चाळीसगाव -(अजिज खाटीक) : चाळीसगाव शहारातील घाटरोड स्थित प्रभात गल्लीत शिवसेना शहरप्रमुख तथा नगरसेवक नानाभाऊ कुमावत यांच्या राहात्या घरी चोरांनी ७ लाख रु.चा ऐवज चोरुन पसार झाल्याची घटना आज दि. 6 जुलै रोजी घडली.
सविस्तर वृत्त असे की,शहरातील प्रभात गल्लीत अतिशय दाट वस्तीत कुमावत यांचे घर असुन,तिथे मध्यरात्री नगरसेवक नानाभाऊ कुमावत व परिवारातील सर्व सदस्य दुसऱ्या घरात झोपले असतांना चोरांनी घराचे कुलुप तोडुन कपाटातील सोन्या चांदीचे दागिने घेऊन पोबारा केला,कुमावत यांच्या मुलीचे नुकतेच लग्न झाले होते व ती पण माहेरी आलेली होती,कुमावतांच्या आई,पत्नी व मुलीचे दागिने व रोख रक्कम घेऊन चोरटे पसार झाले व त्यांनी शेजारीलच शिंपी यांच्या घरातही सोन्याची पोत,व ६ हजार रु.रोख घेऊन पसार झाले.घटनास्थळी पोलीस निरिक्षक विजयकुमार ठाकुरवाड,सहाय्यक निरिक्षक आशिष रोही यांनी कर्मचाऱ्यांसह भेट दिली,तसेच जळगाव येथील श्वानपथक आले पण,पावसामुळे ते व्यवस्थित मार्ग न दाखवता,परिसरातील चक्की जवळ येऊन मुख्य रस्ता घाटरोड वर येऊन थांबले,चोरटे घाटरोड वरुन चारचाकी वाहनात पसार झाले असावेत असा कयास लावला जात आहे, भरवस्तीत झालेल्या धाडसी चोरीमुळे पोलिसांसमोर आव्हान उभे ठाकले आहे,आम्ही १० दिवसांपुर्वीच आपणास सुचित केले होते कि,रात्रीची गस्त फक्त औपचारिकता ठरतेय जर वेळीच गस्तीचे नियोजन केले असते व गस्तीचे वाहन मुख्य रस्त्यावरुन न नेता गावात कधीतरी आणले असते तर चोरटे पोलिसांच्या हाती लागले असते व अनर्थ टळला असता,चोरटे परिसरातीलच असावे असा संशय व्यक्त केला जात आहे.शहर पोलीस निरीक्षक विजयकुमार ठाकुरवाड हे एक कर्तव्यदक्ष अधिकारी आहेत,त्यांनी नाशिक शहर व जिल्ह्यात आनेक मोठे गुन्हे उघडकीस आणले आहेत ते काही महिन्यापुर्वीच चाळीसगावात रुजु झालेले आहेत,ते निश्चितच अशा चोरीचा तपास करुन आरोपींच्या मुसक्या आवळतील अशी अपेक्षा शहरातुन व्यक्त केली जात आहे.