महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत राज्याच्या विकासाला गती देणारे १४ महत्वाचे निर्णय घेण्यात आले. यात मेट्रो प्रकल्पांना हिरवा कंदील, सामाजिक न्याय योजनांतील वाढीव लाभ, ऊर्जाक्षेत्रातील धोरणे तसेच न्यायिक आणि वाहतूक प्रकल्पांना आर्थिक मान्यता यांचा समावेश आहे.
आजच्या महाराष्ट्र मंत्रिमंडळ बैठकीत झाले हे मोठे निर्णय!
1. विधि व न्याय विभाग
मुंबईतील वांद्रे (पूर्व) येथे उच्च न्यायालयाचे नवीन संकुल उभारणीस मंजुरी.
प्रकल्पासाठी तब्बल ३,७५० कोटी रुपये निधीची तरतूद.
2. नगर विकास विभाग
नागपूर शहराभोवती बाह्य वळण रस्ता (Outer Ring Road) व त्यालगत ४ वाहतूक बेट (Truck & Bus Terminal) उभारणीस मान्यता.
3. नगर विकास विभाग
“नविन नागपूर” अंतर्गत International Business and Finance Centre (IBFC) उभारणीस मान्यता.
एकूण ६९२.०६ हे.आर. जमीन संपादित करून प्रकल्प राबविणार.
4. नगर विकास विभाग
ठाणे ते नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ दरम्यान उन्नत मार्ग (Elevated Corridor) प्रकल्पाला मंजुरी.
PPP पद्धतीवर BOT तत्त्वानुसार हा प्रकल्प राबविणार.
5. नगर विकास विभाग
पुणे ते लोणावळा लोकलसाठी तिसरी व चौथी मार्गिका उभारणी.
MUTP च्या धर्तीवर राज्य सरकार आर्थिक भार उचलणार.
6. नगर विकास विभाग
मुंबई नागरी परिवहन प्रकल्प (MUTP-3B) मध्ये राज्य सरकारचा ५०% आर्थिक सहभाग निश्चित.
7. नगर विकास विभाग
मुंबई नागरी परिवहन प्रकल्प (MUTP-3 व 3A) मध्ये लोकल खरेदीसाठी मंजुरी.बाह्य कर्ज न घेता रेल्वे व राज्य शासनाच्या निधीतून प्रकल्प.
8. नगर विकास विभाग
पुणे मेट्रो मार्गावरील बालाजीनगर आणि बिबवेवाडी या दोन नवीन स्थानकांना मंजुरी.कात्रज स्थानकाचे स्थलांतर दक्षिणेकडे ४२१ मीटर.प्रकल्पासाठी ६८३ कोटी ११ लाख रुपये तरतूद.
9) नगर विकास विभाग
ठाणे वर्तुळाकार मेट्रो, पुण्यातील मेट्रो मार्गिका-२, मार्गिका-४ तसेच नागपूर मेट्रो टप्पा-२ साठी कर्जांना मंजुरी.
10. नगर विकास विभाग
मुंबई मेट्रो मार्गिका-११ (आणिक डेपो-वडाळा ते गेटवे ऑफ इंडिया) प्रकल्पास हिरवा कंदील.
प्रकल्प खर्च २३,४८७ कोटी ५१ लाख रुपये.
11. आदिवासी विकास विभाग
अनुसूचित जमातीतील नववी-दहावी विद्यार्थ्यांसाठी केंद्र सरकारची पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती योजना लागू.
राज्याची सुवर्णमहोत्सवी शिष्यवृत्ती योजना रद्द.
12. कामगार विभाग
महाराष्ट्र दुकाने व आस्थापना अधिनियम, २०१७ मध्ये सुधारणा.कारखाने अधिनियम, १९४८ मध्ये सुधारणा.
13. ऊर्जा विभाग
महानिर्मिती औष्णिक विद्युत निर्मिती केंद्रातील राखेच्या वापराबाबत नवे धोरण निश्चित.
14. सामाजिक न्याय विभाग
संजय गांधी निराधार व श्रावणबाळ योजनेंतर्गत दिव्यांगांना दरमहा १,००० रुपयांची वाढ.
लाभार्थ्यांना आता ₹२,५०० मासिक अर्थसहाय्य.
महत्वाचे :- Mutual Fund विक्रीचे नियम: चुकीच्या Exit ने कसा होतो तोटा?
महत्वाचे :- पर्सनल लोन घेतांना योग्य बँक कशी निवडायची? जाणून घ्या महत्वाच्या टिप्स
हे पण वाचा :- Home Loan : गृहकर्ज कसे घ्यावे? गृह कर्जाचे प्रकार,फायदेशीर पर्याय, कागदपत्रे आणि सबसिडी योजना संपूर्ण वाचा
हे पण वाचा :- Mutual Fund vs Bank FD| म्युच्युअल फंड की बँक FD? कुठे गुंतवणूक सुरक्षित आणि फायदेशीर
हे पण वाचा :- टर्म इन्शुरन्स म्हणजे काय? कमी प्रीमियममध्ये मोठं कव्हरेज!