Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

मिरवणुकीची समिक्षा आणि मनाला बोचणारं वास्तव …

najarkaid live by najarkaid live
April 13, 2020
in Uncategorized
1
‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर – दी अनटोल्ड ट्रुथ’ चित्रपटाचे दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवरुन मंगळवारी प्रसारण
ADVERTISEMENT

Spread the love

१४ एप्रिल आंबेडकर जयंतीचा उत्सव वर्षातुन येणारा एकमेव सण म्हणुन साजरा होत असतांना जयंतीच्या कार्यकारिणीच्या बैठकितील नियुक्ति पासुन तर मिरवणुक संपवुन हिशोबाच्या वादापर्यंत समिक्षा करतांना एक भयानक वास्तव डोळ्या समोर उभ राहत डोक्यामध्ये उफाळणारी प्रश्नांच्या मालिकासाठी उत्तर शोधतांना…..! आजुबाजुला काय चाललय अन आपण करतो काय ? ज्यांना काही कळत नाही त्यांच ठीक पण ज्यांना सर्व जाणिव जागृति आहे ते गप्प का ? प्रत्येक जण फक्त बघ्याची भूमिका घेत आनंदात सत्यानाशाची वाट बघत बसलाय कि काय अस वाटत होत
मुळ मुद्दा हा कि आंबेडकरी जयंती हि जितक्या उत्साहात निघते तो उत्साह १२महीने पाहायला का मिळत नाही ? पांढरे वस्त्र कडक इस्त्री करुन अंगावर किलोने सोनसाखळी घालणारे नेते समाजाची अर्थ व्यवस्था बदलु शकले नाही. मोठ्याने बोलणारे पुढारी अत्याचाराच्या घटनामध्ये मौन बाळगुन बसतात कुठेतरी प्रवेशबंदी कुठेतरी पाणवठे बंदी,कधी कुणी शिक्षणापासुन वंचित ,कुठे कामगारामचे शोषण असे असंख्य प्रश्न उभे राहतात .मग एवढी मोठी सामाजिक समस्या असतांना ते सर्व बाजुला ठेवत म्हणा की नकळतपणे म्हणा यावर दुर्लक्ष करुन आंबेडकरी युवक D.j ,ढोल अन बॅन्डच्या आवाजात मोठ्या जोशात थिरकतांना दिसतो इतका बेजबाबदार आंबेडकरी तरुण का झालाय कारण त्याला सामाजिक भान उरल नाही
*मिरवणुकीच*राजकारण*
ग्रामीण भागापासुन ते शहरी भागापर्यंत डॉ बाबासाहेब आंबेडकरांची जयंती ही जोमाने मनवली जाते परंतु महाराष्ट्र मध्ये एक पद्धत आहे ती अशी कि सुरवातीला समाजाने बैठक बोलवायची मग एखाद्याला अध्यक्ष नेमायचा एक अध्यक्ष होण्यासाठी किती वेळा वाद होतील यावर निश्चित सांगता येत नाही पण काहींना दुखावत काहींना सुखावत गटा-तटाच्या सामंजस्याने अध्यक्ष निवडला जातो कार्यकारिणी गठित होते अन सुरवात होते वर्गणी जमवण्याची वर्गणी म्हणजे लोकांकडुन स्वेच्छेने घेतलेली आर्थिक मदत होय मदत ही नम्रपणे मागावी लागते हे देखिल काही ठीकाणी समजावुन सांगावे लागते
अन जयंतीचा प्रवास सुरु होतो कुठ नम्रपणे तर कुठ हक्काने कुठ जबरीन तर काही मुर्ख वर्तवनुक करणार्यांच्या माध्यमातून जयंती साठी पैसा गोळा करण्यात येतो.बर हा पैसा देत कोण मोठ्या प्रमाणात मोठ्या आकडंयाची वर्गणी राजकिय लोकांची असते विशेष म्हणजे जे राजकिय पक्ष आंबेडकरी विचार नाकारतात त्यांचा पैसावर आंबेडकर जयंती निघते. आहे ना विरोधाभास? पण यावर विचार करणार कोण? ही लोक पैसे का देतात? का करताय खर्च इतका ?काही त स्वार्थ नक्कीच असतो यांचा. यामागे असत ते सर्व राजकिय गणित सार्वजनिक कार्यक्रमाला समाजाला सहारा द्यायचा अन निवडणुका आल्या की स्वतासाठी त्यांचा वापर करत त्यांना मत मागण्याचा इशारा द्यायचा निवडणुका जिकांयच्या यातुन राजकारणात नव्यान येणार्यांची मानसिकता तयार होते ती हि कि कोण कस विकल जात अन कुणाला कस विकत घ्यायच…
आता मोठ्या प्रमाणात पैसा गोळा झाल्यावर मिरवणुकीत असत तरी काय जरा बारकाईन अभ्यासु एक भल मोठ बॅनर अन काही महत्वपूर्ण देखावा दोन-पाच ट्रॅक्टर-ट्राॅली अन संख्येच्या आधारावर बॅन्ड-डीजे ची उपलब्धता,वेगवेगळ्या घोळक्यात नाचणारी तरुणाई,यात सावित्रीच्या संघर्षाने मुक्त झालेल्या स्रीया ही सहभागी असतात. मग काय-काय शब्दांचे गाणे त्यावर मद्यधुंद आंदाधुन नाचणारे पोर-माणस रस्त्यांन मिरवणुक चालत जाते गाणे वाजत जाता नाचणार्यांना आनंद मिळतो बॅन्ड-डीजे वाल्यांना मिळतो पैसा विचार कुठतरी दबतांना पाहुन सत्यानाश समाजाचा होतांना पाहुन काही समाजकंटकांना मिळतो तो असुरी आंनद स्मिथ हास्य देत ते लोक हार घेवुन येतात प्रतिमेंच पुजन करायला हार आपल्या बापाच्या प्रतिमेला टाकत स्वताचा विजय होतांना पाहुन खुश होता.

मिरवणुकिची समिक्षा करतांना कामाची गोष्ट फक्त काही संदेश देणारे देखावे बाकि सर्व व्यर्थ.चौकाचौकात बाबासाहेबांच्या फोटोपेक्षा स्वताच मुंडक मोठ केलेले स्वंयघोषित पुढार्यांची होर्डिंग्स अन बाजुला एका आश्रयदात्याचा फोटो तोपण मोठ्या पुढार्याचा आश्रयदाता यासाठी कि हे होर्डिंग्स पण त्याच्याच पैसातुन असते ना. पण इतका विचार करत कोण?
घ्यायचे काय अन आम्ही घेतो काय! मिरवणुका आमच्या एकिकरणाच प्रतिक असाव, मिरवणुका आमच्या संगठीत शक्तिच प्रदर्शन असाव एका पिढीने दुसरी पिढी पर्यंत महापुरुषांचा विचार पेरनार एक उघड माध्यम असाव स्वाभिमानी, स्वावलंबी, आर्थिक अन बौद्धिक सक्षम होवुन आम्ही आमच्या हक्क अधिकारांप्रती जागृत आहोत हे दर्शवल जाव महापुरुषांच्या इतिहासाच अन कार्यांच प्रकटीकरण असाव पन सगळ घडत उलट म्हणुन तर सत्यानाश .

सायंकाळ पासुन सुरु झालेल्या मिरवणुका रात्रि उशीरा पर्यंत संपता उत्साहाचा पारा आरंभ बिंदुच्यापण फार खाली खाली आलेला असतो. नाचुन दमलेला आंबेडकरी कार्यकर्ता शांतपणे दोन दिवस झोपा काढतो दोन दिवसात होर्डींग उतरलेली असते मिरवणुकिच्या नियोजनात वेळ दिल्याने महिन्याचा बजेट कोलमडलेला असतो ते व्यवस्थित करायचा विचार सुरु होतो अन लागा काम-धंद्याला अशी हाक आतुन येतच‌ असते.दिवसभर मोल-मजुरीची , कष्टाची काम अन संध्याकाळी मिरवणुकिची चर्चा अन चर्चेचा विषय प्रचंड चित्तवेधक कधी विषय कोण किती दारु पिल त्याची तर कधी बॅन्ड-डीजे च्या स्तुतिची एक विषय तर पुढच्या जयंती पर्यंत चर्चेतच असतो तो म्हणजे पैसा किती जमला अन खर्च किती झाला हिशोब समोर असला तरी अपहाराची चर्चा निरंतर सुरु असते.

मग समाजाकडे उघड्या डोळ्यांनी पाहाव तर वास्तव समोर असत, पांढर्यां कपड्यात मिरवणुकित फिरणारा नेता नंतर कुठतरी तहसील आवारात शिकारी म्हणुन फिरत असतो.शिकारी या शब्दातच त्याचे वर्णन जास्त बोलुन उपयोग नाही होर्डिंग्स मध्ये स्वच्छ चेहर्यांचा फोटो देणारा नवतरुण युवा नेता मिरवणुकि नंतर कुठतरी गटार साफ करतांना सफाई कर्मचारी म्हणुन दिसतो अन नोकरदार वर्ग त्याच्या प्रपंचात सुखी असतो हे एकुन जरी राग येत असला तरी वास्तव कुणी नाकारु शकत नाही
यांतुन एक सिद्ध झाल मिरवणुका निरंतर अस काहीच देत नाहीत जे असत ते संपवल जातय स्वताच्या हातांनी’मिरवणुकिच राजकारण देत उध्वस्त कुटुंबाचा पुढारी आपआपसातील किरकोळ वादांचे भव्य स्वरुप ,एकमेकांबद्दल द्वेष , एकत्र येण्याच चित्र अन दुफळी निर्माण करणार वास्तव,दुसर्यांना बाप मानणारी नवी पीढी अन आर्थिक कुचबंना झालेली लोक वर्गणी नाही तर सहभाग नाही ही धारणा धरुन जात बाहेर टाकल जाण्याची एक भीती.काय हेच हव होत महापुरुषांना ?
व्यक्ति अन मुर्ती पुजेत अडकलेल्या समाजाला बाहेर काढण्याची आवश्यकता ओळखुन “केवळ माझे नाव घेवुन जय-जयकार करण्यापेक्षा समाजाच्या उद्धारासाठी तुम्ही संघर्ष केला पाहिजे “हे सांगायचा जरी प्रयत्न केला तर तुम्ही आमच्या भावना दुखावता, लय बाबासाहेब कळतो का तुम्हाला म्हणत बुद्धिजीवी वर्गाच शहानपण दाबल जात.
एक प्रसंग आठवला काही वर्षांपुर्वी 1जानेवारी भीमाकोरेगावला हिंसा झाली त्याचे पडसाद महाराष्ट्रभर उमटले हे सर्व पहातांना लक्षात आल कि समाज हा भावनिक होवुन रस्त्यांवर पुर्ण ताकदीने उतरतो पण त्याच मार्गदर्शन म्हणा कि दिशा-निर्देशन करण्याच काम काही अक्कलशुन्य लोक करतात
अक्कलशुन्य याकरीता कारण ते जमावाला हिंस्त्र व उग्र स्वरुप देता ते असंविधानिक भाषेचा प्रयोग करतात ते सरकारी मालमत्तेच नुकसान करायला प्रोत्साहन देतात त्यांना परिणामाची जाण नसते ,कायद्याची माहिती नसते . नुकसान कुणाच किती होइल याच्याशी त्यांना देण-घेण नसते ही लोक समाजाचा घात करणारी आहेत कारण ही नवतरुणांना हिंस्त्र बनवता.अटक सत्र सुरु झाल कि भावनेच्या भरात केलेल्या कृत्यांचे ‘भावनेचे बळी’ उचलले जातात अन सुरवात होतो कोर्ट फेरींची मिळत काय तरुंणाच उध्वस्त करिअर.बर तुरुगांत जावुन कुणी हिरो होतो काय?मग बाबासाहेबांनी वकिली का केली असती अभ्यास का केला असता उच्च शिक्षण घेत संघर्ष केला तो ही एका पेनाला हत्यार बनवुन मुक्तिच हत्यार बनवुन अन आम्ही जर आमच्या महापुरुषांचा आदर्श ठेवला असता तर सफेद कपड्यातल्या अडाण्याच एैकुन काठी नाही तर पेन धरला असता
एकिकडे आम्ही कायदा आमच्या बापन लिहला म्हणतो अन तोच कायदा मोडीत काढतो बाबासाहेबांना संविधानाचे शिल्पकार म्हणायच अन असंवैधानिक भाषेचा प्रयोग करायचा असच करत आलोय आपण म्हणुन आपला सत्यानाश आपल्या हाताने होतोय
समाजाला महापुरुषांचे चित्र समजले विचार अन चरित्र नाही घरामध्ये फोटो लावण्याच काम आम्ही व्यवस्थित केल शिकलेल्यांनी तर पुस्तकाच कपाट तयार केल पण सत्य परिस्थिति पुस्तक वाचलच नाही ज्यांनी वाचल त्यांनी समजुन घेतल नाही ज्यांनी समजुन घेतल त्यांनी समाजाला सांगण्याचा प्रयत्न केला नाही ज्यांनी प्रयत्न केला त्यांच एेकण्याची समाजातील युवकांची मानसिकता उरली नाही
महात्मा फुलेंनी शिक्षण सर्वासांठी खुले केले अन बाबासाहेबासारखा नेता आम्हाला शिक्षणामुळे लाभला इतक मुल्य शिक्षणाच आहे शिक्षण हे वाघिणीचे दुध आहे असा सुविचार आपण होर्डिंग्स वर पण लावला होर्डींग्सवरिल किती लोक शिक्षित , उच्चपदस्थ आहे या प्रश्नाच उत्तर भयानक असेल.समाजाची बदललेली मानसिकता याला कारणीभूत बापाच्या जागेवर लागायचे म्हटल्यावर युवकांना भविष्याची चिंता उरली कुठे.फाटक्या-तुटक्या समाजाचा नेता डॉ बाबासाहेब आंबेडकर कोटात राहतात समाजाची मानसिकता बदलावी म्हणुन.सध्याच्या पीढीची मानसिकता कामगार मानसिकता झाली इथ कुणाला साहेब व्हायच स्वप्न पण पडत नाही.मोठी स्वप्न नाही तर मोठ होणार कस .
व्यसनाधिन होवुन स्वताचा सत्यानाश करतांना विसर पडतो कि आपन समाजाचा घटक आहोत आपल्या नाशाने समाजाचे हानी होते
हे सारच कस भयावह अन बोचनार वास्तव आहे चिड येण स्वभाविकच आहे पण यंदाच्या वर्षात महाभयंकर रोगामुळ मिरवणुक होणार नाही म्हणून सर्व घरात बसुन आहेतच आज पर्यंतची समिक्षा करावयाची अन वास्तवाच्या विस्तवाशी दोन हात करत नव्या युगाची नव जयंती साजरी करण्याची ,नव संकल्प करत एक आदर्श निर्माण करण्याची संधी ओळखुया अन महापुरुषांच्या विचाराचे वारसदार बनुया………जय भिम ……!

रोहित रमेश ब्राम्हणे
(B.A LL.B,D.LL&LW)
अध्यक्ष -डॉ बाबासाहेब आंबेडकर
अध्ययन मंडळ,पाचोरा
????-8793781647

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

आज राज्यात २२१ नवीन रुग्णांचे निदान; एकूण रुग्णसंख्या १९८२

Next Post

जामनेर भाजीपाला मार्केट मध्ये लिलावात माक्स न लावताच हजेरी : नियमांचे उल्लंघन

Related Posts

कृषी विभागाचा मोठा निर्णय : शेतकऱ्यांसाठी कायमस्वरूपी सिम कार्ड योजना, संवाद होणार अधिक सुलभ

कृषी विभागाचा मोठा निर्णय : शेतकऱ्यांसाठी कायमस्वरूपी सिम कार्ड योजना, संवाद होणार अधिक सुलभ

October 27, 2025
Government Gratuity Limit Update: लाखो कर्मचारी वंचित

Government Gratuity Limit Update: लाखो कर्मचारी वंचित!

October 27, 2025
KYC प्रक्रिया थांबली, पण पैसे लवकरच जमा होणार — लाडकी बहीण योजनेचा नवा निर्णय

KYC प्रक्रिया थांबली, पण पैसे लवकरच जमा होणार — लाडकी बहीण योजनेचा नवा निर्णय

October 27, 2025
IB ACIO Tech Recruitment 2025 : गुप्तचर विभागात सुवर्णसंधी! 258 पदांसाठी भरती, अर्ज प्रक्रिया सुरू

IB ACIO Tech Recruitment 2025 : गुप्तचर विभागात सुवर्णसंधी! 258 पदांसाठी भरती, अर्ज प्रक्रिया सुरू

October 27, 2025
Murder Case 2025 | शहरातील हादरवणारी नियोजनबद्ध हत्या – चार आरोपी अटकेत

Murder Case 2025 | शहरातील हादरवणारी नियोजनबद्ध हत्या – चार आरोपी अटकेत

October 26, 2025
Post Office Monthly Income Scheme 2025 | सुरक्षित गुंतवणुकीतून मासिक उत्पन्न मिळवा

Post Office Monthly Income Scheme 2025 | सुरक्षित गुंतवणुकीतून मासिक उत्पन्न मिळवा

October 26, 2025
Next Post

जामनेर भाजीपाला मार्केट मध्ये लिलावात माक्स न लावताच हजेरी : नियमांचे उल्लंघन

Comments 1

  1. प्रदिप हरिष जाधव says:
    6 years ago

    बाबासाहेबांची जयंती तर साजरी झालीच पाहीजे…पण ती कोणत्या स्वरुपात साजरी करावयाची यावर चर्चा होऊ शकते…निसर्गाच्या थैमानामुळे सार्वजनिक जयंती साजरी होणार नाही आणि ती करुही नये. परंतु आपण वैयक्तिक स्वरुपात कुटुंबा सह घरात साजरी करुया….राहीलं लेखकांनी केलेल्या लेखन प्रपंचाच तर जे स्वरुप आज पर्यंत जयंतीला आलेलं आहे ते बदल्याणीची संधीच निसर्गान दिलेली आहे असं मी मानतो….पुढील वर्षी जयंतीचे स्वरुप काय असावे यावर आतापासुनच सर्व समाजाने भावनिक न होता समजुन विविध वैचारिक,समाजाला आवश्यक अशा कार्यक्रमातुन जयंती साजरी करावी….आर्थिक बाबतीत फक्त आंबेडकरी विचाराच्या जनतेतुनच वर्गणी जमा होईल असे पहावे….आवश्यक निधी जमा होऊ शकतो….रोहीत ब्राम्हणे यांच्या लेखनातुन तरुण पिढी बोध घेईल हि अपेक्षा….जय भिम….

ताज्या बातम्या

कृषी विभागाचा मोठा निर्णय : शेतकऱ्यांसाठी कायमस्वरूपी सिम कार्ड योजना, संवाद होणार अधिक सुलभ

कृषी विभागाचा मोठा निर्णय : शेतकऱ्यांसाठी कायमस्वरूपी सिम कार्ड योजना, संवाद होणार अधिक सुलभ

October 27, 2025
Government Gratuity Limit Update: लाखो कर्मचारी वंचित

Government Gratuity Limit Update: लाखो कर्मचारी वंचित!

October 27, 2025
KYC प्रक्रिया थांबली, पण पैसे लवकरच जमा होणार — लाडकी बहीण योजनेचा नवा निर्णय

KYC प्रक्रिया थांबली, पण पैसे लवकरच जमा होणार — लाडकी बहीण योजनेचा नवा निर्णय

October 27, 2025
IB ACIO Tech Recruitment 2025 : गुप्तचर विभागात सुवर्णसंधी! 258 पदांसाठी भरती, अर्ज प्रक्रिया सुरू

IB ACIO Tech Recruitment 2025 : गुप्तचर विभागात सुवर्णसंधी! 258 पदांसाठी भरती, अर्ज प्रक्रिया सुरू

October 27, 2025
Murder Case 2025 | शहरातील हादरवणारी नियोजनबद्ध हत्या – चार आरोपी अटकेत

Murder Case 2025 | शहरातील हादरवणारी नियोजनबद्ध हत्या – चार आरोपी अटकेत

October 26, 2025
Post Office Monthly Income Scheme 2025 | सुरक्षित गुंतवणुकीतून मासिक उत्पन्न मिळवा

Post Office Monthly Income Scheme 2025 | सुरक्षित गुंतवणुकीतून मासिक उत्पन्न मिळवा

October 26, 2025
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us