध निवड रद्द होणार का?

January 3, 2026
जळगाव महापालिकेत मंत्री गुलाबराव पाटिलांचे ‘तीन’ उमेदवार बिनविरोध निवड

जळगाव महापालिकेत मंत्री गुलाबराव पाटिलांचे ‘तीन’ उमेदवार बिनविरोध निवड

January 1, 2026
मंत्री गुलाबराव पाटील शिंदेसेनेचे स्टार प्रचारक जाहीर; महापालिका निवडणुकीसाठी प्रचारफळी सज्ज

मंत्री गुलाबराव पाटील शिंदेसेनेचे स्टार प्रचारक जाहीर; महापालिका निवडणुकीसाठी प्रचारफळी सज्ज

December 25, 2025
ब्रेकिंग : शॉक लागून ५ जणांचा दुर्दैवी मृत्यू !

ब्रेकिंग : शॉक लागून ५ जणांचा दुर्दैवी मृत्यू !

August 21, 2025
मोठी बातमी ; TAIT परीक्षेचा निकाल जाहीर : ६३२० उमेदवारांचा निकाल राखीव

मोठी बातमी ; TAIT परीक्षेचा निकाल जाहीर : ६३२० उमेदवारांचा निकाल राखीव

August 20, 2025
Next Post
‘या’ चार वर्षीय मुलीस कोणी ओळखत असेल तर संपर्क करण्याचे आवाहन

'या' चार वर्षीय मुलीस कोणी ओळखत असेल तर संपर्क करण्याचे आवाहन

ताज्या बातम्या

माजी महापौर प्रभाग क्र ११ मधून आघाडीवर

महायुतीचे दोनही माजी महापौर आघाडीवर

January 16, 2026
माजी महापौर प्रभाग क्र ११ मधून आघाडीवर

माजी महापौर प्रभाग क्र ११ मधून आघाडीवर

January 16, 2026
प्रभाग क्र. १२ च्या विकासाला गती हीच माझी हमी” – गायत्री इंद्रजित राणे

प्रभाग क्र. १२ च्या विकासाला गती हीच माझी हमी” – गायत्री इंद्रजित राणे

January 13, 2026
मुंबईची सुरक्षा आणि भाजपचा ‘झिरो टॉलरन्स’ पॅटर्न : भयमुक्त महानगराचा नवा अध्याय

मुंबईची सुरक्षा आणि भाजपचा ‘झिरो टॉलरन्स’ पॅटर्न : भयमुक्त महानगराचा नवा अध्याय

January 13, 2026
मुंबईचा ‘डिजिटल’ रणसंग्राम:’मार्व्हल’स्टाईल कॅम्पेनने भाजपची आघाडी;विरोधकांकडे मतदारांची फिरली पाठ?

मुंबईचा ‘डिजिटल’ रणसंग्राम:’मार्व्हल’स्टाईल कॅम्पेनने भाजपची आघाडी;विरोधकांकडे मतदारांची फिरली पाठ?

January 12, 2026
मुंबईचा महाकायापालट: पायाभूत सुविधांचे नवे युग आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ‘मास्टर प्लॅन

मुंबईचा महाकायापालट: पायाभूत सुविधांचे नवे युग आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ‘मास्टर प्लॅन

January 11, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us