Bombay High Court: मुंबई उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय – सर्व फ्लॅटधारकांना समान मेंटेनन्स शुल्क आकारणे बेकायदेशीर, फ्लॅटच्या आकारानुसारच शुल्क आकारावं लागेल.
Bombay High Court On Flat Maintenance: आता फ्लॅटच्या आकारावरच ठरेल मेंटेनन्स शुल्क
मुंबई उच्च न्यायालयाने एक महत्त्वाचा निर्णय देत स्पष्ट केलं आहे की, फ्लॅटचा आकार जितका मोठा, तितकं अधिक देखभाल शुल्क (Maintenance Charges) द्यावं लागेल. महाराष्ट्र अपार्टमेंट मालकी कायदा १९७० नुसार हा ऐतिहासिक निर्णय झाला असून, यामुळे अनेक सोसायट्यांमध्ये समान शुल्क घेतल्याच्या पद्धतीला मोठा धक्का बसला आहे.
नेमकं प्रकरण काय?
पुण्यातील एका मोठ्या निवासी संकुलात ११ इमारती व ३५६ पेक्षा जास्त फ्लॅट्स आहेत. याठिकाणी कॉन्डोमिनियम व्यवस्थापन मंडळाने निर्णय घेतला होता की सर्व फ्लॅटधारकांकडून सारखंच मेंटेनन्स शुल्क वसूल केलं जाईल, मग फ्लॅट मोठा असो किंवा छोटा.

या निर्णयामुळे लहान फ्लॅट धारकांनी नाराजी व्यक्त करत कायद्याच्या विरोधात आवाज उठवला. त्यांचा युक्तिवाद होता की, लहान फ्लॅट असतानाही समान शुल्क आकारणं अन्यायकारक आहे.
स्थानिक न्यायालयाचा निकाल आणि उच्च न्यायालयात धाव
मे २०२२ मध्ये पुण्यातील सहकारी न्यायालयाने ही याचिका फेटाळून लावली होती. मात्र, त्यानंतर फ्लॅटधारकांनी थेट मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली.
त्यावेळी याचिकाकर्त्यांच्या वकिलांनी असा युक्तिवाद केला की, सोसायटीतील सुविधा सर्वांनी सारख्याच प्रमाणात वापरल्या जातात. त्यामुळे देखभालीचा खर्च समान वाटा तत्त्वावरच असावा. मात्र, न्यायालयाने हा युक्तिवाद फेटाळला.
Bombay High Court ने काय म्हटलं?
न्यायाधीशांनी स्पष्टपणे नमूद केलं की, महाराष्ट्र अपार्टमेंट मालकी कायदा तसेच कॉन्डोमिनियम व्यवस्थापनाच्या घोषणापत्रात स्पष्टपणे ‘फ्लॅटच्या आकारानुसार देखभाल शुल्क आकारावे’ असा उल्लेख आहे. त्यामुळे:
लहान फ्लॅट असलेल्या व्यक्तींना कमी आणि मोठ्या फ्लॅट धारकांना जास्त मेंटेनन्स चार्जेस द्यावे लागणार ही न्यायालयीन भूमिका कायदेशीर आणि तर्कसंगत असल्याचे न्यायालयाने स्पष्ट केलं.

या निर्णयाचे परिणाम काय होणार?
या निर्णयामुळे आता संपूर्ण महाराष्ट्रातील अनेक सोसायट्यांमध्ये देखभाल शुल्काच्या नियमांमध्ये बदल होण्याची शक्यता आहे. अनेक सोसायट्यांमध्ये फ्लॅटच्या आकाराकडे दुर्लक्ष करत एकसमान शुल्क घेतले जात होते.
Bombay High Court च्या या निर्णयामुळे:
फ्लॅटधारकांमध्ये आर्थिक न्याय होईल
कायद्याचे पालन होईल
मोठ्या फ्लॅट धारकांना अधिक जबाबदारी स्वीकारावी लागेल

Bombay High Court चा हा निर्णय flat maintenance charges विषयी स्पष्टता देणारा असून, कायद्याच्या चौकटीत राहत फ्लॅटच्या size-based charges योग्य असल्याचं न्यायालयाने स्पष्ट केलं आहे. यामुळे कॉन्डोमिनियम आणि हाउसिंग सोसायट्यांमध्ये आर्थिक पारदर्शकता येणार आहे.
सरकारी नोकरी कुठे? वाचा –
रेल्वे भरती सुरू – 3115 जागा, कोणतीही परीक्षा नाही!
महाराष्ट्रात 1700 नव्या तलाठी पदांची भरती ; महत्त्वाची माहिती जाणून घ्या!
UPSC EPFO भरती 2025 : EO/AO आणि APFC 230 पदांसाठी संधी! थेट निवड पद्धतीने होणार भरती..
सुरक्षा सहाय्यक ५ हजार पदांची भरती जाहीर : १० वी पास असणाऱ्यांसाठी मोठी संधी
Teacher Recruitment 2025 : 12 हजार शिक्षक भरतीची मोठी संधी!
महाराष्ट्र जलसंपदा विभागात 1200+ पदांची मेगाभरती!
10वी, 12वी, ITI, डिप्लोमा, पदवीधर सर्वांना संधी
Latest news 👇🏻
CBSE New Rule :CBSE चा मोठा निर्णय! 8वी ते 12वीसाठी नवीन नियम लागू
केंद्रीय गुप्तचर विभागात 10वी पाससाठी 4987 जागांची मोठी संधी!
₹5 लाख ते ₹1 कोटी कव्हरेज – तुमच्यासाठी योग्य हेल्थ इन्शुरन्स कोणता?
‘लाडकी बहीण योजना’ : महिलांसाठी रक्षाबंधनाची खास भेट! ‘या’ दिवशी खात्यात जमा होणार 3000 रुपये
वेलदोडे खाण्याचे चमत्कारी फायदे
मतदार यादीत तुमचं नाव आहे का? 2025 साठी नाव कसं शोधाल ते येथे वाचा
80 वर्ष निरोगी आयुष्य हवंय?आयुर्वेदानुसार रोज पाळा ‘हे’ १० नियम
Motorola G85 5G स्मार्टफोनवर 50% सवलत – 21 हजाराचा मोबाईल Sale मध्ये फक्त ₹10,999
Meesho व्यवसाय करून कमवा लाखो रुपये | घरबसल्या कमाईची संधी, कुठलीही गुंतवणूक नाही!
संबंधीत बातम्या👇🏻
बजाज फायनान्सचे पर्सनल लोन घेणे झाले सोपे! 40 हजार ते 55 लाख पर्यंत मिळतंय कर्ज…
टर्म इन्शुरन्स म्हणजे काय? हा इन्शुरन्स घ्यायचा की नाही?
१० मिनिटात कर्ज मिळवा, खरं की खोटे?
Personal Loan 2025: कमी व्याजदरात त्वरित कर्ज मिळवा,EMI, पात्रता, आणि सर्वोत्तम बँका कोणत्या?
Indian IPO Boom 2025 : भारत दुसऱ्या क्रमांकावर IPO संख्येत, स्टार्टअप्सकडून विक्रमी निधी उभारणी
Loan without CIBIL Score: क्रेडिट स्कोअर नसतानाही मिळणार कर्ज? हे ५ पर्याय वापरा!
Gold Loan फायदे, तोटे,व्याजदर आणि सावधगिरी – सोने तारण कर्ज संपूर्ण माहिती
Mutual Fund vs Bank FD| म्युच्युअल फंड की बँक FD? कुठे गुंतवणूक सुरक्षित आणि फायदे