Manoj Jarange Patil : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आझाद मैदानावर आमरण उपोषण, मनोज जरांगे पाटील यांची ठाम घोषणा – “गोळ्या घातल्या तरी मागे हटणार नाही.”
मुंबई – मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी मुंबईतील आझाद मैदानावर बेमुदत आमरण उपोषण सुरू सुरु झाले असून या उपोषणाला आज सायंकाळी ६ वाजेपर्यंत पोलीस विभागाने परवानगी दिली आहे मात्र “गोळ्या घातल्या तरी एक इंचही मागे सरकणार नाही,” असा ठाम निर्धार व्यक्त केला आहे. जरांगे यांनी जाहीर करताच मराठा समाजामध्ये उत्साहाची लाट उसळली आहे.

आझाद मैदान हाऊसफुल
आज (शुक्रवार) सकाळपासूनच महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून हजारो मराठा बांधव आझाद मैदानावर दाखल झाले आहेत. प्रशासनाने फक्त 5 हजार लोकांना परवानगी दिली असली तरी मैदान पूर्णपणे हाऊसफुल झालं आहे. गर्दीचा हा महासागर पाहता, आंदोलनाची पुढील दिशा काय असेल याकडे राज्याचे लक्ष लागले आहे.
मनोज जरांगे पाटील यांची ठाम भूमिका
जरांगे यांनी स्पष्ट केले की, “सरकारने आमच्या मागण्या मान्य केल्या नाहीत, तर आम्ही मुंबई सोडणार नाही. कितीही दडपशाही झाली तरी मराठा आरक्षणासाठी आमची लढाई सुरूच राहील.”
मनोज जरांगे पाटील यांच्या मुख्य मागण्या
1. मराठा-कुणबी एकजूट
मराठा आणि कुणबी हे एकच असल्याचे सरकारने मान्य करून तात्काळ अंमलबजावणी करावी.
2. हैदराबाद गॅझेटियरची अंमलबजावणी
सरकारकडून 13 महिन्यांपासून केवळ अभ्यास सुरू आहे. सातारा आणि बाँबे गॅझेटियर लागू करावेत, अशी ठाम मागणी.
3. ‘सगे सोयरे’ अध्यादेशाची अंमलबजावणी
कुणबी नोंद सापडलेल्या व्यक्तींच्या नातेवाईकांना (सगे सोयरे) तसाच लाभ द्यावा.
4. गुन्हे मागे घेणे
आंदोलनादरम्यान झालेल्या खटल्यांची माघार घेण्याचे आश्वासन दिले होते; मात्र ते अद्याप पूर्ण झालेले नाही. आंदोलनात बलिदान दिलेल्या कुटुंबांना न्याय द्यावा.
5. कायदेशीर आरक्षण
मराठा समाजाला कायद्याच्या चौकटीत बसणारे, स्थिर आणि टिकाऊ आरक्षण द्यावे.
पुढील दिशा
मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा स्पष्ट केले की, “जोवर आमच्या मागण्या मान्य होत नाहीत तोवर आमचा लढा सुरूच राहील.” आता राज्य सरकारची पुढील भूमिका काय असेल, हे पाहण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्राची नजर या आंदोलनावर आहे.
सरकारी नोकरी कुठे? वाचा –
BSF सीमा सुरक्षा दलात 1012 हेड कॉन्स्टेबल पदांची भरती : 12 पास लगेच अर्ज करा !
5000 Jobs Abroad: 10 वी पाससाठी परदेशात नोकरीची सुवर्णसंधी!
बँक ऑफ महाराष्ट्र : 500 पदांकारिता भरती सुरू, पगार ₹93,960 इतका
नवी मुंबई महानगरपालिका भरती २०२५
LIC Recruitment 2025: एलआयसीमध्ये ८४१ पदांसाठी भरती सुरू, अर्ज प्रक्रिया जाणून घ्या
रेल्वे भरती सुरू – 3115 जागा, कोणतीही परीक्षा नाही!
महाराष्ट्रात 1700 नव्या तलाठी पदांची भरती ; महत्त्वाची माहिती जाणून घ्या!
UPSC EPFO भरती 2025 : EO/AO आणि APFC 230 पदांसाठी संधी! थेट निवड पद्धतीने होणार भरती..
सुरक्षा सहाय्यक ५ हजार पदांची भरती जाहीर : १० वी पास असणाऱ्यांसाठी मोठी संधी
Teacher Recruitment 2025 : 12 हजार शिक्षक भरतीची मोठी संधी!
महाराष्ट्र जलसंपदा विभागात 1200+ पदांची मेगाभरती!
10वी, 12वी, ITI, डिप्लोमा, पदवीधर सर्वांना संधी
धक्कादायक बातमी: गर्लफ्रेंडचा अंघोळ करतानाचा व्हिडीओ बनवला ;गर्लफ्रेंडनं बॉयफ्रेंडचा प्रायव्हेट पार्ट कापला ; प्रेमविवादातून थरार!
शॉकिंग न्यूज : चुलत भावाचे बहिणीवर जळलं प्रेम, तीने नकार दिल्याने निर्घृण हत्या करून घरातचं पुरलं!
हे पण वाचा : अत्याचारातून अल्पवयीन मुलगी गर्भवती ; जळगाव जिल्ह्यातील धक्कादायक घटना
शॉकिंग न्यूज : अल्पवयीन मुलीवर जन्मदात्या बापानेच केला अत्याचार ; महाराष्ट्र हादरला!
हे पण वाचा –शिर्डीत वेश्या व्यवसाय प्रकरणी चार हॉटेल्स वर्षभरासाठी सील
Crime News: तरुणीला ६ महिने बंदिस्त ठेवून आळीपाळीने लैंगिक अत्याचार ; धक्कादायक घटना