मुंबई,(वृत्तसंस्था) – महाराष्ट्र राज्यात कोरोना रुग्ण सतत वाढत असल्याने बिकट परिस्थिती निर्माण होत चालली असतांना लॉकडाऊन मुळे अडकलेले स्थलांतरीत कामगारांना त्यांच्या घरी पोहचविण्यासाठी मुख्यमंत्री इतर राज्यांच्या सरकारशी बोलणी करत आहेत.
स्थलांतरित कामगारांना त्यांच्या घरी सोडण्यासाठी सतत प्रयत्न करत आहे.
असे असले तरी स्थलांतरित मजुरांचा घरी जाण्याचा प्रश्न मात्र, अद्यापही सुटलेला नाही. महाराष्ट्रात ठाकरे सरकारकडून सतत प्रयत्न केले जात आहेत.दरम्यान, महाराष्ट्रातील स्थलांतरित मजुरांचा प्रश्न मात्र, अद्यापही सुटलेला नाही त्यामुळे स्थलांतरित कामगार आपल्या घरी जाण्यासाठी मात्र उत्सुक आहेत. दरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केंद्र सरकारकडे अपील करून यासंदर्भात काही सूचना केल्या आहेत.