Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

जैन इरिगेशनला ‘टाइम्स ऑफ इंडिया इकोप्रेन्योर सन्मान’

najarkaid live by najarkaid live
August 6, 2025
in राज्य
0
जैन इरिगेशनला ‘टाइम्स ऑफ इंडिया इकोप्रेन्योर सन्मान’

जैन इरिगेशनला ‘टाइम्स ऑफ इंडिया इकोप्रेन्योर सन्मान’

ADVERTISEMENT
Spread the love

नवी दिल्ली, दि.६ (प्रतिनिधी) : दिल्ली येथील इरॉस हॉटेलमध्ये टाइम्स ऑफ इंडियाने आयोजित केलेल्या शानदार समारंभात जैन इरिगेशन सिस्टम्स लिमिटेडला ‘टाइम्स ऑफ इंडिया इकोप्रेन्योर – २०२५’ पुरस्कार सन्मानाने गौरविण्यात आले. कंपनीच्या शाश्वत शेती, जैवविविधता संवर्धन, पाणी व्यवस्थापनातील दीर्घकालीन नेतृत्व यासाठी नुकताच हा गौरव करण्यात आला. कार्यक्रमात कंपनीच्यावतीने जैन फार्म फ्रेश फुडस् चे संचालक अथांग अनिल जैन यांनी हा पुरस्कार स्वीकारला.

जैन इरिगेशनला ‘टाइम्स ऑफ इंडिया इकोप्रेन्योर सन्मान’
जैन इरिगेशनला ‘टाइम्स ऑफ इंडिया इकोप्रेन्योर सन्मान’

जैन इरिगेशनच्या २,५०० एकरांहून अधिक क्षेत्रातील एकात्मिक पाणलोट विकास कार्याची, ज्यात मृदासंवर्धन, वृक्षारोपण, पावसाचे पाणी साठवण आणि भूजल पुनर्भरण संरचना या महत्त्वपूर्ण कामांचा समावेश आहे. कंपनीने जागतिक पातळीवर ठसा उमटविलेल्या या कार्याला अधोरेखित करून ह्या पुरस्कारासाठी निवडले आहे. जैन इरिगेशनच्या कृषी-तंत्रज्ञान उपाययोजनांनी भारत आणि जागतिक स्तरावर एक कोटीहून अधिक छोट्या शेतकऱ्यांना सक्षम बनविले आहे. ज्यामुळे शाश्वत शेती तंत्रज्ञान पद्धतींचा अवलंब, उत्पादकता वाढ आणि दीर्घकालीन नफा मिळवणे शक्य झाले आहे. या परिवर्तनाच्या केंद्रस्थानी कंपनीचे ठिबक व सूक्ष्मसिंचनाचे अग्रगण्य काम आहे. जैन इरिगेशनच्या उत्पादनांनी १४३ अब्ज घनमीटर पाण्याची बचत, २६,३९५ गिगावॅट तास ऊर्जेची बचत आणि १९ दशलक्ष टन कार्बन समकक्ष उत्सर्जन कमी केले आहे. पाणी आणि पोषक द्रव्ये थेट झाडांच्या मुळापर्यंत पोहोचवून, पर्यावरण पुरक ठरतात, उत्पन्न वाढवतात आणि मातीचे आरोग्य टिकवतात.

पर्यावरणीय जबाबदारीची ही बांधिलकी लँडस्केप आणि समुदायांपर्यंत विस्तारली आहे. गिरणा नदीवरील ‘कांताई’ बंधाऱ्यासारख्या महत्त्वपूर्ण पायाभूत सुविधांनी १,२०० हून अधिक शेतकरी कुटुंबांना आणि जवळपास ४,००० एकर शेतजमिनीला सिंचन सुविधा उपलब्ध झाली आहे, तसेच ग्रामीण प्रवेश आणि वाहतूक सुधारली आहे. कंपनीच्या संवर्धन क्षेत्रात आता ८०० हून अधिक प्रजातींचा समावेश आहे, ज्यात वूल्ली-नेक्ड स्टॉर्क आणि युरोपियन रोलर यांसारख्या २१ जवळपास धोक्यात असलेल्या पक्षी आणि प्राण्यांचा समावेश आहे. यासोबतच, जैन इरिगेशनच्या प्रसार कार्यक्रमांनी २२ गावांमध्ये ७५,००० हून अधिक सीड बॉल आणि रोपांचे वितरण केले आहे, ज्यामुळे पर्यावरणीय जागरूकता आणि सामायिक जबाबदारीची संस्कृती वृद्धिंगत केली.

टाइम्स ऑफ इंडिया इकोप्रेन्योर सन्मान हा टाइम्स ऑफ इंडियाचा एक प्रमुख उपक्रम आहे, जो नवकल्पना आणि जबाबदारीद्वारे मोजता येणारे पर्यावरणीय परिणाम देणाऱ्या व्यवसायांना प्रकाशझोतात आणतो. स्वतंत्र ज्ञान तज्ज्ञांच्या सहभागाने पारदर्शक आणि प्रभाव विश्वासार्हतेच्या आधारावर कंपन्यांची निवड केली जाते. अशा प्रयत्नांचा सन्मान करून, हा उपक्रम भारतीय उद्योगांना त्यांच्या वाढीच्या, शाश्वतता आदी समाविष्ट करण्यास मोलाचा ठरतो.

उच्च कृषीतंत्रज्ञान, निसर्ग-सकारात्मक विकास आणि ग्रामीण सक्षमीकरण या मूलभूत मूल्यांवर आधारित, जैन इरिगेशन पर्यावरणीय आणि उपजीविकेच्या आव्हानांना सामोरे जाणारे व्यावहारिक उपाय वाढवत आहे. हवामानाचा परिणाम वाढत असताना, कंपनी भारतीय शेतीसाठी हिरवेगार, अधिक लवचिक आणि समावेशक भविष्य घडवण्यासाठी कटिबद्ध आहे.

इकोप्रेन्योर सन्मान शाश्वत विकासाचे, निष्ठेचे प्रतीक!

टाइम्स ऑफ इंडिया इकोप्रेन्योर सन्मान आमच्या सहकाऱ्यांच्या अथक प्रयत्नांचे आणि शाश्वत विकासावरील आमच्या निष्ठेचे प्रतीक होय. २,५०० एकर क्षेत्रावर जैवविविधता संवर्धन, जलसंधारण, आणि मृदा संरक्षणाच्या माध्यमातून आपण पर्यावरण रक्षणासाठी एक सशक्त मॉडेल उभे केले आहे. ही केवळ कंपनीसाठी नव्हे तर समाजासाठी आणि भविष्यातील पिढ्यांसाठी केलेली गुंतवणूक आहे. जैन इरिगेशन उद्योग समूहाचे संस्थापक भवरलालजी जैन अर्थात श्रद्धेय मोठ्याभाऊंच्या मूल्यांचा आणि पर्यावरणाविषयी असलेल्या दूरदृष्टीचा जागतिक स्तरावरील स्वीकार आहे. हा पुरस्कार म्हणजे जबाबदारीत वाढ होणे म्हणता येईल. भविष्यातही आम्ही पर्यावरणपूरक, तंत्रज्ञानाधिष्ठित आणि सामाजिकदृष्ट्या उपयुक्त असेच कार्य करत राहू.”

अशोक जैन,
चेअरमन,
जैन इरिगेशन सिस्टिम्स लिमिटेड, जळगाव.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

राष्ट्रीय बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धेतील खेळाडूंच्या पालकांशी निशा जैन यांचा संवाद

Next Post

ब्रेकिंग : जळगाव मधील तीनही भाविक सुरक्षित ; ढगफुटीने गिळले पर्यटनाचे क्षण : ढगफुटीमुळे गावे गडप, होत्याचं नव्हतं

Related Posts

ब्रेकिंग : शॉक लागून ५ जणांचा दुर्दैवी मृत्यू !

ब्रेकिंग : शॉक लागून ५ जणांचा दुर्दैवी मृत्यू !

August 21, 2025
मोठी बातमी ; TAIT परीक्षेचा निकाल जाहीर : ६३२० उमेदवारांचा निकाल राखीव

मोठी बातमी ; TAIT परीक्षेचा निकाल जाहीर : ६३२० उमेदवारांचा निकाल राखीव

August 20, 2025
Cabinet meeting Maharashtra

आजच्या महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे 4 धडाकेबाज निर्णय वाचा!

August 19, 2025
प्रवीणसिंह पाटील (राजपूत) बने श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना के महाराष्ट्र कार्यकारी प्रदेशाध्यक्ष

प्रवीणसिंह पाटील (राजपूत) बने श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना के महाराष्ट्र कार्यकारी प्रदेशाध्यक्ष

August 18, 2025
मुख्यमंत्री फडणवीस यांचा राज्यपाल राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपती पदाच्या उमेदवारीबद्दल अभिनंदन

मुख्यमंत्री फडणवीस यांचा राज्यपाल राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपती पदाच्या उमेदवारीबद्दल अभिनंदन

August 18, 2025
Jalgaon news : जिल्हा नियोजन मधून झालेल्या कामाचे विशेष कौतुक ;   येत्या बजेट मध्ये जिल्ह्याला निधी देणार वाढवून  – उपमुख्यमंत्री अजित पवार   

Jalgaon news : जिल्हा नियोजन मधून झालेल्या कामाचे विशेष कौतुक ;  येत्या बजेट मध्ये जिल्ह्याला निधी देणार वाढवून – उपमुख्यमंत्री अजित पवार  

August 17, 2025
Next Post
जळगाव मधील तीनही भाविक सुरक्षित ; ढगफुटीने गिळले पर्यटनाचे क्षण : ढगफुटीमुळे गावे गडप, होत्याचं नव्हतं

ब्रेकिंग : जळगाव मधील तीनही भाविक सुरक्षित ; ढगफुटीने गिळले पर्यटनाचे क्षण : ढगफुटीमुळे गावे गडप, होत्याचं नव्हतं

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

शॉकिंग न्यूज : चुलत भावाचे बहिणीवर जळलं प्रेम, तीने नकार दिल्याने निर्घृण हत्या करून घरातचं पुरलं!

शॉकिंग न्यूज : चुलत भावाचे बहिणीवर जळलं प्रेम, तीने नकार दिल्याने निर्घृण हत्या करून घरातचं पुरलं!

August 28, 2025
ब्रेकिंग न्यूज: विरार इमारत दुर्घटना – मृतांचा आकडा १७ वर पोहोचला

ब्रेकिंग न्यूज: विरार इमारत दुर्घटना – मृतांचा आकडा १७ वर पोहोचला

August 28, 2025
Personal Loan घेतांना योग्य बँक कशी निवडायची? जाणून घ्या महत्वाच्या टिप्स

Personal Loan घेतांना योग्य बँक कशी निवडायची? जाणून घ्या महत्वाच्या टिप्स

August 28, 2025
10-year Mutual Fund Returns: Small-cap vs Mid-cap vs Large-cap : कोणता फंड गुंतवणुकीसाठी योग्य? जाणून घ्या सविस्तर

10-year Mutual Fund Returns: Small-cap vs Mid-cap vs Large-cap : कोणता फंड गुंतवणुकीसाठी योग्य? जाणून घ्या सविस्तर

August 28, 2025
Google Trends IPO 2025: गुगलवर धुमाकूळ घालणारे टॉप 5 IPO!

Google Trends IPO 2025: गुगलवर धुमाकूळ घालणारे टॉप 5 IPO!

August 28, 2025
Mumbai High Court Bharti 2025: मुंबई उच्च न्यायालयात स्वीय सहाय्यक पदांसाठी भरती

Mumbai High Court Bharti 2025: मुंबई उच्च न्यायालयात स्वीय सहाय्यक पदांसाठी भरती

August 28, 2025
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us