Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

विद्यार्थिनींना आत्मनिर्भर आणि स्वावलंबी बनविण्यासाठी डॉ.बेंडाळे महिला महाविद्यालयाचे अभ्यासक्रम पूरक

najarkaid by najarkaid
February 28, 2020
in जळगाव
0
विद्यार्थिनींना आत्मनिर्भर आणि स्वावलंबी बनविण्यासाठी डॉ.बेंडाळे महिला महाविद्यालयाचे अभ्यासक्रम पूरक
ADVERTISEMENT

Spread the love

खासदार सुप्रिया सुळे यांचे प्रतिपादन

जळगाव –  विद्यार्थिनींना आत्मनिर्भर आणि स्वावलंबी बनविण्यासाठी डॉ.बेंडाळे महिला महाविद्यालयाचे अभ्यासक्रम पूरक आहेत. शासनाच्या कौशल्य विकास विभागामार्फत प्रयत्न करून विद्यार्थीनीना सहकार्य मिळवून देईन. तसेच मोठ्या फॅशन डिझायनिंग कंपन्यां आणि डिझायनरसोबत महाविद्यालयाचा करार करण्यासाठी देखील मी प्रयत्नशील राहील. यामुळे विद्यार्थिनींना स्वत:ला यशस्वी उद्योजक म्हणून नावलौकिक मिळविता येईल असे प्रतिपादन खासदार सुप्रिया सुळे यांनी केले.

येथील अण्णासाहेब डॉ. जी.डी.बेंडाळे महिला महाविद्यालयात “उडान:संजीवनी- नव उद्योजकांसाठी” या विशेष उपक्रमाअंतर्गत शुक्रवारी दि. २८ फेब्रुवारी रोजी सरस्वती लेवा बोर्डिंग सभागृहात विद्यार्थीनीना बीज भांडवलाचे वितरण खा.सुप्रिया सुळे यांच्या हस्ते  करण्यात आले. त्यावेळी त्या बोलत होत्या. अध्यक्षस्थानी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष अॅड. रविंद्र पाटील होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून माजी पालकमंत्री गुलाबराव देवकर, संस्थेचे सचिव एन.एस.पाटील, सहसचिव डॉ.डी.के.टोके, संचालक आर.डी.वायकोळे, अरुणा पाटील, किरण बेंडाळे, रंगकर्मी शंभू पाटील, प्राचार्य डॉ.एस.एस.राणे मंचावर उपस्थित होते.

मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करुन कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. प्रस्तावनेत प्राचार्य डॉ. राणे यांनी सांगितले की, विद्यार्थिनींना कौशल्यनिपुण शिक्षण देण्यासह त्यांना रोजगार मिळण्यासाठी देखील महाविद्यालय प्रयत्न करीत आहे. त्यामुळे ते स्वावलंबी होतील, असेही ते म्हणाले. यावेळी नंदन परदेशी यांनी पालकांच्या वतीने तर तृप्ती पाटील, पायल महाजन या लाभार्थी विद्यार्थिनींनी मनोगतातून महाविद्यालयाचे आभार मानले.  यानंतर १३ विद्यार्थीनीना बीजभांडवलरुपी वस्तू वितरण खा.सुप्रिया सुळे यांचे हस्ते वितरीत करण्यात आले.

खा.सुप्रिया सुळे यांनी मनोगतात, विद्यार्थिनींच्या कौशल्याचे कौतुक केले. त्या म्हणाल्या की, फॅशन डिझायनिंग व ब्युटी थेरपी अभ्यासक्रमातून महिलांना रोजगार मिळत आहे, ही कौतुकाची बाब आहे. जळगावच्या मातीत वैविध्यता असून मला येथील संस्कृतीचा सन्मान वाटतो. मी स्वत:ला नेहमी अपडेट करीत असते. वाचन आणि तंत्रज्ञान याकडे विद्यार्थ्यांनी लक्ष द्यावे. शिक्षण कौशल्यपूर्ण घेतल्यास रोजगार सहज मिळतो. कौशल्य असेल तर उद्योग क्षेत्रात पाय रोवता येतात, असे सांगत खा.सुळे यांनी, महाराष्ट्र छेडछाडमुक्त करण्याची गरज असून लैंगिक समानता दिसून येत असल्याचे सांगितले. या सरकारचे तुम्ही मायबाप आहात, पुढील पाच वर्षात चांगले शिक्षण, महिला सुरक्षा यासाठी काम करणार असल्याचेही त्या म्हणाल्या.

अध्यक्षीय भाषणात अॅड. रविंद्र पाटील यांनी सांगितले की, मुलींना चांगले अभ्यासक्रम मिळत असल्याने त्या स्वयंपूर्ण झाल्या आहेत. समाजाचा समान पद्धतीने विकास होण्यास मदत होत असल्याचेही प्रतिपादन अॅड. पाटील यांनी केले.

सूत्रसंचालन कौशल्य विकास प्रशाळा समन्वयक प्रा.शिला राजपूत यांनी तर आभार उपप्राचार्य डॉ.रत्ना महाजन यांनी मानले. कार्यक्रमासाठी प्रा.अनिता नांदेडकर, प्रा.भाग्यश्री गुंड, प्रा. दीपाली पाटील, प्रा.रेश्मा नारखेडे, प्रा.रुपाली भोळे, प्रा.दीपक किनगे,प्रा.विनोद ननवरे, पुष्कर पाटील, मास मीडिया विभाग समन्वयक प्रा.डॉ.जयेंद्र लेकुरवाळे यांच्यासह विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले.

लाभार्थी विद्यार्थिनी

कार्यक्रमात फॅशन डिझायनिंग अभ्यासक्रमाच्या ५ तर ब्युटी थेरपी अभ्यासक्रमाच्या ८ विद्यार्थीनीना हाय स्पीड शिलाई, पिको मशीन आणि पार्लरचे एकूण १ लाख ८० हजार २१३ रुपयांचे साहित्य वितरीत करण्यात आले. लाभार्थी विद्यार्थिनींमध्ये नम्रता मोरे, दिपाली सोनवणे, मयुरी सूर्यवंशी, शारदा भोळे, सुवर्णा पाटील, दीपमाला चौधरी, उज्वला पाटील, मोहिनी मनोरे या ब्युटी थेरपी अभ्यासक्रमाच्या तर तृप्ती पाटील, ज्योत्सना बजाज, उत्कर्षा नारखेडे, शीतल बाहेती, ममता वराडे या फॅशन डिझायनिंगअभ्यासक्रमाच्या ५ विद्यार्थीनीना बीज भांडवल वितरीत करण्यात आले.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

सातारा रोजगार मेळावा-2020 [232+जागा]

Next Post

शिवरायांचा अपमान करणाऱ्या छिंदमला दणका; नगरसेवक पद रद्द

Related Posts

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा – मंत्री गिरीश महाजन

September 7, 2026
अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन

ताज्या बातम्या

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा – मंत्री गिरीश महाजन

September 7, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us