Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

डॉक्टरांनी रुग्णांना सेवा देऊन खऱ्या अर्थाने धन्वंतरी व्हावे – पालकमंत्री गुलाबराव पाटील

najarkaid live by najarkaid live
April 13, 2020
in Uncategorized
0
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव, (प्रतिनिधी) दि. 13 – सध्या संपूर्ण जगात थैमान घातलेल्या कोरोना विषाणू संसर्गाच्या रुग्णांवर जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा प्रयत्नांची पराकाष्टा करुन नियंत्रण मिळवित आहे. आरोग्य विभागतील प्रत्येक घटक याप्रसंगी रुग्णांसाठी अगदी देवदूतासारखे धावून येत आहेत. रुग्णसेवा ही ईश्वर सेवा माणून रुग्णांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवीणारे डॉक्टरांनी स्वीकारलेला वैद्यकीय पेशा हा व्यवसाय नसून समाजसेवा आहे.

सर्वांनी आपआपल्यापरीने सेवा देऊन खऱ्या अर्थाने धन्वतंरी होवू या. अशा अपेक्षा राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी व्यक्त केल्या. श्री साईबाबा संस्थान, पाळधी चे अध्यक्ष सुनिल झंवर यांनी स्वयंस्फूतीने आरोग्य विभागातील सर्व घटकांना दिलेल्या पीपीई किटचे वितरण पालकमंत्र्यांच्या हस्ते येथील नियोजन भवनात पार पडले. याप्रसंगी ते बोलत होते.
याप्रसंगी मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील, जिल्हाधिकारी डॉ.अविनाश ढाकणे, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. भास्कर खैरे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एन. एस. चव्हाण, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.दिलीप पाटोडे, डॉ.रवि महाजन, सुनिल झंवर, डॉक्टर्स तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर अधिकारी, पदाधिकारी उपस्थित होते.
पालकमंत्री पुढे म्हणाले की, जिल्ह्यातील सर्व डॉक्टरांनी आप-आपले दवाखाने नियमितपणे उघडे ठेवून रुग्णांची गैरसोय होणार नाही याकडे विशेष लक्ष द्यावे. सुनिल झंवर यांचेकडून पीपीईचे किट तर डॉ. रवि महाजन यांचेकडून फेस किटचे वाटप करण्यात आले आहे. कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर हे किट किंवा फेस किट पुरेसे नाही याची मला जाणीव आहे. त्याचा जास्तीत पुरवठा करण्याचा शासनस्तरावरून प्रयत्न केला जाईल. तसेच शासनस्तरावर योग्य तो प्रयत्न करून लवकरच याकामी जिल्हृयाला आवश्यक तो निधी उपलब्ध होईल. शिवाय जिल्ह्यातील सर्व पोलीसांना वेगवेगळ्या प्रकारचे मास्क पुरविण्यात येतील. असेही पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी यावेळी सांगितले.
मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी मुक्ताईनगरच्या उप जिल्हा रुग्णालयासाठी 50 लाख एवढी आमदार निधीतून मदत करून शासकीय रुग्णालयात एक अद्ययावत ऑपरेश थिएटर उभारणार असल्याची माहिती यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एन. एस. चव्हाण यांनी दिली. जिल्ह्तील आतापर्यंत कोरोना विषाणूचे संशयित आणि रुग्णांविषयी सविस्तर माहिती देतांना डॉ. चव्हाण म्हणाले की, जिल्ह्यात आतापर्यंत कोरोना संशियत रुग्णांचे मोठया प्रमाणात स्क्रीनिंग करण्यात आले आहेत. जिल्हा सामान्य रुग्णालयांचे केव्हिड-19 मध्ये रुपांतर केल्यानंतर सोशल डिस्टनसिंगचा विचार करून दवाखान्यात 200 बेडची व्यवस्था करण्यात आली आहे.
जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांनी कोरोना विषाणूचा आरोग्य विभाग आणि जिल्हा प्रशासन करीत असलेल्या मुकाबलाविषयी सविस्तर सांगितले. जिल्हा रुग्णालयाचे कोव्हिड 19 मध्ये रुपांतर केल्यानंतर या रूग्णालयात आता कोरोना संदर्भातील रुग्ण दाखल आहेत. दवाखाना अद्ययावत झालेला असल्याने कोरोनाचे निदान व इलाजासाठी तेथेच दाखल व्हावे. कोव्हिड-19 मध्ये रुपांतर झाल्यापासून कार्पोरेट हॉस्पिटलसारखा सोई-सुविधाही आहेत. नागरिकांनी कोरोनाला उगाच घबरून जावू नये किंवा कोणाला घाबरविण्याचा प्रयत्नही करू नये, खोट्या अफवा पसरवू नये. आवश्यक ती काळजी घ्यावी व लक्षणे दिसताच कोव्हिड-19 या दवाखान्यातच पुढील इलाजासाठी दाखल व्हावे. जिल्ह्यातील सर्वच डॉक्टरांनी 24 तास रुग्णांच्या सेवेस हजर असले पाहिजे तसेच कोणत्याही रुग्णांना कुठल्याही वेळेला तपासणी किंवा आवश्यक ते इलाजासाठी नाकारू नये. अशा सूचनाही जिल्हृयातील सर्व डॉक्टरांना यावेळी जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांनी दिल्यात.
समाजाचे आपण काहीतरी देणे लागतो या भावनेतून श्री. सुनिल झंवर आणि डॉ. रवि महाजन यांनी केलेल्या कामाचे कौतूक करतांना पालकमंत्री म्हणाले की, त्यांच्याप्रमाणेच अजूनही अनेक सामाजिक संघटना, समाजसेवक व समाजातील दानशूर व्यक्तींनी अशाप्रकारे सढळ हस्ते मदत करून राज्यावर आणि आपल्या देशावर आलेल्या संकटाचा मुकाबला करण्यासाठी प्रशासनास मदत करावी. असे भावनिक आवाहनही शेवटी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी सर्व जिल्हावासियांना केले.
यावेळी पालकमंत्र्यांच्या हस्ते प्रातिनिधीक स्वरुपात डॉक्टर्सना पीपीई किट व फेस किटचे वाटप करण्यात आले.
तसेच श्री साईबाबा संस्थान, पाळधी चे अध्यक्ष सुनिल झंवर यांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी एक लाख रुपयांचा धनादेश पालकमंत्री यांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी डॉ. ढाकणे यांच्याकडे सुपूर्द केला.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

सुभाषवाडी येथे गावठी दारू वरती कारवाई  !

Next Post

वीजग्राहकांना मार्च व एप्रिल महिन्याचे वीजबिल भरण्यास मुदतवाढ !

Related Posts

NMDC Apprentice Recruitment 2025: भारत सरकारच्या कंपनीत सुवर्णसंधी – फ्रेशर्ससाठी मोठी भरती!

October 28, 2025
ZP Election Reservation 2025: जिल्हा परिषद, पंचायत समिती आरक्षण पुन्हा वादात; राज्यभर तब्बल ९०० हरकती दाखल

Ladki Bahin Yojana 2025: तब्बल ₹43 हजार कोटी खर्चामुळे सरकारच्या तिजोरीवर ताण वाढला

PMAY 2025: ‘प्रधानमंत्री आवास योजना’साठी ऑनलाईन अर्ज सुरू, मिळणार ₹1.20 लाखांची थेट मदत!

15,631 पोलिस शिपायांची मेगा भरती जाहीर – अर्ज प्रक्रिया सुरू, जाणून घ्या संपूर्ण तपशील

Maharashtra Police Bharti 2025: 15,631 पोलिस शिपायांची मेगा भरती जाहीर – अर्ज प्रक्रिया सुरू, जाणून घ्या संपूर्ण तपशील

October 28, 2025
SBI Recruitment 2025: स्टेट बँकेत ३५०० नवीन पदांची भरती लवकरच; उमेदवारांसाठी सुवर्णसंध

ताज्या बातम्या

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us