कोरोनाच्या प्रादुर्भावाने देशभरात लॉक डाऊन झाल्याने स्थलांतरित नागरिकांना शासकीय निवारागृहात ठेवण्यात आले आहे.जळगाव शहरात देखील लाडवंजारी मंगल कार्यालय, राधाकृष्ण मंगल कार्यालय येथे स्थलांतरित नागरिकांना थांबविण्यात आले आहे.तसेच शहरातील हनुमान नगर, प्रिंप्राळा, सम्राट कॉलनी, शाहू नगर, दत्त नगर, कांचन नगर, खंडेराव नगर यासह अनेक भागातील गरजू लोकांपर्यंत दोन वेळचे जेवण पोहचवीत आहोत.त्यासाठी मागील १० दिवस पासून नाथ फाऊंडेशन, के. व्ही. एल इलेक्ट्रिकल ग्रुप , संत बाबा हरदासराम ट्रस्ट जळगांव, शिव सह्याद्री प्रतिष्ठान, नशिराबाद, सिद्धिविनायक मंदिर ट्रस्ट, हित्तेश प्लास्टिक, युवा शक्ती फाऊंडेशन, महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ, जळगाव जिल्हा शाखा, विवेकानंद नगर जळगाव यांचे सह जळगाव येथील दानशूर व्यक्ती संस्था कडून जेवण वितरित करण्यात येत आहे.तरी पुढील लॉक डाऊन पर्यंत या गरजू लोकांची जेवण व्यवस्था करण्यासाठी लाडवंजारी मंगल कार्यालय येथे ओपन किचन सुरु करत आहोत.त्यासाठी जळगाव शहरातील उद्योजक व दात्यांनी वस्तू स्वरूपात जसे की, गहू, तांदूळ, तेल, मसाला, गॅस सिलिंडर, व इतर जीवनावश्यक वस्तू सढळ हाताने मदत करावी ही विनंती.
श्री. लोकेश मराठे,
युवा उद्योजक ९१६८१८००११
के. व्ही. एल इलेक्ट्रिकल जळगांव
GREAT Work