Mazi Ladki Bahin Yojana: राज्यातील २६ लाख अपात्र ठरलेल्या महिलांची नव्याने पडताळणी; पात्र महिलांना पुन्हा योजनेचा लाभ, हप्ते सुरू होणार.
महिला सक्षमीकरणासाठी राबवण्यात आलेल्या ‘माझी लाडकी बहीण’ योजनेतून वंचित राहिलेल्या लाखो महिलांसाठी राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी जाहीर केलेल्या माहितीनुसार, योजनेत अपात्र ठरवण्यात आलेल्या सुमारे २६ लाख महिलांची नव्याने पडताळणी करण्यात येणार असून पात्र महिलांना पुन्हा हप्ते सुरू होणार आहेत.

अपात्र ठरलेल्या २६ लाख महिलांसाठी नव्याने पडताळणी
महिला व बालविकास विभागाकडून जिल्हा प्रशासनाला अपात्र ठरवलेल्या महिलांची यादी पाठवण्यात आली आहे. या यादीतील महिलांची प्रत्यक्ष तपासणी (Physical Verification) सुरू करण्यात आली आहे. यामध्ये महिलांची खरी पात्रता तपासली जात आहे.
मंत्री अदिती तटकरे यांची सोशल मीडिया पोस्ट
मंत्री अदिती तटकरे यांनी त्यांच्या सोशल मीडियावर लिहिले आहे की,
“मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेंतर्गत लाभ घेत असलेल्या लाभार्थींपैकी सुमारे 26 लक्ष लाभार्थी योजनेच्या निकषानुसार पात्र दिसून येत नसल्याबाबत माहिती व तंत्रज्ञान विभागाने प्राथमिक माहिती उपलब्ध करून दिली होती. सदर सुमारे 26 लक्ष लाभार्थी राज्यातील सर्व जिल्ह्यांमधील आहेत.
त्यानुसार महिला व बालविकास विभागाने सदर लाभार्थ्यांची प्राथमिक माहिती संबंधित जिल्हा यंत्रणेला छाननीसाठी (Physical Verification) उपलब्ध करून दिलेली आहे. त्यानुसार हे लाभार्थी योजनेच्या निकषानुसार पात्र ठरतात किंवा नाही याबाबतची सुक्ष्म छाननी क्षेत्रीय स्तरावर सुरू आहे. छाननीअंती या लाभार्थींची पात्रता/अपात्रता स्पष्ट होणार आहे.
छाननीअंती जे लाभार्थी अपात्र ठरतील त्यांच्याबाबत माननीय मुख्यमंत्री श्री. देवेंद्रजी फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री श्री. अजितदादा पवार यांच्या मार्गदर्शनानुसार योग्य कारवाई करण्यात येईल, तसेच पात्र ठरणाऱ्या लाभार्थ्यांचा लाभ यापुढेही पूर्ववत सुरू राहील.”
मुख्यमंत्र्यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई
या तपासणीनंतर ज्या महिला खरोखरच अपात्र ठरतील त्यांच्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली आवश्यक ती कारवाई होणार आहे. मात्र ज्या महिला पात्र आढळतील, त्यांना योजनेचा लाभ पुन्हा सुरू होईल.
लाभार्थ्यांना नवा दिलासा
या निर्णयामुळे आधी अपात्र ठरलेल्या लाभार्थ्यांना दिलासा मिळाला आहे. योजनेचा उद्देश खऱ्या अर्थाने पात्र महिलांपर्यंत पोहोचावा यासाठी ही प्रक्रिया महत्त्वाची ठरणार आहे.
निष्कर्ष
‘माझी लाडकी बहीण’ योजनेतून महिलांच्या आर्थिक स्वावलंबनाला बळकटी मिळावी हा सरकारचा उद्देश असून, अपात्र ठरलेल्या लाभार्थ्यांना पुन्हा एकदा लाभाची संधी देण्याचा निर्णय महिलांसाठी नक्कीच सुखद आहे.
सरकारी नोकरी कुठे? वाचा –
बँक ऑफ महाराष्ट्र : 500 पदांकारिता भरती सुरू, पगार ₹93,960 इतका
नवी मुंबई महानगरपालिका भरती २०२५
LIC Recruitment 2025: एलआयसीमध्ये ८४१ पदांसाठी भरती सुरू, अर्ज प्रक्रिया जाणून घ्या
रेल्वे भरती सुरू – 3115 जागा, कोणतीही परीक्षा नाही!
महाराष्ट्रात 1700 नव्या तलाठी पदांची भरती ; महत्त्वाची माहिती जाणून घ्या!
UPSC EPFO भरती 2025 : EO/AO आणि APFC 230 पदांसाठी संधी! थेट निवड पद्धतीने होणार भरती..
सुरक्षा सहाय्यक ५ हजार पदांची भरती जाहीर : १० वी पास असणाऱ्यांसाठी मोठी संधी
Teacher Recruitment 2025 : 12 हजार शिक्षक भरतीची मोठी संधी!
महाराष्ट्र जलसंपदा विभागात 1200+ पदांची मेगाभरती!
10वी, 12वी, ITI, डिप्लोमा, पदवीधर सर्वांना संधी
Latest news 👇🏻
CBSE New Rule :CBSE चा मोठा निर्णय! 8वी ते 12वीसाठी नवीन नियम लागू
केंद्रीय गुप्तचर विभागात 10वी पाससाठी 4987 जागांची मोठी संधी!
₹5 लाख ते ₹1 कोटी कव्हरेज – तुमच्यासाठी योग्य हेल्थ इन्शुरन्स कोणता?
वेलदोडे खाण्याचे चमत्कारी फायदे
मतदार यादीत तुमचं नाव आहे का? 2025 साठी नाव कसं शोधाल ते येथे वाचा
80 वर्ष निरोगी आयुष्य हवंय?आयुर्वेदानुसार रोज पाळा ‘हे’ १० नियम
Meesho व्यवसाय करून कमवा लाखो रुपये | घरबसल्या कमाईची संधी, कुठलीही गुंतवणूक नाही!