Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या वतीने आयोजित JCL T-20 चा रोमांच

जामनेर सातपुडा हिरोज, जळगाव कोगटा किंग्स, अमळनेर सुहांस जायंट्स विजयी

najarkaid by najarkaid
April 22, 2026
in जळगाव
0
जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या वतीने आयोजित JCL T-20 चा रोमांच
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव दि.21 (प्रतिनिधी):   जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या वतीने आयोजित रतनलाल सी. बाफना ज्वेलर्स प्रायोजित व अलरीक इलेक्ट्रीकल्स सहप्रायोजकत्वाखाली जळगाव क्रिकेट लिग लिग-२०२६, JCL T-20 चा रोमांच शिगेला पोहचला आहे. मंगळवारी झालेल्या पहिल्या दोन सामन्यांत जळगाव कोगटा किंग्स आणि  जामनेर सातपुडा हिरोज हा संघ विजयी झाला. त्यापूर्वी सोमवारी रात्री झालेल्या सामन्यात अमळनेर सुहांस जायंट्स संघाने विजय मिळवला होता. उपांत्यफेरी गाठवण्यासाठी आता जेसीएलच्या सर्व संघामध्ये चुरस निर्माण झाली आहे.

मंगळवारी दुपारी जामनेर सातपुडा हिरोज आणि अमळनेर सुहांस जायंट्स या संघामध्ये लढत झाली. जामनेर सातपुडा हिरोज संघाने नाणेफेक जिंकत गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. संघाचा हा निर्णय गोलदांजांनी यशस्वी ठरवला. अमळनेर संघाचा पहिला फलंदाज केवळ २ धावांवर बाद झाला. त्यानंतर ठराविक क्रमाने फलंदाज बाद होत गेले. त्यामुळे १०२ धावांवर सात फलंदाज तंबूत परतले होते. परंतु शुभम शर्माने एक बाजू लावून धरली होती. त्याने ४७ चेंडूत धुवांधार ६० धावा केल्या. रोहित भोईने १५ चेंडूत ३२ तर यशवंत शिंदे याने १६ चेंडूत २२ धावा करत संघाची धावसंख्या १५० च्या पुढे नेली. अमळनेर संघाचे सर्व फलंदाज १९.५ षटकांत १५२ धावांवर बाद झाले.

विजयासाठी १५३ धावांचे आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या जामनेर संघाची सुरूवात जोरदार झाली. केवळ ५.२ षटकांत एक गडी गमावत ५१ धावा केल्या. सामनावीर ठरलेल्या प्रद्युम महाजन याने अमळनेरच्या गोलंदाजांना फोडून काढले. त्याने ४२ चेंडूत ६९ धावांची धुवांधार खेळी केली. त्यामुळे जामनेरचा विजयाचा पाया पक्का झाला. ललित पाटील १७ धावा केल्या. रवींद्र आणि क्रिषी यांनी नाबाद पार्टनशीप करत संघाला विजय मिळवून दिला. रवीद्र याने २९ चेंडूत ३१ तर क्रिषी याने केवळ १६ चेंडूत ३० धावा केल्या. जामनेरने केवळ १७.४ षटकांत विजयी लक्ष्य गाठत ८ गडी राखून दणदणीत विजय मिळवला. अमळनेरच्या शुभम शर्मा आणि सतीश चतुर्वेदी यांनी एक-एक फलंदाजाला बाद केले.

जळगाव कोगटा किंगचा पुन्हा एक विजय

मंगळवारी पहिला सामना जळगाव कोगटा किंग विरुद्ध रावेर रॉयल्स यांच्यात झाला. या सामन्याची नाणेफेक जेसीएल समिती सदस्य प्रशांत वीरकर यांच्या हस्ते झाली. या सामन्यात रावेर रॉयल्सची सुरुवात निराशाजनक झाली. यश नहर (9), तौसीफ मिर्झा (0) आणि संदेश (9) लवकर बाद झाल्याने संघावर दबाव आला. त्यानंतर मोहम्मद आणि आदित्यही बाद झाल्यामुळे 67 धावांत पाच गडी बाद अशी बिकट अवस्थार रावेर रॉयल्सची  झाली होती. मात्र, अशपाक शेख आणि प्रज्वल राजपूत यांनी डाव सावरला. अशपाकने 36 चेंडूत 45 धावा केल्या. तर प्रज्वलने 11 चेंडूत 17 धावा केल्या. त्यामुळे रावेर रॉयलने 20 षटकांत 143 धावांपर्यंत मजल मारली. जळगाव कोकटा किंग्सकडून राज बेलदार, मनिष चव्हाण आणि सागर भावसार यांनी एक-एक गडी बाद केला. कर्णधार जगदीश झोपे याने प्रभावी गोलंदाजी करत 15 धावा देत 2 बळी घेतले. बिपिन चावरे यांनीही 2 गडी बाद केले. 144 धावांचे आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या जळगाव कोगटा किंग्स संघाने 15.1 षटकांत 3 गडी बाद करत 146 धावा केल्या. ओम भोसले याने 46 चेंडूत 64 धावांची नाबाद खेळी केली. बिपिन चांगरे याने 25 चेंडूत 52 धावा करत संघाचा रनरेट वेगाने वाढवला. तोच सामनावीर ठरला.

अमळनेरचा रावेरवर दणदणीत विजय

अमळनेर सुहांस जायंट्स आणि रावेर रॉयल्स यांच्यात २० एप्रिल रोजी रात्री सामना झाला. या सामन्यात अमळनेर संघाने 20 षटकांत 7 बाद 201 धावांचा डोंगर उभारला. रणजीत निकमने 55, मानव टीब्रेवाला 54 आणि ऋषी यादवने 37 धावांची उपयुक्त खेळी करत संघाला भक्कम सुरुवात दिली.  प्रत्युत्तरात रावेर रॉयल्सचा डाव 20 षटकांत 7 बाद 164 धावांवर थांबला. संदेश सुरवाडेने 47 आणि तुषार चोरडियाने 46 धावांची झुंज दिली. गोलंदाजीत मोहंमद सैफने अचूक मारा करत 2 बळी घेतले आणि विजयात महत्त्वाची भूमिका बजावली. या सामन्यामध्ये सामनावीराचा पुरस्कार रणजीत निकम याला प्रदान करण्यात आला. त्याने 55 धावा करत एक बळी  घेतला.

आजचे सामने (22 एप्रिल)

सकाळी ८.३० वाजता: रावेर रॉयल्स x पाचोरा एसकेटी योद्धाज.

दुपारी ३ वाजता : अमळनेर सुहांस जायंट्स xचाळीसगाव एसपीसीसी चॅलेन्जर्स.

सायंकाळी ७.३० वाजता : जळगाव कोगटा किंग x जामनेर सातपुडा हिरोज.

गुणतालिका

संघ

सामने

विजयी

पराभूत

गुण

जामनेर सातपुडा हिरोज

4

3

1

6

जळगाव कोगटा किंग

4

3

1

6

अमळनेर सुहांस जायंट्स

3

1

2

2

चाळीसगाव एसपीसीसी चॅलेंन्जर्स

2

1

1

2

पाचोरा एसकेटी योद्धाज

2

1

1

2

रावेर रॉयल्स

3

0

3

0

रात्री ८ पर्यंत

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या वतीने आयोजित JCL T-20 चा रोमांच

Next Post

Related Posts

अनंत भोळे यांची रोटरीच्या असिस्टंट गव्हर्नरपदी निवड

November 18, 2026
सत्ता महाजनांची, पण सहकाराच्या पटावर देवकरांची स्वतंत्र चाल!

November 17, 2026
३१ वर्षांच्या आठवणी एका छताखाली; बालपणीचा काळ पुन्हा जिवंत!

November 16, 2026
दुष्काळाच्या सावटातही आपुलकीचा दिवा; पोखरी तांड्यात पालकमंत्री गुलाबराव पाटलांची आगळीवेगळी दिवाळी!

November 8, 2026
भवरलाल अॅण्ड कांताबाई जैन फाऊंडेशनने ३२ फुटांच्या भव्य ‘लामण दिव्या’तून जळगावच्या वैभवात घातली भर!

November 7, 2026
जिल्हा बँकेच्या निवडणुकीत जयवंत भोईटे यांची उमेदवारी; इतर संस्था मतदारसंघातून अर्ज दाखल

October 31, 2026
Next Post
जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या वतीने आयोजित JCL T-20 चा रोमांच

जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या वतीने आयोजित JCL T-20 चा रोमांच

ताज्या बातम्या

अनंत भोळे यांची रोटरीच्या असिस्टंट गव्हर्नरपदी निवड

अनंत भोळे यांची रोटरीच्या असिस्टंट गव्हर्नरपदी निवड

November 18, 2026
सत्ता महाजनांची, पण सहकाराच्या पटावर देवकरांची स्वतंत्र चाल!

सत्ता महाजनांची, पण सहकाराच्या पटावर देवकरांची स्वतंत्र चाल!

November 17, 2026
३१ वर्षांच्या आठवणी एका छताखाली; बालपणीचा काळ पुन्हा जिवंत!

३१ वर्षांच्या आठवणी एका छताखाली; बालपणीचा काळ पुन्हा जिवंत!

November 16, 2026
दुष्काळाच्या सावटातही आपुलकीचा दिवा; पोखरी तांड्यात पालकमंत्री गुलाबराव पाटलांची आगळीवेगळी दिवाळी!

दुष्काळाच्या सावटातही आपुलकीचा दिवा; पोखरी तांड्यात पालकमंत्री गुलाबराव पाटलांची आगळीवेगळी दिवाळी!

November 8, 2026
भवरलाल अॅण्ड कांताबाई जैन फाऊंडेशनने ३२ फुटांच्या भव्य ‘लामण दिव्या’तून जळगावच्या वैभवात घातली भर!

भवरलाल अॅण्ड कांताबाई जैन फाऊंडेशनने ३२ फुटांच्या भव्य ‘लामण दिव्या’तून जळगावच्या वैभवात घातली भर!

November 7, 2026
नांदागाव येथे महाराणा प्रतापसिंहजींच्या भव्य अश्वारूढ पुतळ्याचे उत्साहात लोकार्पण

November 1, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us