स्व. जोधाराम डेंबानी पुण्यतिथी निमित्ताने योग प्राणायाम शिबिराचा खासदार उन्मेश दादा पाटील यांच्या हस्ते शुभारंभ
चाळीसगाव – आजच्या धकाधकीच्या जीवनात अनेकांचे आरोग्याकडे दुर्लक्ष होते आहे. यासाठी दिवसाची सुरुवात योग साधनेने केल्यास आरोग्य अबाधित राहील आणि आपला आत्मविश्वास वाढेल. योग साधना ही निरामय जीवनाची गुरूकिल्ली असून तिच्या सहाय्याने आनंदी जीवनाचे द्वार उघडा.अशी अपेक्षा केंद्रीय पेट्रोलियम आणि प्राकृतिक गॅस व सूक्ष्म लघु मध्यम उद्योग मंत्रालयाचे स्टँडिंग कमिटी सदस्य खासदार उन्मेश दादा पाटील यांनी केले. आज स्व. जोधाराम डेंबानी यांच्या स्मृती प्रित्यर्थ नवजीवन सिंधी सेवा मंडळ येथे योगप्राणायाम शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. त्याचा शुभारंभ आज खासदार उन्मेश दादा पाटील यांनी केला















