
चाळीसगाव (किशोर शेवरे)- येथील शिवसेना कार्यकर्त्यांनी येत्या १२ मार्च रोजी तिथी प्रमाणे येणाऱ्या शिवजयंती उत्सव निमित्ताने दिनांक ९ मार्च रोजी प्रभात गल्ली महादेव मंदिर येथे १ ली ते ७ वी पर्यंत च्या विद्यार्थ्यांचे चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते त्यात एकुण १०२ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता.

विद्यार्थ्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांची प्रतिमा हुबेहूब रेखाटल्या होत्या उपस्थितांनी विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणात कौतुक केले प्रथम छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन व पुष्पहार अर्पण श्री संजय नानकर वकील साहेब यांच्या हस्ते करण्यात आले त्या प्रंसगी श्री मंहेद्र बापु पाटील,रमेशआबा चव्हाण ,नानाभाऊ कुमावत,भिमराव नाना खलाने, दिलीपभाऊ घाेरपडे,सुनिल गायकवाड,दिनेश विसपुते,राजु भाेई,भरत साबळे सुभाष राठाेड तात्या माेरे.विशाल काेळी आदि उपस्थित हाेते , चित्रकला स्पर्धेमध्ये शिवदास वाघ, अर्थव प्रविण राजपुत, दर्शन अशाेक माेरे,आेम संदिप पाटील,अशिता गुप्ता,अर्थव पंकज विसपुते,वंकटेश राजेश,दर्शन सुधाकर पाटील,पवन देवीदास राठाेड,मेघा मल्हारी भाेई, इत्यादी विद्यार्थ्यांनी घवघवीत यश मिळून बक्षिशे पटकावली इतर विद्यार्थ्यांना सहभाग घेतल्या बद्दल शिवजयंती उत्सव समितीतर्फे प्रमाणप्रत्र देण्यात आले, परीक्षक म्हणुन प्रतिमला अमुतकार,तेजस नानकर यांनी काम पाहीले, दिनेश चव्हाण सर यांनी सहकार्य केले तर एसटी कामगार सेनेचे शहर प्रमुख श्री रघुनाथ तुकाराम काेळी यांनी सुत्र संचालन करून सर्वाचे आभार मानले.















