जळगाव ;- प्रेमविवाह केलेली पत्नी घरी नांदायला येत नसल्याच्या कारणावरून नैराश्यातून एका २२ वर्षीय तरुणाने राहत्या घरी गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपविल्याची घटना आज रायसोनी नगर येथे सकाळी उघडकीस आली .
याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी कि, शहरातील रायसोनी नगर भागात राहणार निलेश मधुकर सपकाळे वय २२ हा हातमजुरी उदरनिर्वाह करीत होता. त्याने नुकताच प्रेम विवाह केला होता . मात्र पत्नी हि घरी नांदायला येत नसल्याने ९ रोजी त्याने पत्नीच्या माहेरी जाऊन तिची समजूत काढली . परंतु तिने येण्यास नकार दिला . यामुळे निलेश याने आज सकाळी १० वाजता नैराश्यातून राहत्या घरावरील वरच्या मजल्यावरील खोलीत दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली . मयत निलेशच्या पश्चात आईवडील , मोठा भाऊ, असा परिवार असून काका शांताराम सपकाळे यांच्या खबरीवरून रामानंद नगर पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तपास मनोज इंद्रेकर करीत आहे.