जळगाव, (प्रतिनिधी) – जगभरात कोरोना व्हायरस ने थैमान घातले असल्याने शासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करा, संयम पाळा, घरातच रहा असे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी जिल्हावासियांना आवाहन केले आहे.
कोरोना पासून आपले बचाव करण्यासाठी आपल्याला लॉकडाऊन चे पालन करणे आवश्यक आहे. आपला संयम सांभाळून स्वतःचे रक्षण करण्याचे पालकमंत्री यांनी सांगितले.